Skip to main content

आठवणी....

लेखक एकप्रवासी यांनी मंगळवार, 29/08/2017 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील आठवणी ह्या हिवाळ्यातील धुकं पसरलेल्या वाटेसारख्या असतात ... आपण जसजसं दूर जाऊ तसतश्या त्या अंधुक होत जातात ... पण काही आठवणी ह्या त्या धुक्यातील सूर्यकिरणांसारख्या असतात ... आपण कितीही दूर गेलो ना तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते कायम देत राहतात ...

आणि महेंद्रसिंह धोनी मैदानावर झोपला !

लेखक १००मित्र यांनी मंगळवार, 29/08/2017 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्वीच on / स्वीच off हे असे शब्द मानसिक संतुलनाबाबत असंख्य वेळा ऐकायला मिळतात. मला तर अनेक सामन्यांतून हेच जाणवतं , शिकायला मिळतं. फक्त अनुभवी खेळाडूच नव्हे, तर नव-नवे खेळाडू देखील हल्ली त्यांचा खेळ अचानक पणे बदलून परिस्थितीनुसार बदलताना दिसतात. मग तो फक्त एकच फलंदाज (उमेश यादव) शिल्लक राहिला असताना अचानक t २० पद्धतीत सामना फिरविणारा हार्दिक पंड्या असो, किंवा युगंधर महेंद्र सिंह धोनी असो. क्रिकेट खेळाचं वैशिष्ट्यच मुळी त्याचं लवकर न संपणे हे आहे. बघा ना, सर्वात लवकर संपणारा सामना देखील (टी २०) ४ तास चालतो. ह्याउलट इतर खेळ ४५ मिनिटे- १.५ तास , दोन तास असे चालतात. सांघिक बरं का.

स्वातंत्र्य लढा २.०

लेखक उमेश धर्मट्टी यांनी मंगळवार, 29/08/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला झाला स्वातंत्र्यदिन!! जोडून आलेल्या सुट्या पण संपल्या. देशभक्तीचा पूर आता ओसराला असेल आणि सगळं कसं पूर्ववत होऊन जाईल. सगळया थोरामोठ्यांचा तसबिरीवरच्या फुलांच निर्माल्य विसर्जन त्याच्या विचारसहित करून पुढच्या स्वातंत्र्यदिनाची वाट बघू या. ७० वर्षाचा झाला आपला देश आणि आता पंचाहत्तारीकडे वाटचाल. एका मनुष्याच्या आयुष्यात हा एक आयुष्याचा उतरणीचा काळ असतो, पण देशासाठी तेही आपल्या देशात जेथे तरुणाची संख्या प्रचंड आहे, तो देश म्हातारा न होता तारुण्याने सळसळत असतो. इथून पुढचा काळ आहे आपला आहे, जगात आपण आपला ठसा उमटवू शकतो आणि महासत्ता होऊ शकतो.

रुक्मिनि म्हणे

लेखक शरद यांनी मंगळवार, 29/08/2017 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
१९८८ मध्ये श्री. चंद्रकांत काळे यांनी शब्दवेध या संस्थेची स्थापना केली. शब्द व स्वर यांचे वेड असलेल्या माणसांनी एकत्र येऊन पहिला कार्यक्रम केला तो "अमृतगाथा " संतांनी भक्तीरचना रचल्या; त्यातील लोकसंगीताशी नाळ असलेल्या काही रचना एकत्र करून.सुरवात केली. पुढे त्यांनी कै. ग्रेस यांच्या कवितांवर सांजवेळ, प्रीतरंग, शेवंतीचे बन, आख्यान तुकोबाराय असे मराठी कवितांवरचे कार्यक्रम सादर केले. आंतरभारतीचा कार्यक्रम म्हणून गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे भाषांतर व "नाटक्याचे तारे " हा कै.

'अक्षर मैफल'ची भूमिका

लेखक रणभोर यांनी मंगळवार, 29/08/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी रात्री कोणत्या तरी मित्राच्या घरी किंवा रूमवर सगळे जमतात. आपल्याला आवडतं ते खायला प्यायला घेऊन येतात. आणि गप्पा मारत बसतात. हा अनुभव बहुतेक सर्वांना असेल. अशा मैफलींना वयाचं बंधन नसतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा मैफलींना विषयाचं बंधन नसतं. मला तर असा अनुभव आहे कि एरवी उघडपणे बोलता येणार नाहीत असे सर्व गंभीर विषय सुद्धा तिथे सहज मोकळे होतात. रात्रभर गप्पा सुरु राहतात. मित्र दर्दी असतील तर कदाचित मागे बेगम अख्तर किंवा नुसरत फतेह अली (आपापल्या आवडीनुसार) सुरु असतो. एका प्रसन्न वातावरणात, हसत खेळत यच्चयावत विषय बोलले जातात. आम्ही सुरु करतोय अशीच एक मैफल.

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ४ : एका अनोळखी जगातला प्रवास.

लेखक अनिवासि यांनी मंगळवार, 29/08/2017 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका अनोळखी जगातला प्रवास. अनिवासि लेखमालेसाठी काय लिहावे ह्याचा विचार करत असताना इतके प्रसंग डोळ्यापुढे आले की निवड करणे कठीण झाले. तेव्हा जेथून माझ्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि ज्याचे सूतोवाच मी एका प्रतिसादातून केले होते, तेथेच जातो. १९-२०व्या वर्षापर्यंत माझे आयुष्य पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. ५० साली शालान्त परीक्षा पास झालो, रीतसर कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्या वेळच्या इंटरपर्यंत वाटचाल केली. सर्व काही आलबेल होते आणि ---- एकाएकी घरात आर्थिक आपत्ती आली. (तो निराळा विषय). कॉलेजची फी थकली, परीक्षेसाठी फॉर्म भरायलासुद्धा पैसे नव्हते.

बाप्पाचा नैवेद्यः बटाट्याचे कानवले

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 29/08/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा! गणपतीचे घरोघर आगमन झालेच असेल. दरवर्षी दहा दिवस येणारा बाप्पा यावर्षी दोन दिवस जास्तच मुक्कामाला आहे तर रोज नविन काय नैवेद्य करायचा हा गहन प्रश्न असतोच.

मला भेटलेले रुग्ण - ८

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 29/08/2017 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40626 डॉक्टर परवा पासून खूपच त्रास वाढलाय हो खोकल्याचा , मधले ३ महिने ईतका कमी झाला होता की आता त्रासच संपला वाटत होतं.... जरा त्राग्यानेच बोलत होती पेशंट... मी फाईल बघत बघत ऐकून घेतलं आणि बोललो की तुम्हाला फक्त खोकल्याचा त्रास नाही होत आहे , अजून काय अडचण आहे ते सांगा ... कारण नेहेमी नवऱ्यासोबत येणारी पेशंट आज वडिलांसोबत आली होतीं... BP मोजलं.... पेशंट calm down होतात ... डाॅक्टरनी जर पेशंटला स्पर्शच नाही केला तर ,समजूनच घेता येत नाही ....

तू

लेखक अमित रेडीज यांनी मंगळवार, 29/08/2017 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाही काढलीस तू कधी माझी आठवण तरी तुला विसरता आलं नाही मैत्रीचे धागे बांधले माझे मीच तरी तोडावेसे कधी मनात आलं नाही भेटून खूप बोलायचय तुझ्याशी पण ते अंतर कधी कापताच आलं नाही दूर असलीस तरी तुझं असणच खास आहे पण शब्दात व्यक्त करून कधी सांगताच आलं नाही