Skip to main content

आली गौराई अंगणी

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 30/08/2017 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी. तर आमच्या गौरीच्या आगमनाची तयारी श्रावण संपतानाच चालू केली जाते. सुरुवात होते घमेलंभर तांबडमातीपासून.

बाप्पाचा नैवेद्यः ऐरोळ्या

लेखक सूड यांनी बुधवार, 30/08/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
ऐरोळ्या: साहित्यः बेसन एक वाटी कणीक अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी अर्ध्या नारळाचं दूध साखर एक वाटी साजूक तूप मोहन आणि तळणीसाठी वेलदोडे पूड सजावटीला बदाम पिस्त्याचे काप चिमूटभर मीठ (ऐच्छिक) . 1 . . कृती: बेसन, कणीक, तांदूळ पिठी चाळून एकत्र मिसळावी. त्यात १ टेबलस्पून तूप तापवून मोहन घालावं. मोहन मिश्रणाला सगळीकडे एकसारखं लागलं की त्यात आधी नारळाचं घट्ट दूध मिसळावं, आणि नंतर मग पातळ दूध मिसळून भज्याच्या पीठापेक्षा किंचित घट्ट भिजवावं.

पौष्टिक चटणी

लेखक ऋतु हिरवा यांनी बुधवार, 30/08/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
पडवळाच्या बिया आणि शिराळ्याच्या सालींची चटणी : प्रकार १ पडवळाची भाजी केली तेव्हा पडवळच्या बिया व गर काढून फ्रीज मध्ये ठेवला. दोन दिवसांनी चटणी केली. शिराळ्याची आमटी करणार होते. त्यासाठी शिराळ्याची साले (दोडका) किसणीवर किसून घेतली व ती साले वेगळी ठेवून दिली. आधी कढई मध्ये पांढरे बिन पॉलिशचे तीळ पाव वाटी किंवा एक मोठा चमचा भाजून घेतले. ते वेगळे काढून ठेवले. मग कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद , मिरची (आवडीनुसार) , कढीपत्ता चार-पाच पाने अशी फोडणी केली. त्यात पडवळाच्या बिया आणि शिराळ्याची किसून ठेवलेली साले घातली.दोन वाफा आणल्या. (पडवळाच्या बियांना पाणी सुटते.

म्हागृ महिमा..

लेखक पुंबा यांनी बुधवार, 30/08/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी!

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ५ : माझी मी जन्मले फिरुनी

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 30/08/2017 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मी जन्मले फिरुनी १९९३चा मे महिना होता. जळगावचं रणरणतं ऊन मी म्हणत होतं. त्यात माझ्या चुलतबहिणीचं लग्न असल्याने आणि साडी नेसण्याची हौस असल्याने मी सकाळपासूनच झकास तयार होऊन मिरवत होते. मार्चमध्ये बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे आता सिनिअर कॉलेजला जाणार, म्हणजे मोठी झाले आहे... असा माझा एकूण आविर्भाव होता. मे महिन्याची एकोणतीस तारीख होती, पण अजून बारावीचा निकाल लागला नव्हता. आदल्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर झाला होता, त्यामुळे मनातून खूप धाकधूक होती. सकाळपासून दोनदा जवळच्या S.T.D. बूथवर जाऊन मी मुंबईच्या मैत्रिणीला फोन करून निकाल कधी लागणार आहे ते विचारलं होतं.

बाप्पाचा नैवेद्यः गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 30/08/2017 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
गौरीचा नैवेद्य: गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा. साहित्य: एक वाटी तांदूळ पिठी, दीड वाटी पाणी, एक चमचा लोणी, मीठ.

माजलेल्या बाबाची कहाणी

लेखक बाजीप्रभू यांनी बुधवार, 30/08/2017 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
WA वर एक पोस्ट वाचली कि, संदीप खरे यांना विनंती आहे कि, जेलमधे एकत्र आलेल्या बाबांसाठी "जमलेल्या बाबांची कहाणी" असं एखादं गाणं आहे का? ती वाचून किडे वळवळले आणि जमलेल्या बाबांऐवजी "माजलेल्या बाबांची" असं विडंबन करण्याची इच्छा झाली. कृपया बदल सुचवा म्हणजे WA वर मित्रांवर शायनिंग मारता येईल.

अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग ३

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 29/08/2017 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग ३ (अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40769 ) (अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग २ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40786 ) समुद्राच्या वेगवान लाटांनी त्याचा थकला भागला देह किना-यावर लोटुन दिला . हातांना वाळुचा स्पर्श होताच आपण किना-यावर आलो आहोत याची त्याला जाणीव झाली . होती नव्हती ती शक्ती एकवटुन तो कसाबसा ऊठला . सकाळची कोवळी सुर्यकिरणे त्याच्या अंगावर पडत होती . त्याचा थकवा कुठल्या कुठे पळुन गेला .

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 29/08/2017 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.

अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग २

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 29/08/2017 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग २ ( अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40769 ) काही दिवसांनंतर ------------- भागीरथ उद्योगसमुहाने उद्योग जगतात नुकतीच २५ वर्षे पुर्ण केली होती . त्या निमित्ताने या समुहाच्याच एका पंचतारांकीत हॉटेलमधे भव्य समारंभ आयोजीत केला होता . देश विदेशातील अनेक नावाजलेल्या व्यक्ती या समारंभाला उपस्थीत राहणार होत्या . या समारंभाची व्यवस्था पाहण्यासाठी आदिती भागीरथ एक दिवस आधीच हॉटेलमधे आलेली होती .