दृकश्राव्य विभाग :- मार्टिन पुणेकर पाटील
कधी कधी मिपासाठी काम करताना "याच साठी केला होता अट्टाहास" असं वाटतं. मार्टिनशी ओळख ही त्याच प्रवासाची सुरूवात. मार्टीन हा आपल्या कौशिक लेलेंचा शिष्य. वेल्लाने त्याचा युट्युबवर एक व्हिडीओ पाहुन आपल्या अंकासाठी काही बोलण्याची गळ घातली. तो सुद्धा उत्साही माणूस निघाला आणि त्याने लगेच होकारही दिला. होकार तर दिला पण पहिले आठ पंधरा दिवस काहीच हालचाल नाही. आम्ही आपले मध्येच त्याला हलवून यायचो. देतोय देतोय.. काही तरी काम करतोय.. असं म्हणत म्हणत अंक आठवड्यावर आला. अजून काहीच हाती आले नव्हते.एक उनाड दिवस..
एगरकिंगनच्या फॅक्टरीमध्ये दिनेशची व्हिजिट होती. तो गाडीने जाणार हे ठरल्यावर मीही त्याच्याबरोबर जायचं ठरवलं. ए ५वरून आमची गाडी बासेलच्या दिशेने पळू लागली. कार्ल्सरुह मागे पडलं, आता स्ट्रासबुर्गकडे जाणारा रस्ता दिसू लागला. ए५ वरूनच पुढे जात फ्रायबुर्ग ओलांडून आम्ही बासेलकडे कूच केलं. मध्येच एकदा आमच्या आणि गाडीच्या टाक्या भरल्या. जरी ही काही माझी पहिली स्विस ट्रिप नव्हती, तरीही तिकडे जायचं असलं की वेगळाच उत्साह मनात असतो. त्यातून अनवट ठिकाणी जायचं असलं की बघायलाच नको..दौलत की चाट
कोणे एके काळी दिल्ली नावाचे एक महानगर होते. तेथे दौलत नावाचा एक व्यापारी राहत होता. हिवाळ्यात त्याचा एक नेम होता. नेमाला तो काय करी? तर म्हशीचे घट्ट दूध घेई. त्याबरोबर मलई घेऊन ते एका मोठ्या मातीच्या भांड्यात एकत्र करी. मग ते भांडे झाकून रात्री बाहेर ठेवी. त्यावर बर्फाची लादी ठेवी.
(अर्धा लीटर होल मिल्क(तुम्ही म्हशीचे दूध वापरू शकता), अर्धा ते पाऊण कप हेवी क्रीम.दृकश्राव्य विभाग :- कर ना कर, बांड्या बैलनी शेपटी धर (अहिराणी कथा)
जयंत काका म्हणजे एकदम सळसळता उत्साह! एक खुमासदार कथा त्यांनी आपल्या खास अहिराणी भाषेत त्यांनी दिवाळी अंकासाठी सादर केलेली आहे. मिपाकरांना नक्कीच आवडेल!

पतीची आरती
गणपतीबाप्पा गेले आणि सकाळ-संध्याकाळच्या पूजा, आरत्या, घंटानाद, सगळे बंद झाले. घर एकदम शांत शांत झाले. मी गमतीने बायकोला म्हणालो, "अगं, गणपती वर्षातून फक्त १० दिवस येतो, तरी तू इतक्या मनोभावे सकाळ-संध्याकाळ त्याची आरती करतेस. मी तुझा गणपती नसलो, तरी'पण'पती आहे, पण तू कधी माझी आरती केली नाहीस." त्यावर बायकोने तिरस्कारिक नजरेने बघून "आरती? अन तुमची?बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू!)

बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.) मागच्या एका कथेत आपण आमच्या मालोजीरावांबद्दल ऐकले. मालोजीरावांची जीवनगाथा म्हणजे एक अद्भुत कादंबरी सहज होईल. पण आज आपण त्यापेक्षाही अद्भुत अशा आमच्या मित्राबद्दल वाचणार आहोत. मालोजीराव काय आणि बाळासाहेब काय, अशी माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात असे कोणी मला आत्ता सांगितले, तर मी त्याला निश्चितच मूर्खात काढेन.
...उर्फ सुगरणीचा सल्ला : पोळ्या - एक अर्वाचीन छळ
माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी.
आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच.
पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे.
मिसळपाव