काश्मीरसिंहच्या सुटकेनिमित्त अभिनंदन!
असेच बाकीचे युद्धकैदी, जे १९६५ च्या युद्धापासून पाकीस्तानच्या विवीध तुरुंगात खितपत पडले आहेत, ते देखील आपल्या नातेवाईकांकडे परत येवोत अशी आशा!
इतके वर्ष डोळ्यात प्राण आणून पती घरी येण्याची वाट पाहणार्या पत्नीच्या प्रार्थनेला व तिने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश. इतर सर्व घटक नाममात्र आहेत.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
काश्मीरसिंग ची सुटका ही बाकीच्या अशाच युद्धकैद्यांसाठी आनंदाची बातमी असेल, पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ?
किंवा, माणुस कुटूंबात परत आला, कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते.
इथे बातमी दिल्याबद्दल आभारी.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण वाया गेलेल्या आयुष्याचे काय ?...कदाचित हीच बातमी वाया गेलेले आयुष्य भरुनही काढत असेल असेही वाटते.
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली...
नागरीक (सैन्यात नसलेले तुमच्या-आमच्यासारखे बहुसंख्य) आपली सुरक्षितता आणि एकंदरीतच आपले सुखी जीवन "टेकन फॉर ग्रॅन्टेड" पद्धतीने घेतो. म्हणूनच ती येथे द्यावीशी वाटली...
एकदम सही !!!
पण, आपण इथे दिलेल्या बातमीबद्दल नाही म्हणत हो, काश्मिरसिंगाचे परत येणे हीच बातमी त्या कुटूंबासाठी त्याचे वाया गेलेले आयुष्य भरुन काढत असेल असे वाटते, असे म्हणतोय......!!!
पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला..
ही या घटनेत ही एक जिव्हारी लागणारी गोष्ट. पण प्रसंगानुसार कदाचित तसा निर्णय घ्यावा लागला असणार.
इथले धर्मपंडित पुन्हा त्यांना हिंदुधर्मात आणतील आणि राजकारणाला एक चांगला विषयही मिळेल असे वाटते.
अवांतर :- विषयांतराबद्दल क्षमस्व !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण त्यांनी धर्मांतर का केलं असावं हा प्रश्न राहून राहून मनाला बोचत राहिला..
सगळ्याच गोष्टी थोड्याच चॉईसने केल्या जातात?
हेरगिरी हे एक अवघड काम आहे... ( ७३ साली रावळपिंडीत तर फारच अवघड काम...)
मी पूर्वी वाचले होते की कोणताही हेर पकडला गेला की त्याने हे ग्रुहित धरलेले असते की त्याचा देश (पकडला गेल्यावर लगेच ) हा आम्ही पाठवलेला नाही,असे म्हणतो आणि त्याला परत घेत नाही ..... वगैरे... आता खूप वर्षांनी का होईना काश्मीरसिन्ग परत आले ही एक भाग्याची गोष्ट....
..... आता इतर युद्धकैदीसुद्धा परत यायला हवेत...
प्रतिक्रिया
अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे सार्थक
हेच,
बाकीचे युद्धकैदी
हे
वाया गेलेल्या आयुष्याचे काय ?
वाया गेलेले आयुष्य
प्रश्न या बातमीचा नाही, प्रश्न त्यांच्या येण्याच्या बातमीचा....
मीही
याचंही जरा वाइट वाटलं
शीख
सुटकेनिमित्त अभिनंदन
पण त्यांनी