माझ्या माहितीप्रमाणे प्लॉट एन.ए. असल्याशिवाय बँक लोन देत नाही. तसेच इंडेक्स २ असेल तर चालेल पण त्या प्लॉटवर ६ महिन्याच्या आत बांधकाम करावे लागते. हे सर्व नियमातील.....बाकी काही प्रायव्हेट बँक नियम धाब्यावर बसवून देतात....
बाकीची माहिती जाणकार देतीलच.
मला माहिती हवी आहे की NA नसताना मला कर्ज मिळेल का??????>>>>>>>>
मिळेल की.
सध्या तरी आयडीबीआय बॅन्क अशा गुन्ठेवारी असलेल्या जमिनीना लोन देते.
पण जमिन घेवुन घर बान्धने ह्यासाठीची प्रोसिजर माहिती नाही.
आयडीबीआय किन्वा सारस्वत बॅन्क हे दोन पर्याय आहेत. (मला दोनच माहिती आहेत. अजुन काही सहकारे बॅन्का देत असव्यात)
बाय द वे, जमिन कोणत्या येरीयात, किती आणि काय दराने घेताय ही किन्चीत माहिती द्या की. आम्ही देखील शोधतोय.
एन ए करण्यासाठी किती खर्च येइल ते माहिती नाही पण जमिन कॉर्पोरेशन हद्दीत असेल तर त्यावर काही आरक्षण आहे का ते बघाव लागेल. ती रेसिडेन्शियल झोन मध्ये हवी.
बाय द वे,
जमिनीची कागदपत्रे काय बघवीत इत्यादी माहिती एक लेख लिहुन देणार काय??
बॅंकांबद्दल झकासरावांनी माहिती दिली आहेच. व्याजाचा दर वाजवीपेक्षा जास्त असतो असे माझे मत आहे.
NA करून घेणे ही सोपी गोष्ट नाही. टेबलावरून आणि खालून, ऑफिसच्या आत आणि बाहेर बर्याच जणांना बरेच पैसे द्यावे लागतात. शिवाय अशी पैसे देण्याची तयारी असली तरी NA करून मिळेलच याचीही शाश्वती नाही. अर्थात NA करून मिळाले तर ५० हजाराची जमिन ५० लाखातही विकता येऊ शकते म्हणे!
ज्या जमिनीत पीक निघू शकते ती जमिन कागदोपत्री NA करून घेऊन बांधकामाला परवानगी मिळवणे हे अजिबात योग्य नाही, असे माझे व्यक्तीगत मत आहे.
माझ्या माहीतीप्रमाणे जमिन NA करायला ३ ते ५ रु प्रति स्क्वेयर फूट त्यासाठी सरकारी फि चा दर आहे.. त्यासाठी काही परवानग्या/कागदपत्रे लागतीलच त्याचा खर्च वेगळा लागेल.. कागदपत्रात कोरा ७/१२ (कोरा म्हणजे त्याच्यावर बोजा नसावा - कर्ज नसावे), कोणतेही आरक्षण नसल्याचा कॉर्पोरेशन्/ग्रामपंचायतीचा दाखला, इत्यादी येते म्हणे..
--सुहास
प्रतिक्रिया
प्लॉट
गल्लत
राजमुद्रा,
मला माहिती
माझी चिमूटभर माहिती
माझ्या
+१
प्रत्येक