कालची खादाडी सुरळीच्या वड्या (उर्फ खांडवी)

गणपा's picture
गणपा in पाककृती
16 Sep 2009 - 1:05 pm

नमस्कार मंडळी, काल सक्काळी सक्काळी मिपा उघडल नी समोर सुरळीच्या वड्या पाहुन चचलो.(हा तात्यापण रोज लोकांना चचवण्याचे नवनवीन उपाय शोधत असतो. विमा एजंट आहे की काय कोण जाणे.) (अजुन दिसतेयती बेटी पहील्या पानवर पण हॅ..हॅ..हॅ..हॅ.. आज मेरेपास भी वडी है.) तर सांगतो काय की ही सुरळीची वडी माझी अतिप्रिय. तात्याच्याच शब्दात सांगायच तर या वडी वर आमचा लै जीव.
काय कराव सुचेना, इकडे मोजुन २-३ भारतीय हाटेलं आहेत. तिथ काही हे असले नेमके मला आवडणारे पदार्थ मिळत नाहीत. बर स्वतः कराव तर, हा प्रयोग मी मागे १० वर्षांपुर्वी अतीसुक्ष्मलहरीभट्टीत केलाहोता. सुदैवाने तेव्हा घरात कुणी नव्हत. गुणी बाळा O:) सारख सगळ किचन नीट आवरुन ठेवल होतं. तरी आईला शंका आलीच :W .
किचन जरा जास्तच चकचकीत दिसत होत. :?
तर असो ... हापिसात थोड गुगलुन पाहील. एक दोन रेशीप्यांची प्रिंटआउटस काढली. आणि ठरवल की आज ह्या वड्या पाडायच्याच.
पुढे कृती सचित्र देत आहे. जेणे करुन माझ्या सारख्या नवशीक्या हौशी खवय्यांना सोप्प जाव.

१)सर्वप्रथम लागणारा कच्चामाल.


१ वाटी चण्याच पीठ. (बेसन)
१ वाटी दही .
(चित्रात १/२ वाटी दिसतय, पण हौशी झालो म्हणुन कय झाल... परत २० + २० मिनिट गाडीची चाक तुडवत दुकानात जाण जीवावर आलं. त्यामुळे आहे त्यात निभावुन नेल.)
१ वाटी पाणी.
१/२ चमचा हळद.
१/२ हिंग.
मीठ चवीनुसार
सजावटी साठी : नारळ, कोथिंबीर.
फोडणी साठी : तेल, मोहरी, हिरवी मिरची

२) बेसन, दही, पाणी एकत्र करुन त्यात हळद, मीठ,हिंग(मी चवी साठी १/४ चमचा आल लसणाची पेस्ट पण टाकली) टाकुन चांगले फेटावे.

गुठळ्या होउदेउ नये. गुठळ्या होणे हा बेसनाचा जन्मजात हक्क आहे आणि तो तो बजावतोच. पण त्याला त्या पासुन परावृत्त करण्यासाठी मी सगळ मिश्रण मिक्सर मध्ये घातल. B)

३) जाड बुडाच्या पातेल्यात थोड तेल तापवल.

४) तयार मिश्रण त्यात टाकुन मंद आचे वर शिजत ठेवल. सतत ढवळत रहाव लागत, गुठळ्या होउदेउ नयेत.


५) मिश्रण शिजत आल की लगेच एक अ‍ॅल्युमिनीयम फॉईल वर हे मिश्रण कलथॅने पसरवावे.


६) साधारण ५ मिनिटांनी सुरीने उभे १ ते १/२ इंच रुंदिचे चरे पाडावे.


७) अलगद हाताने रोल करुन वड्या बनवाव्या.


८) वरुन नारळ कोथिंबीर पेरावी.
९) मोहरीची फोडणी करुन वरुन तडका द्यावा. (फोडणी करताना त्यात हिरवी मिरची कापुन टाकल्यास तिचा थोडा तिखट पणा तेलात उतरतो. मी घाई धाईत टाकायला विसरलो)


पाककृतीस लागणारा वेळ. १५-२० मिनिटे.(सर्व कच्चामाल हाताशी असल्यास).
आवरायला लागणार वेळ. १ तास.
मी किचन मध्ये शिरलो की "पाककृती नको पण पसारा आवर" हे माझ्या बायकोच पेटंट वाक्य. त्यामुळे तिने सक्त ताकीद दिली आहे कि जर पसारा आवरणार असशील तरच आत ये. पण सध्या एकटाजीव असल्याने आपलच राज्य आहे किचनवर ;)

विसु: जर तुमच्या घरी झालेला पसारा आणि भांडी घासण्यासाठी बाई वा गडी (मग भले ती/तो लग्नाची का असेना) नसेल तर या भनगडीत पडु ने.

खासु: तात्याने प्रवृत्त केल्याने ही रेशीपी त्यांना समर्पीत.

प्रतिक्रिया

JAGOMOHANPYARE's picture

16 Sep 2009 - 1:10 pm | JAGOMOHANPYARE

लई भारी... मी पण काल पासून चित्र बघून हे करायचं म्हणत होतो.......... आता करेन आजच.............. :)

सहज's picture

16 Sep 2009 - 1:26 pm | सहज

हा गणपा व पांथस्थ, आयर्न शेफ फायनल ठेवली पाहीजे दोघांच्यात!!!!

गणपा's picture

16 Sep 2009 - 1:33 pm | गणपा

सहजराव, पांथसस्थांना मी गुरुस्थानी मानतो. गुरुपुढे चेल्याची काय मजाल उभे ठाकण्याची. :)

बेसनलाडू's picture

17 Sep 2009 - 4:29 am | बेसनलाडू

(परीक्षक)बेसनलाडू

मदनबाण's picture

16 Sep 2009 - 1:31 pm | मदनबाण

व्वा. भुक लागली... :(
जमल्यास फोटो थोडे लहान करा...

(सुरळीच्या वड्या आणि अळुवडी हादणारा)
मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha

jenie's picture

16 Sep 2009 - 1:37 pm | jenie

खरच धन्यवाद.. आता करेन आजच

समंजस's picture

16 Sep 2009 - 2:07 pm | समंजस

सुरळीच्या वडयांचा फोटो तात्यांनी टाकल्या पासून, पाकृ कुठे सापडेल हा विचार करत होतो, तर तुम्ही एकदम देवा सारखे धावून आलात O:)
एकदंर प्रकार बराच किचकट दिसतो तर :S
माझ्या बायकोचा आवडता प्रकार आहे हा..
ही पाकृ तीला देतो, म्हणजे ती सुदधा खुष आणि आपण सुदधा :D (कष्ट न करता खायला मिळाल्या मुळे)

स्वगत - आशा करतो की तुमचं हे एकटं पणाचं आयुष्य आणखी काही दिवस चालो, आणि आम्हाला लाळ गाळण्यार्‍या =P~ बर्‍याच पाकृ मिळो :D

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Sep 2009 - 2:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सचित्र शिकवणी छान वाटली.पटकन कळली.छानच.

विसोबा खेचर's picture

16 Sep 2009 - 2:37 pm | विसोबा खेचर

काय बोलू?

सोनम's picture

16 Sep 2009 - 3:02 pm | सोनम

कालपासून त्या वड्यानी माझा छ्ळ मांडला होता. :( :(
आता कृती मिळाली आहे .. :) :)
आता नक्क्की करुन पाहीन ह्या वड्या. :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

अभिष्टा's picture

16 Sep 2009 - 3:22 pm | अभिष्टा

अहाहा, सचित्र रेसिपी. खूप सोपी करुन सांगितलीत :-)

---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

सूहास's picture

16 Sep 2009 - 3:29 pm | सूहास (not verified)

गणप्याव्...जमली की र सुरळी...म्या बी बनविनारच हाय ...

सू हा स...

आपल्या पाककौशल्यावर, आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणावर मी फिदा आहे!

मी कधीच स्वत:चा स्वतः स्वयंपाक करणारा नसूनही, मलाही करून पाहण्याचा हुरूप आला. यातच आपले यश सामावलेले आहे.

अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!

स्वाती२'s picture

16 Sep 2009 - 5:12 pm | स्वाती२

साष्टांग नमस्कार गणपा. मानलं. झकास जमल्यात वड्या. पटपट मिश्रण पसरवून वड्या पाडणे सोपे काम नाही. अभिनंदन!

गणपा's picture

16 Sep 2009 - 5:29 pm | गणपा

धन्यवाद तै.. आपल्या अनेक रेशीप्या माझ्या हिटलिस्टवर आहेत. :)
वड्या करताना नाही, पण एका हातात सुरी नी दुसर्‍यात कॅमेरा घेताना अंमळ कसरतच झाली.

स्वाती२'s picture

16 Sep 2009 - 9:13 pm | स्वाती२

रेसिप्यावाली स्वाती मी नव्हे.

गणपा's picture

16 Sep 2009 - 9:51 pm | गणपा

हॅ हॅ हॅ... नावाने वाईच गोंधळ झाला.
असो दुसर्‍याच क्रेडीट न खाता प्रामाणिकपणे चुक नजरेस आणुन दिल्याबद्द्ल मंडळ आभारी आहे.

रेवती's picture

16 Sep 2009 - 7:07 pm | रेवती

अरे वा!!
आजकाल स्वयंपाकघरात मुक्तहस्ते प्रयोग चाल्लेत!
सुरळीच्या वड्या छानच जमल्या आहेत.
रेवती

प्राजु's picture

16 Sep 2009 - 7:43 pm | प्राजु

सह्ही जमल्यात.
असं म्हणतात की भल्या भल्या सुगरणींना या वड्या जमत नाहीत.. आपल्याला जमल्या आता ऑर्डर्स घ्यायला हरकत नाही. ;)
माझ्या घरी १ किलो पाठवून द्याव्यात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

16 Sep 2009 - 10:09 pm | धनंजय

दिल खुश!

अडाणि's picture

16 Sep 2009 - 11:50 pm | अडाणि

फारच सुरेख झाल्या आहेत... सुरळीच्या वड्या हा सुगरणपणाचा मापदंड आहे!!!

एक अंमळ शंका - बेसन पीठ तेलात शिजवताना भांड्याचा रंग बदलतो काय? तेल वेगळ्याच भांड्यात गरम केले आणि पीठ शिजवताना वेगळेच भांडे आहे म्हणून विचारले...

-
अफाट जगातील एक अडाणि.

नेत्रेश's picture

17 Sep 2009 - 2:06 am | नेत्रेश

क्र. ३ मधील भांडे फोडणीच्या तेलाचे असावे.

पटकन उचलून तोंडात टाकाविशी वाटते.

समिधा's picture

17 Sep 2009 - 3:22 am | समिधा

हा मी केलेल्या वड्यांचा फोटो

http://misalpav.com/node/6127

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

विकास's picture

17 Sep 2009 - 9:32 am | विकास

मस्तच दिसताहेत!

पाककृतीस लागणारा वेळ. १५-२० मिनिटे.(सर्व कच्चामाल हाताशी असल्यास).आवरायला लागणार वेळ. १ तास.

आणि खाऊन संपवायला किती? :-)

गणपा's picture

17 Sep 2009 - 1:16 pm | गणपा

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार.
-गणपा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2009 - 2:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वड्यातर मस्तच, आणि सांगण्याची पद्धतही आवडली.

अदिती

स्वाती दिनेश's picture

17 Sep 2009 - 7:31 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसताहेत, अ‍ॅल्युमिनिअम फॉइल वापरायची आयडीया भारीच..
स्वाती

सखी's picture

17 Sep 2009 - 7:35 pm | सखी

वरील सर्वांशी सहमत - ब-याच सुगरणी सुरळीच्या वडीच्या वाटेला जात नाहीत - फक्त एक सुचना कराविशी वाटली - ते खोवलेले ओले खोबरे+कोथिंबीर वडीच्या आतमध्ये पण टाकले की चांगले लागते व दिसतेही (तात्यांच्या फोटोत आहे तसे), तसेच आवडत असेल तर हिरवी मिरची जरा भरड वाटुन आत टाकली तर चव अजुन वाढते असा स्वानुभव आहे.

मी-सौरभ's picture

19 Sep 2009 - 11:13 pm | मी-सौरभ

:P

सौरभ
नविन आहे सवय होइल . :)