मदतीचा चेक कुठल्या पत्त्यावर पाठावयचा याबद्दल मी श्री. सचिन परब (sachin.parab@timesgroup.com ) याना लिहिले आहे व त्यांचे उत्तर येताच मी इथेही लिहीन.
पत्ता कळल्याबरोबर मी माझ्या आईतर्फे चेक पाठणार आहे. कालच तिचा ८९वा वाढदिवस झाला व तिने मला अशी देणगी द्यायला सुचवले आहे.
शिवाय मराठी मंडळी जकार्ता यानाही मी कळवले आहे. बघू त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स येतो ते.
सुधीर
-----------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
घटना दुर्दैवी खरीच. पण एक-दोन मुद्दे मनात आले
१. मटा मधला लेख वाचून इथे तुम्हाला काय चर्चा अपेक्षित आहे हे लिहिले असते तर बरे झाले असते.
२. निव्वळ लेख वाचून हा केवळ अपघात आहे हेच जाणवते. त्याचे उद्दाती करण करण्याचा काय हेतू आहे?(म्हणजे "...तरीही आपल्या बापजाद्यांची परंपरा टिकवायच्या म्हणून दरवर्षी ते जीव तळहातावर ठेवून सटासट थर लावतात..." वगैरे)
३. लेखात जे कनिष्ठ मध्यमवर्गाचे चित्र उभे केले आहे ते कशासाठी? गोविंदा करणारे तरूण ह्या वर्गातून आले म्हणून थर रचण्याचे धोके वाढतात/कमी होतात ? आणखी काही?
४. "...पण खरी जबाबदारी आपण मराठी माणसांची आहे. ..." म्हणजे नक्की कोणाची आणि काय जबाबदारी आहे?
५. वर्षातून फक्त काही तास चालणार्या ह्या खेळात ज्यांना केवळ वडापावचा खर्च परवडतो त्यांना विमे/हेल्मेट परवडेल? स्वप्नाळू भावविश्वात रंगून जाण्यात काय हशील आहे?
प्रतिक्रिया
मदतीचा चेक कुठल्या पत्त्यावर पाठावयचा?
घटना
असे