आमच्यात गौरी आगमनाच्या वेळी अंगणातील तुळशी वृंदावनापासुन घरात स्वयंपाक खोलीपर्यंत रांगोळीची पाउले काढली जातात आणि त्यानंतर प्रत्येक पावलावर मुखवटे ठेवले जातात. गौरींना संपूर्ण घर दाखवायचे अशी त्यामागची संकल्पना आहे.
हो, आमच्याकडेही अशीच पद्धत आहे. [फक्त आता फ्लॅटमधे असल्याने दारातूनच काढावी लागतात पावलं.] मुखवट्यांचं सूप प्रत्येक पावलावर ठेवलं जातं, त्यावेळी मागे येणारे "लक्ष्मी कशानं आली?" असं विचारतात, आणि जिच्या हातात सूप असतं, ती "गाई-गुरांच्या पावलांनी, सोन्याचांदीच्या पावलांनी, लेकराबाळांच्या पावलांनी" अशी उत्तरं देते. उंबर्यावर माप ठेवलं जातं भरलेलं, गौरी घेऊन येणारी ते ओलांडून आत येते, त्यावेळी दुसरी तिला कुंकू लावून जेवणाचं आमंत्रण देते. पूजेच्या आधी पावलांच्या मधे कुंकवाच्या पाण्यानं हातवे पण द्यायचे असतात आणि जिथे गौरी मांडल्या जातात, त्यांच्या मागे भिंतीवरही हातवे द्यायचे असतात.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
हो, आमच्याकडेही अशीच पद्धत आहे. [फक्त आता फ्लॅटमधे असल्याने दारातूनच काढावी लागतात पावलं.] मुखवट्यांचं सूप प्रत्येक पावलावर ठेवलं जातं, त्यावेळी मागे येणारे "लक्ष्मी कशानं आली?" असं विचारतात, आणि जिच्या हातात सूप असतं, ती "गाई-गुरांच्या पावलांनी, सोन्याचांदीच्या पावलांनी, लेकराबाळांच्या पावलांनी" अशी उत्तरं देते.
आमच्याकडेही असेच !
पूजेच्या आधी पावलांच्या मधे कुंकवाच्या पाण्यानं हातवे पण द्यायचे असतात आणि जिथे गौरी मांडल्या जातात, त्यांच्या मागे भिंतीवरही हातवे द्यायचे असतात
क्रान्ति, आपल्या धाग्यामधे फोटोत हातवे दिसत आहेत, तशी मात्र पद्धत नाही आमच्यात!
तसेच गौरींची पोटं भरणे ही पण एक पद्धत आहे, त्यात जे काही पदार्थ केलेले असतील ते एका डब्यात भरून पायाजवळ साडीच्या आत ठेवले जातात.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
प्रतिक्रिया
बाक्रेश
गणपती
आमच्यात
हो,
मस्त
गौरी अगदी
मस्त फोटो
वा
बाक्र्या
प्रतिसाद
छान.