मस्त लेखन !!
आता माझ्या सप्लिमेंटच्या आठवणी काही सांगत बसत नाही ..
(काही काही ) लोक मला इथे सज्जन समजतात.. ;)
रेप्युटेशन जायला नको ! कसे ? :)
लिहित रहा !! :)
--अवलिया
दवबिन्दु,
लेख खूपच आटोपशीर झालाय पण आठवणींना तजेला आणायला पूरक ठरल्याने खूप भावला. पुलेशु.
पुरवणी म्हटल्यावर मला तात्काळ आठवली ती एकच आठवण.. दहावीच्या प्रिलिममधल्या भूमितीच्या पेपरची! ऑप्शनल प्रश्नांसकट अख्खा पेपर सोडवायचा ( ७ पैकी ५ प्रश्न सोडवा असे असले तरी सर्व ७ही प्रश्न सोडवायचे असा ) स्वतःशीच चंग बांधला होता. बीजगणितात डोके लावून गणिते सोडवत नुसते लिहायचेच काम असते त्यामुळे त्यात जमले वेळेत पेपर पूर्ण करणे पण भूमितीला आकृत्यांमध्ये वेळ गेल्याने शेवटचा प्रश्न अर्धवट राहिला आणि वेळ संपली.. इत्तक्का राग आलेला मला स्वतःचाच की बस्स.. एकच दणका मारला बेंचवर आणि सगळ्या (१३ की १४ झाल्या होत्या!) पुरवण्या माझ्या बाकड्याभोवती पसरल्या. दोन्ही हातात तोंड खुपसून नुसती रडारडा चालू होती माझी. सुपरव्हीजनवर असलेल्या वादेमॅडमनी समजवायचा खूप प्रयत्न केला पण उंहू.. शेवटी मॅडमनी स्वतःच पुरवण्या लावायला घेतल्या तर मी पुरवण्यांवर नाव, वर्ग, तुकडी, विषय, तारीख आणि मुख्य म्हणजे पुरवणी क्रमांक वगैरे काहीच टाकले नव्हते... त्यात वेळ जायला नको म्हणून! झालं.. समजवणे राहिले बाजुलाच..... मॅडमनी तू असा मूर्खपणाचा चंग कसा करू शकतेस असे ओरडायला सुरूवात केली. त्यांच्या ओरड्याला घाबरून रडू आवरले (तात्पुरते) आणि पेपर-पुरवण्या गोळा करून नीट क्रमाने लावून (क्रम क्रमांक पाहूनच ठरवता येतो असे नाही.. ) कर्कटकाच्या टोकावर दोर्याचे टोक ठेवून खूपसून नीरगाठ मारून त्यांच्या हवाली केला आणि सटकले वर्गाबाहेर!
प्रतिक्रिया
बा
मस्त लेखन !!
अवलीयाशेठ
आटोपशीर पण छान
एकच दणका
लै भारी... !
एक नंबर
चुचु