१.धंदा करायची इच्छा बाळगर्याला आमंत्रण लागत नाही. गुडद्यात ताकद असली की पुरे.
२. बँकेकडुन थोडे कर्ज घेतले की तो कर्ज घेणार्याचा त्रास असतो. भरपुर घेतले तर तो त्रास कर्ज देणार्या बॅकेचा असतो.
___________________________________________________________
नोकरीचा खूप कंटाळा आला. खणखणीत पगार, जेवणखाण, इतर सेवा मोफत असुनसुद्धा. असंख्य वेळा तेच तेच बोलुन अक्षरशः वैतागलेलो होतो. लोकांच्या 'टाइम्ज , मोशन, अॅक्शन 'चे प्रश्न संपायचेच नाहीत. दर दहा पेशंट मागे ४ जण 'वेळ' वाढवायच्या विनंती घेउन यायचे. ७ दिवसाच्या नोटीस ने नोकरी सोडली. साहेब वैतागला. 'स्टार बॅट्समन' रीटायर होणार होता. एवढ्या लहान वयात ही पोझीशन सोडणे हा गाढवपणा आहे हे मला पण माहीत होते. पण दुसरे काही तरी करायची प्रबळ इच्छा होती. घरी आल्यावर भावाबरोबर व्यवसाय सुरु केला.
दोन दिवसातच भावाने " आता आपण टेबलच्या दुसर्या बाजुला आहात भौ" ची जाणीव करुन दीली.
व्यवसायात सुद्धा पण विनासायास स्थिर झालो. ५ वर्षात मेन रोडला दोन दुकाने घेतली. एकात छापखाना तर दुसर्यात कागदाचा स्टॉक.
सर्व काही व्यवस्थीत चालले होते. १९८० साली शाळेत पहीला कार्यक्रम झाला. हा कीडा आजवर डसलेलाच आहे. आता त्याला इलाज नाही.
पहील्या कार्यक्रमातच'सुकड्या' भेटला. दोन वर्ष नापास झालेला होता नववी पर्यंत. बापाने धमकी दीली होती, ' नापास झालास तर *** बांबु सारीन गरम, मीरची पुड लावलेला. बाप प्युन ची नोकरी करत होता. मोठी बहीण होती लग्नाची. १० पास झाल्यावर बापाने आपल्या वशिल्याने प्युन ची नोकरी बघुन ठेवली होती. " काही पण सांगा सर, मी करतो, पण पास व्हायचे आहे" सुकड्याच्या डोळ्यात बापाची भीती दिसत होती.
बोर्ड पॅटर्न प्रमाणे ठराविक घोकंपट्टी पास व्ह्यायला पुरे असते. ती त्याला समजावली.
१९८५ साली गणपतीची घरात तयारी सुरु होती. एका सिलिंग फॅन चे प्राणोत्क्रमण झाले होते. खाली उतरलो. घरा जवळच्या एका छोट्याश्या दुकानात ' येथे पंखे,ग्राईंडर दुरुस्त करुन मीळतील्"अशी पाटी बघीतली. नविन घ्यायची कल्पना रद्द करुन दुकानात घुसलो.
अहो, घरातला एक पंखा दुरुस्त कराला का? ह्या माझ्या प्रश्नाला 'हो' ची मुळीच अपेक्षा नव्हती.
दुसर्या दिवशी पंखा दुरुस्त होउन लागला सुद्धा. घरी आल्यावर कळाले की त्या दुकानदाराने दुरुस्तीचे पैसे नाकारलेले होते.
ताबडतोब दुकानात गेलो. समोर बसलेला माणुस मला बघुन हसला. मी पैसे देउ करताच म्हणाला, " काय सर, ओळखले नाहीत, मी सुकड्या.
माझा जबडाच पडला. ते पाप्याच पितर आणि आजच्या सुकड्या मधे खुपच फरक होता.
५०% मार्क मिळवुन पास झालेल्या सुकड्याने आय.टी.आय मधे 'मोटर वायडींग' चा कोर्स पुर्ण केला होता. फावल्या वेळेत पेपर टाकून बापाला पण मदत केली होती. मुळात हातात कौशल्य असल्यामुळे यशस्वी धंदेवाईक झाला होता. मी त्याला गणपती ला आमंत्रण दीले.
नाते दृढ झाले.
" सर, धंदा वाढवायचा आहे, जरा भांडवलाचे बघा ना".
" काय करणार आहेस" मी
" गावा बाहेर वर्क शॉप टाकीन. बॅ़केत कोणी उभे करत नाही आपल्याला"
मी माझ्या एका सी.ए. मित्राला फोन केला. प्रोजेक्ट रीपोर्ट बनवायला सांगितले. दोन दिवसात प्रोजेक्ट रिपोर्ट बनला.
तो घेउन ओळखीच्या राष्ट्रीयकरण झालेल्या बॅकेत गेलो. ह्या बॅ़केतुन मी रुपये २५००० ची सुशिक्षित बेकार योजना घेतली होती. रुपये ६२५० ची सब्सीडी.(८० च्या द्शकात फार मोठी रक्कम)
त्याच योजनेत 'सुकड्याला" बसवले. चार दिवसात नकार आला. प्रोजेक्ट रिपोर्ट मधे काही तरी त्रुटी होती. मी रीपोर्ट बघीतला.
मॅनेजर ने I.R.R. DSR वर प्रश्नचिन्ह केले होते. मी नीट विचार केला. आणि गेलो सी.ए. कडे.
त्याची चुक नव्हती. त्याला जे आकडे मिळाले त्यावर त्याने रिपोर्ट बनवला होता.
मी त्याला भंगार विक्रि चा आकडा नसल्याची आठवण करुन दीली.
तो आकडा घालताच प्रोजेक्ट रिपोर्ट एकदम फिट्ट झाला.
सुकड्याला कर्ज मंजुर झाले.
भाड्याच्या जागेत वर्क शॉप सुरु केलेल्या ' सुकड्या' आज एका एम्.आय.डी.सी त कारखानदार आहे.
जाता जाता: सी ए. मित्र मला म्हणाला, " साल्या चोच्या, तुला काय माहीत रे आय आर आर"?
" तु मुंबई विद्यापिठाचा सी.ए. मी मुंबई विद्यापिठाचा बी.एस्.सी आणि ..........विद्यापिठाचा एम्.एस्.सी. म्हणुन. ह्या विद्यापिठात जे शिकलो त्यात प्रोजेक्ट रिपोर्ट वाचायला कॉमर्स करावे लागत नाही" - मी
वाचने
5647
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
I.R.R
आवडला....
कित्येक तथाकथित engineers इतके मठ्ठ प्रश्न विचारतांना पहिलत ..
In reply to आवडला.... by मनिष
+१ पॉईंट ब्लँक विश्लेषण संजयराव!
In reply to कित्येक तथाकथित engineers इतके मठ्ठ प्रश्न विचारतांना पहिलत .. by संजय अभ्यंकर
मान्य...
In reply to कित्येक तथाकथित engineers इतके मठ्ठ प्रश्न विचारतांना पहिलत .. by संजय अभ्यंकर
सहमत!
In reply to मान्य... by मनिष
आता मिळत नाही...
In reply to सहमत! by संजय अभ्यंकर
मास्तर!
+१
In reply to मास्तर! by अवलिया
मास्तर!
मास्तर,
१+
In reply to मास्तर, by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to १+ by विनायक प्रभू
+३
In reply to +२ by धमाल मुलगा
सहमत ! एकदम
In reply to +३ by बिपिन कार्यकर्ते
+५
In reply to सहमत ! एकदम by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to मास्तर, by ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
एकदम समर्पक प्रतिसाद
In reply to मास्तर, by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>स्वगत --
In reply to एकदम समर्पक प्रतिसाद by संदीप चित्रे
सहमत!
In reply to मास्तर, by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख आवडला...आता मास्तरांना नावे ठेवायला जागा नाही.
वा! मस्त
ग्रेट! कोण
सही रे सही!
मास्तर मस्तच!
म हा न ! !
सर, I.R.R. DSR
फॉर्म
मास्तर,
लेख आवडला.
मास्तर,