पाणीपुरीराव,
आपण रचलेल्या संस्कृत सुभाषितांचे मिपावर स्वागत!
परंतु या सुभाषितांचा मराठीतूनही अर्थ दिलात तर आमच्यासारख्या संस्कृतातलं शष्पही न समजणार्यांकरताही त्याचा फायदा होईल!
अवांतर - मूळ शब्द काय आहे? शष्प की शश्प? की आणखी काही? आम्ही आपलं ऐकीव माहितीच्या आधारे तो शब्द लिहिला आहे! :)
तात्या.
मुळात शश्प शब्दाचा अर्थ काय?
जाऊ द्या पेठकरसाहेब, आपण या विषयावर पुन्हा कधीतरी बोलू! :)
मिपावर आता या विषयावर अधिक चर्चा करणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही...:)
तात्या.
अस॑च काहीस॑ म्हणतात ना स॑स्कृतात "छान" ला?
हे आपल॑ प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून, नाहीतर बाकी त्यातल॑ ओ की ठो कळल॑ नाही बॉ आपल्याला...
स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला.
असो,
आपला
-(गिर्वाणभारती न झेपणारा क्षुद्रातिक्षुद्र) ध मा ल.
स॑स्कृतच्या तासाला गुर्जी॑च्या लै छड्या खाल्या पण रेडिओवरच्या स॑स्कृत बातम्या पण काय झेपत नाहीत आपल्याला.
सही बोल्लासा धमालभौ,
आपल्याला बी संस्कृतातलं काय बी समजत नै! :)
आपला,
(संस्कृतला जाम टरकून असणारा) तात्या.
मला संस्कृत भाषा आवडते. पण तुमच्या इतका अभ्यास नाहिये. मार्क मात्र मी दहावीत संस्कृतला एकदम छान मिळवले होते. मला सुभाषितांचं संग्रह करायला आवडतो. आपण या सुभाषितांचा अर्थ सांगितलात तर बरे होईल. मला आवडेल आणखी काही सुभाषिते आपल्याकडून शिकायला.
- प्राजु
रागा विषयी संस्कृत सुभाषीत About Anger. उत्तमस्य क्षणिकम् कोपम्,मध्यमस्य घटी दो घटी कनिष्टस्य दिवारात्रो,अधमस्य दिने दिने. ============================= अर्थात्, उत्तम स्वभावाच्या मनुष्याचा राग क्षणभर,मध्यम् स्वभावाच्या मनुष्याचा राग घटकाभर,कनिष्ट स्वभावाच्या मनुष्याचा राग एक दिवस , अधम स्वभावाच्या मनुष्याचा राग खूप दिवस टिकतो.
छान !!
मराठी अर्थ?
आम्ही तर...
शश्प की शष्प....
जाऊ द्या!
आम्हीही शेपूट...
साधु...साधु..
:)
सुष्टु..
हो ना
रागा विषयी संस्कृत सुभाषीत
About Anger.
उत्तमस्य क्षणिकम् कोपम्,मध्यमस्य घटी दो घटी
कनिष्टस्य दिवारात्रो,अधमस्य दिने दिने.
=============================
अर्थात्, उत्तम स्वभावाच्या मनुष्याचा राग क्षणभर,मध्यम् स्वभावाच्या मनुष्याचा राग घटकाभर,कनिष्ट
स्वभावाच्या मनुष्याचा राग एक दिवस , अधम स्वभावाच्या मनुष्याचा राग खूप दिवस टिकतो.