वाचनीय आणि चिंतनीय..

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
31 May 2009 - 7:44 pm
गाभा: 

म. टा. मधील हा छोटासा लेख चिंतनीय आहे.

मुद्दा: "...काही वर्षांपूर्वी ज्या प्रकारचे वाद निर्माण करण्याचे धाडसही कोणी केले नसते, आणि केलेच असते तर बहुसंख्य समाजानेच उपेक्षेने किंवा सक्रिय निषेधाने त्यांना गप्प बसवले असते, असे वाद वारंवार निर्माण होताना दिसू लागले आहेत..."

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

31 May 2009 - 7:58 pm | नितिन थत्ते

सहमत.

कधीकधी समाज पुढे जातो की मागे असा मनात गोंधळ उडतो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

पाषाणभेद's picture

31 May 2009 - 8:13 pm | पाषाणभेद

मी पण स्कायवॉक च्या बातमीनंतर त्या विरूद्ध येथे लिहीणार होते. पण मी आपल्या मुद्दयाच्या उत्तरार्धाचा विचार केला आणि गप्पा बसलो.

गणपतीच्या मुर्तीच्या उंचीचा मुद्दा तर बिनडोकपणाचा आहे. तसाच मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाबाबत आहे. महाराजांसारख्या महान व्यक्ती कोणा एका समाजाच्या नव्हत्या. (खरे तर स्मारकाची गरजच काय? अमेरीकेने केले म्हणजे आपण केले पाहीजे काय? आपले काय पाहून त्यांनी कोणती गोष्ट बांधली आहे काय ? त्यापेक्षा त्यांची देशभक्ती, आणि महाराजांचे महाराष्ट्रप्रेम आमलात आणा ना. )

शेवटी श्रद्धा महत्वाची. टिळकांनी ज्या उद्देशासाठी गणपती उत्सव सुरू केले तो उद्देश साध्य झाला (स्वराज्य) आहे. काही लोक गणपतीत सामाजीक काम होते असे म्हणतील तर त्या साठी किती पैसा (सर्वसामान्य जनतेचा आणि कंपन्यांचा / धनदांडग्यांचा काळा पैसा) खर्च होतो. किती टक्के मंडळे हिशोब देतात? मांडवात वरती गणपती आणि त्याच्या खाली पत्ते कोण खेळतात ? गांजा कोण पितात ? गणपतीला हे चालते का?

डेकोरेशन च्या बाबतीत (काही अपवाद सोडून ) म्हणायचे झाले तर तो एक व्यवसाय झालाय. तेच ते डेकोरेशन दर वर्षी एक दुसर्‍या मंडळाकडे फिरत राहते. डेकोरेशन भाड्याने मिळते. गणपतीत टाकलेले मांडव नवरात्रापर्यंत तसेच राहतात. रहदारीला अडथळा होतो. रस्ते खोदले जातात. हे सगळे कमी झाले पाहीजे.
सरकारने या बाबतीत लाउडस्पीकर सारखा नियम केला पाहिजे. (बाकी सरकार म्हणजे काय ? तुम्ही आम्हीच निवडून दिलेले निर्बूद्ध टाळकेच ना? )

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु's picture

31 May 2009 - 8:37 pm | प्राजु

पाषाणभेद यांच्याशी १००% सहमत आहे..
प्रतिसाद आवडला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनिष's picture

1 Jun 2009 - 11:52 am | मनिष

मी पण १०१% सहमत. त्या सार्वजनिक उत्सवांनी डो़क्याला वीट आलाय.

चिरोटा's picture

1 Jun 2009 - 1:48 pm | चिरोटा

शिवाय गणपती आगमन्/विसर्जनाच्या वेळेस (मुंबईत) जे गणपतीसमोर हिडीस डान्स केले जातात त्यावर बंदी आणली पाहिजे. लोकमान्य टिळकानी आताचे गणेशोत्सवाचे स्वरुप बघितले असते तर कपाळाला हात मारुन घेतला असता.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न