Skip to main content

मौन तुझे

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 23/05/2009 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
बोल एकदा काहितरी रे मौन तुझे घायाळ करी रे कातर हळवी सांज गातसे तरल विराणी दर्दभरी रे श्रावणातही तळमळते मी झेलुनिया अलवार सरी रे जाणवते ती तुझी असोशी इथे दाटतो श्वास उरी रे देहच उरतो माझ्यापाशी मन घुटमळते तुझ्या घरी रे अंतरण्याने अंतर वाढे मिटव दुरावा हा जहरी रे पंचप्राण ज्यांच्यात गुंतले छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2224
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हळुवार हुरहुर जगवणारे गीत !!

जणू काही ही एक विराणीच. श्रावणातही तळमळते मी झेलुनिया अलवार सरी रे फार आवडले.

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे मस्तच! :)

अतिशय सुंदर! क्रांतीताई, तुमच्या कविता/गझल तशाही छान लयीत असतात! ही कविता तर स्वत:च नाद लेवून आलेली आहे.. खूप छान!! शुभेच्छा! :) राघव

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे सुंदर... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

छानच कविता आहे. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)