✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाललीला

आ
आपला अभिजित यांनी
Wed, 04/15/2009 - 23:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5352 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

होतं असं बाबा..

प्राजु
Wed, 04/15/2009 - 23:31 नवीन
मी ही याच स्टेजमधून जाते आहे. लेकाने परवा उच्छाद मांडला होता. म्हणाला, "आई , व्हाय डोंट वी चेंज अवर लास्ट नेम? आय वॉन्टू चेंज माय लास्ट नेम. माय फ्रेन्ड्स कॅनोट प्रोनाऊन्स इट." असं म्हणत स्वत:च सांगितलं, " आज पासून मी अथर्व जॉर्ज आहे.." त्याची समजूत काढता काढता डोकं भणभणायला लागलं. #o माझ्या नावाने एक पत्र आलं.. त्यावरचं माझं नाव वाचलं.. आणि म्हणाला, "हेऽऽ धिस इज माय लास्ट नेम.. हाऊ कम इट्स योर्स?" त्याचं आडनाव हे माझंही आडनाव आहे काही केल्या पटेना त्याला. :( काय करायचं आता? :? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान!

आपला अभिजित
गुरुवार, 04/16/2009 - 10:20 नवीन
"हेऽऽ धिस इज माय लास्ट नेम.. हाऊ कम इट्स योर्स?" छान! तुझ्या डोक्यावर मिर्‍या वाटणारेय लवकरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

खरं आहे.

मयुरा गुप्ते
गुरुवार, 04/16/2009 - 01:33 नवीन
माझ्या भाचीने तर सरळ विचारलं होतं, तिच्या पुर्ण नावा मध्ये तिर्थरुपांच नाव कशाला? नुसतं पहीलं नाव आणि आडनाव का नाही. काय बरं सांगाव? बुद्धीमत्ता परिक्षेमध्ये पेपरात तिच्या बाबाला 'Odd man Out' म्हणुन तीने बाहेर काढलं होतं...आता बोला. सगळ्यांना खरतर धडा होता,कि ओफीस एके ओफीस केलं कि मुलं पण आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवतात्.....काय म्हणता खरं की नाही?
  • Log in or register to post comments

तिचं उत्तर

मदनबाण
गुरुवार, 04/16/2009 - 02:12 नवीन
तिचं उत्तर - "मग मी त्याला सांगेन ना, हा गलगले नि हा शाहरुख खान म्हणून!' हा...हा...हा स्मार्ट गर्ल. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

आपल्या

रेवती
गुरुवार, 04/16/2009 - 03:41 नवीन
आपल्या मुलीचा फोटो आधीच पाहिल्यामुळे हे सगळे उद्योग कोण करतय हे लगेच डोळ्यासमोर येतं. वरील अनेक उदाहरणातूनही ती सगळं काही तिच्या बालवयानुसारच करते आहे असं वाटतय.;) हीच तक्रार तिच्या आजी आजोबांसमोर करून दाखवा, लग्गेच नातवंडे चूक नाहीत हे दाखवून देतील. अश्यावेळी आपण गप्प! रेवती
  • Log in or register to post comments

चहाटळ

विनायक प्रभू
गुरुवार, 04/16/2009 - 06:05 नवीन
असे आमच्या मनात काहीही नाही हॉ. लेक लय भारी. काळजी घ्या. ऍनवेळी अवसानघात व्हायचा, मग त्या प्रश्नाची उत्तरे देणार कोण? तिला मारामारी आवडत नाही म्हणुन म्ह्टले हॉ.
  • Log in or register to post comments

ऍनवेळी

आपला अभिजित
गुरुवार, 04/16/2009 - 10:21 नवीन
ऍनवेळी अवसानघात व्हायचा, मग त्या प्रश्नाची उत्तरे देणार कोण? इश्श! काहीतरीच ब्वा तुमचं! :\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

आणि हो

विनायक प्रभू
गुरुवार, 04/16/2009 - 06:09 नवीन
पोरगी म्हणु नका हो. लेक म्हणावे.
  • Log in or register to post comments

आणि हो!

आपला अभिजित
गुरुवार, 04/16/2009 - 10:23 नवीन
मी `कार्टी' पण म्हटलंय. त्याचं काय? (अरेच्चा! `पोरटी' म्हणायचं राहिलं का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

हे हे हे !!!

अनिल हटेला
गुरुवार, 04/16/2009 - 06:18 नवीन
बाललीला आवडल्या !! :-)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त!

राघव
गुरुवार, 04/16/2009 - 07:53 नवीन
ती घरात असतांना डोकं उठतं असं तुम्ही कितीही म्हणालात तरी, २ दिवस,ती घरी नसल्याची चुटपुट तुम्हाला लागलेली कळाली आम्हाला. :) माझ्या कडून तिला मनापासून शुभेच्छा! (तुम्हाला नाय हां!! ;) ) (बालक)राघव
  • Log in or register to post comments

ती घरी

आपला अभिजित
गुरुवार, 04/16/2009 - 10:25 नवीन
ती घरी नसल्याची चुटपुट तुम्हाला लागलेली कळाली आम्हाला. अगदी खरं! एवढे कसे हो तुम्ही मनकवडे? आज दुपारी येईल पिडायला! बहुधा, ४/५ गोष्टींची लाच दिल्याशिवाय गप्प बसायची नाही. पण आईनं नवी भातुकली आणल्येय. तिच्यात आठ दिवस जातील बहुधा.
  • Log in or register to post comments

बाललीला

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/16/2009 - 10:42 नवीन
बाललीला एकदम मस्तच :) त्यातही स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे यातच जीव जातो. = कोणाचा ? ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

परा,

आपला अभिजित
गुरुवार, 04/16/2009 - 10:54 नवीन
असले भोचक प्रश्न विचारून माझ्यासारख्या `प्रतिष्ठित' व्यक्तीची अब्रू वेशीवर टांगणं तुम्हाला शोभत नाही. तुमचा जाहीर निषेध! (संपादकांनी क्रुपया अशा प्रक्षोभक प्रतिक्रियांची नोंद घेऊन अशा सदस्यांना भर चौकात भांडी घासण्याची शिक्षा लावावी. वर अशा कार्यक्रमांना त्यांच्या ऑफिसातल्या नवथर, आकर्षक टवळ्यांना बोलावण्याचीही व्यवस्था आम्ही करू!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बाललीला

ऋष्या
गुरुवार, 04/16/2009 - 10:48 नवीन
आवडल्या. चार-पाच वर्षे वयाची पिल्लं ज्या ज्या घरात आहेत तिथे थोड्याफार फरकाने असेच चाललेले असते. त्यात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या. मग काय मजाच मजा. ही कारटी प्रश्न विचारून केव्हा आपले दात आपल्याच घशात घालतील सांगता येत नाही. "हे असं का?" हा आवडता प्रश्न. लॉजिकल आणि पटण्यासारखे उत्तर देता देता नाकी नऊ येतात. तुमच्या लेकीला अनेक आशिर्वाद.
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
गुरुवार, 04/16/2009 - 13:13 नवीन
:) छोकरीचा फोटो, तिचे प्रश्न, बाललीला आणि त्याचं तुम्ही केलेलं सहज वर्णन, सगळंच मस्त! मुलं मोठी झाल्यावर ही मजा नाही येत पण! अशा वेळी त्यांच बालपण आठवत रहात. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

मुलगी गोड

जागु
गुरुवार, 04/16/2009 - 14:06 नवीन
मुलगी गोड आहे. माझी मुलगीही असेच काही काही प्रश्न विचारत असते. आणि आपण तिला काहीही प्रश्न विचारले तरी काहीही जुळवुन ती उत्तर देते. अग्गुबाई ढग्गूबाईची सिडी मी तिच्यासाठी नेली तेंव्हा तिने त्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारला. हल्ली सकाळी ती माझ्याबरोबर पुजा करताना असते तेंव्हा मी देव पुसण्यसाठी खाली पाटावर ठेवते जरा इकडे तिकडे झाल की लगेच माझी चुक काढते. तिला गाण्याची खुप आवड आहे. रोज आम्ही जेवायला बसलो की हिचा प्रोग्राम सुरू. मग स्वत: अनाउन्स करते आता आपल्या समोर येत आहे - पहिला स्वतःच नाव मग मुग्धा होते, सगळे पंचरत्न होते. रविवारी स्वप्नील बांदोडकरचा प्रोग्राम बघितला आणि मला म्हणाली आई आता परत स्वप्नील बांदोडकरचा प्रोग्रॅम असला की मला नेशील ? मी त्याच्या स्टेजवर जाऊन गाणे बोलेन आणि नाचेन पण. मी हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. परवा तिच्या मामाकडे गेली. आम्ही रात्री तिला घेउन येणार होतो. पण ती तिथेच झोपली. आम्ही तिला १२.१५ ला आणायला गेलो. कारण तिच्या बाबांना आणि मला दोघांनाही घर खायला उठल.
  • Log in or register to post comments

बाललीला आवडल्या..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/16/2009 - 15:16 नवीन
सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments

केविलवाणा चेहरा

श्रावण मोडक
गुरुवार, 04/16/2009 - 15:28 नवीन
या 'मुग्धा'चा चेहरा केविलवाणा? डोळ्यांपुढं तो आला तेव्हा कसंसंच झालं यार...
  • Log in or register to post comments

बुवा ला बोलावु का?

कुंदन
गुरुवार, 04/16/2009 - 19:09 नवीन
पुर्वी माझी लेक ( वय २० महिने) , दुध प्यायला वा जेवायला कुरकुर करायची तेंव्हा आम्ही तिला सांगायचो"लवकर दुध पी/जेवण कर्,नाहीतर बुवाला बोलाविन". आता तर अधुन मधुन तिच मला विचारते "पपा, बुवाला बोलावु का?"
  • Log in or register to post comments

आली रे आली!

आपला अभिजित
गुरुवार, 04/16/2009 - 22:34 नवीन
कन्या दुपारी घरी डेरेदाखल झाली. आईनं आणलेल्या नव्या भातुकलीत रमून गेली. :) "पोळ्या' करायला पीठ मागून घेतलं. मग त्यात पाणीबिणी घालून घरभर पसारा करून ठेवला. "पराठे' करायला म्हणून माझ्याकडे पिठात घालायला काहीतरी मागत होती. घरातला बेळगावी "कुंदा' तिला खायला दिला होता. तोच मिसळायला लागली पिठात. म्हणून मग तिला हाताशी आलेली मोहरी दिली. नंतर मी वामकुक्षीकडे वळलो. मध्येच मला उठवायला आली - "बाबा, मी काय खाऊ केलाय बघा!' तसंच झोपेतून मला उठवून तो "खाऊ' पोटभर खायला घातला. काय असेल तो? तिला टेबलवर ठेवलेलं खोवलेलं खोबरं मिळालं होतं. ते, त्यात जवसाची चटणी आणि कच्ची मोहरी! बरं, "नाही' म्हणायची सोय नव्हती. तीन-चार चमचे खायलाच लागला! :O घरी आल्यावर आईलाही हा "प्रसाद' भरवला!! :S दुपारी मी तिच्याशी जरा वेळ खेळून झाल्यावर तिला विचारलं, "मी जरा झोपू का?' तर मला म्हणते - "झोपा बाईसाहेब, झोपा! तेवढाच तुमचा उपयोग आहे!!' :(
  • Log in or register to post comments

"झोपा

टिउ
Fri, 04/17/2009 - 00:34 नवीन
"झोपा बाईसाहेब, झोपा! तेवढाच तुमचा उपयोग आहे!!'
=)) बाकी मुलं हे जे काही आगाऊ बोलतात ते त्यांनी घरातच कधीतरी ऐकलेलं असतं...ह.घ्या!
  • Log in or register to post comments

बाकी मुलं

आपला अभिजित
Fri, 04/17/2009 - 07:57 नवीन
बाकी मुलं हे जे काही आगाऊ बोलतात ते त्यांनी घरातच कधीतरी ऐकलेलं असतं...ह.घ्या! अजिबात ह. घेणार नाही!! एखाद्याचे असे जाहीर वाभाडे काढणं तुम्हाला अजिबात शोभत नाही! तुमचंही एके दिवशी लग्न होईल, असा शाप मी तुम्हाला देत आहे!! X( आणि त्यावर उ:शाप नाही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

हाहाहा

बेसनलाडू
Fri, 04/17/2009 - 00:39 नवीन
मजेशीर प्रकार आहेत एकंदरीत :) (बालसुलभ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

बाललीला

शितल
Fri, 04/17/2009 - 01:29 नवीन
बाललीला मस्त आहेत.:) माझ्या लेकाच्या लिला तर चार लोकांच्या समोर सांगण्या सारख्या नाहीत. :(
  • Log in or register to post comments

लीला

आपला अभिजित
Fri, 04/17/2009 - 07:51 नवीन
लीला कोण? मैत्रीण का?? ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा