आलेल्या सगळ्या बायकांना हळदीकुंकु लावणे,अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे,डाळ-पन्हं आणुन देणे ही सगळी कामं मी आणि माझी बहीण वाटुन घ्यायचो...
मी पण नोस्ताल्गिक झ्हाले ;;)
चुचु
आईशप्पथ .. हे वाचून मी काय काय नाय झालो त्याचा विचार करतोय =)) मिपावर कोणी ज्ञाणेश्वर आहे का हो ? ह्या अवघड आणि फक्त महाज्ञाणी लोकांना समजणार्या लिपीचं सुबोध मराठीत कोणी भाषांतर करेल काय ?
- टर्फल टेटे टरटे
अबे, आपण स्निग्धहस्त होताना नाही का नोस्ताल्गिक होत ? (की नोस्ताल्गिक झाल्यामुळे स्निग्धहस्त होतो ? जे काही असेल ते. पण स्निग्धहस्ततेचा अणि नोस्ताल्गिकतेचा संबंध आहे, हे नक्की.) तसेच चैत्र आला की ह्या बायका नोस्ताल्गिक होतात.
- मल्मल मीमी मलाठी
-- मिसळभोक्ता
मनाचा एक कप्पा अशा आठवणींनी नेहमीच सुंगंधीत झालेला असतो... काही कारणाने त्या सुगंधाची प्रचिती येते आणि मग तो सुगंधीत राहण्या मागचं कारण आपण शोधून काढतो आणि त्यातून असा उत्तम लेख जन्माला येतो...
निव्वळ सुरेख!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
स्वातीताई,प्रतिसादाबद्दल धन्यु.
रेवती,
आता दिवस बदलले म्हणजे इतके बदलले की आपण ऑनलाइन हळदीकुंकू करतो.
खरं आहे तुझं..पण हेही नसे थोडके :-)
आणि या ऑनलाईन हळदिकुंकवामुळेच तर लेख लिहायची प्रेरणा मिळाली..
तात्या महाराज की जय :-)
प्राजु,
मनाचा एक कप्पा अशा आठवणींनी नेहमीच सुंगंधीत झालेला असतो... काही कारणाने त्या सुगंधाची प्रचिती येते आणि मग तो सुगंधीत राहण्या मागचं कारण आपण शोधून काढतो आणि त्यातून असा उत्तम लेख जन्माला येतो...
ईतक्या सुरेख प्रतिसादाबद्दल तुझे खुप खुप आभार :-)
माझी आई देखिल चैत्रातले हळदीकुंकु खूप मोठ्या प्रमाणात करायची. त्यामुळे आई आणि माझी मोठी बहीण ह्यांच्याबरोबरीने आम्ही तिघे भाऊदेखिल ह्या हळदीकुंकवाच्या तयारीत मदत करत असू. आंब्याची डाळ करण्यासाठी आदल्या रात्री भिजत टाकलेली चण्याची मोठ्ठे पातेलेभर डाळ खलबत्त्यात कुटण्याचे किंवा कधी पाट्यावर वरवंट्याने वाटण्याचे आणि कैर्या किसण्याचे मेहनतीचे काम आम्ही तिघे भाऊ करत असू. तसेच बाजारातून फुले आणणे,पन्ह्यासाठी लागणार्या कैर्या, बर्फ इत्यादि आणणे वगैरे साठी आई-बहिणीबरोबर मोठ्या थोरल्या पिशव्या वाहून आणण्याची कामंही करत असू.
ही अशी कच्ची तयारी झाली की मग मात्र आमचा खाऊचा वाटा आम्हाला देऊन घराबाहेर पिटाळले जायचे. तिथे बायकांमध्ये आमचे काय काम? खरं ना? पण मी खूप लहान होतो तेव्हा एकदा दोनदा मोठ्या बहिणीचा तिच्या लहानपणचा फ्रॉक घालून हळदीकुंकवासाठी आलेल्या बायकांना अत्तरदाणीतले अत्तर लावणे आणि गुलाबदाणीतून त्यांच्यावर सुगंधित गुलाबपाणी शिंपडण्याचे काम केल्याचेही आठवतेय. :)
स्मिता, आठवणी मस्तच आहेत तुझ्या. तुझ्या आठवणींमुळे मी जणू माझ्या बालपणात पोचलो.....पार ४५-५० वर्षांपूर्वीचे सगळे आठवायला लागले. अर्थात माझे सगळे आयुष्य मुंबईतच गेले त्यामुळे नदी,घाट ,देवळे वगैरे सोडले तर बाकी उत्साह आणि आनंद तोच होता.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
पण मी खूप लहान होतो तेव्हा एकदा दोनदा मोठ्या बहिणीचा तिच्या लहानपणचा फ्रॉक घालून हळदीकुंकवासाठी आलेल्या बायकांना अत्तरदाणीतले अत्तर लावणे आणि गुलाबदाणीतून त्यांच्यावर सुगंधित गुलाबपाणी शिंपडण्याचे काम केल्याचेही आठवतेय.
लय भारी, पन फोटू कुठाय ????
(हल्ली त्याला क्रास-ड्रेसर म्हन्तात. पण मुलांना फ्रॉक घालण्यास बंदी, म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीवर घाला आहे.)
-- मिसळभोक्ता
प्रमोदजी,
आंब्याची डाळ करण्यासाठी आदल्या रात्री भिजत टाकलेली चण्याची मोठ्ठे पातेलेभर डाळ खलबत्त्यात कुटण्याचे किंवा कधी पाट्यावर वरवंट्याने वाटण्याचे आणि कैर्या किसण्याचे मेहनतीचे काम आम्ही तिघे भाऊ करत असू.
अरेच्चा या सगळ्या आठवणी लिहायच्या राहुन गेल्या....:-) पण तुम्ही लक्षात आणुन दिल्याबद्दल आभारी आहे....
आम्ही पण मिक्सर असुनसुद्धा खलबत्त्यात डाळ कुटायचो....कारण आईचं असं म्हणणं आहे की मिक्सर मधे वाटलेल्या डाळी पेक्षा खलबत्त्यात कुटलेली डाळ जास्त चवदार लागते....तेव्हा तिला मी हसायचे...पण आजकाल मलासुद्धा मिक्सर वर केलेल्या डाळीत काहितरी कमी आहे असं वाटतं...कमी म्हणजे काय तर आईच्या डाळीसारखी होत नाही :-)
असो..
सगळ्या आठवणी लिहायला सुरुवात केल्यावर माझी ईतकी धांदल उडाली....की काही गोष्टी लिहायच्याच राहुन गेल्या.पण तुम्ही आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)
माझ्या माहीती प्रमाणे आंबोळी ही आंबोळी नसून आंबोळा आहे
हम्म्....मग आंबोळी हे नाव जरा बदलायला हवं ;-)
"आंबोळी" पेक्षा "डोसा" नाव घेउ शकता..."ती आंबोळी"..."तो डोसा" :-)
आंबोळी म्हणजे तु "बॉम्बे उपहारगृहाची" आंबोळी का
हो (का नंतरचा गं शिताफीने कॉपी केलेला नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच)
आंबोळी अगं माझ्याशी मैत्री करशील का गं ?
(सँडल च्या धरतीवर) कंदील पाहिला का माझ्या कडचा?
तु मेंदु वडा नाव घे त्या पेक्षा !!
आंद्या त्यापेक्षा पिंड कसे वाटतय? घेउ का?
(धारी)आंबोळी
अहाहाहा .. काय सुरेख गाव जगवुन आणलात !!
>>अचानक अमच्या शाळेतल्या सगळ्या भिंती गायब झाल्या आहेत...बेंच काढुन टाकले आहेत आणि त्याऐवजी सगळीकडे हिरवळं पसरली आहे...शाळेच्या वरचे छतं अचानक उडुन गेले आहे...आणि खांबांची मोठमोठी झाडे झाली आहेत...असं काहीतरी वाटायला लागयचं...घाट म्हणजे जणु दुसरी शाळाच...
अ वा क !!
अत्यंत मोहक कल्पना .. चित्रदर्शी !!
बाकी लहानपणी हळदीकुंकवाला ने नेहमी हडळीकुंकु म्हणायचो :D
आत्त्या मावश्या बळजबरी इकडे तिकडे न्यायच्या मला .. माझे सगळे लक्ष लुटायच्या वस्तुंकडे असायचे .. छानसे स्केच पेनवैगेरे असेल तर आनंदाला पारावार रहायचा नाही !!
माझ्याकडे ह्या आठवणी नाहीत ह्याचे कधी कधी दुखः वाटते :(
खरं तर लहानपणी आमचे बाबा कडक होते त्यामुळे शक्यतो असल्या कार्यक्रमाला मला कधीच जाऊ दिले नाही म्हणायचे कशाला बायकांच्या कामात लुडबुड करायची ;) पण हदगा व फुगडी खुप खेळलो होतो हे आठवतं बाबांची नजर चुकवून गल्लीतील मुलीं सोबत कोल्हापुर मध्ये..... !
ते काय तरी होतं अलंमा पैलमा.. देवाच्या.. आता आठवत नाही आहे ! पण मजा होती... शाळेत पण मुली हदगा खेळत हे आठवलं !
* हगदा असे काही तरी नाव होते नक्की ते पण आठवत नाही आता !
ते काय तरी होतं अलंमा पैलमा.. देवाच्या.. आता आठवत नाही आहे ! पण मजा होती... शाळेत पण मुली हदगा खेळत हे आठवलं !
* हगदा असे काही तरी नाव होते नक्की ते पण आठवत नाही आता !
अहो राजे....एकच शब्द दोन ठिकाणी वेगवेगळा लिहिलात आणि अर्थाचा अनर्थ केलात कि हो.... :-) :-)
हगदा.... =)) अरेरे..काय हा शब्दाचा अधःपात.... =))
असो...
खरा शब्द हादगा असा आहे..आणि त्याला भोंडला पण म्हणतात...
तुम्ही आपलं यापुढे "भोंडला" असं लक्षात ठेवा :-)
-स्मिता
=))
स्वारी स्वारी !
लक्ष्यात नाही आली चुक मी शब्द आठवण्याच्या चक्कर मध्ये टाईप मिस्टेक केली बघा ;)
हादगा बरोबर.... डब्ब्यात कुठला तरी पदार्थ ठेवत व त्याचे नाव शोधायचे असे काही तरी :D
स्मिता,
खूप छान फुललाय तुझा चैत्र या लेखात!! खूप छान वाटले वाचतांना. कर्हाड अगदी जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहिले. घाटावरचे आल्हाददायक वातावरण, तिथल्या कृष्णामाईच्या मंदिरातले साधे आणि कुठल्याही अवडंबराविना पुलकित करणारे मांगल्य, पुलाखालून संथ वाहणारी कृष्णामाई....सगळे वर्णन अगदी सुरेख झाले आहे. मन अगदी उडत-उडत ८-१० वर्षे मागे गेले आणि पटकन कृष्णामाईच्या तीरावर जाऊन विसावले. छोट्या गावातला साधेपणा, तिथली मनाला भावणारी आयुष्याची संथ लय आणि हाती आलेल्या क्षणांचा पुरेपूर आनंद मिळवून देणारा निवांतपणा आठवून थोडं गलबलल्यासारखं झालं....पुण्यात हे सुख नाही. तसं पाहिलं तर सुख हे बाकी कशातच नसतं; ते मनात असतं. ते शोधायला वेळ लागत नाही; दृष्टी मात्र लागते.
अजून येऊ दे कर्हाडवरचे लेख!
--समीर
स्मृतीरंजन फार म्हणजे फारच आवडले. अगदी कर्हाडचे चित्र डोळ्यांसमोर उभे केलेत. प्रीतीसंगम, समाधी, वाळवंट, देऊळ वगैरे ... फारच छान! ज्यांनी कधी गावचे सुख अनुभवले नसेल, त्यांनी अगदी हे वाचून समाधान करून घ्यावे असे लेखन. अभिनंदन!
(शहरी)बेसनलाडू
बाकी चैत्र म्हटला की मला जीएंचा चैत्र प्रकर्षाने जाणवतो.
(वैशाखी)बेसनलाडू
प्रतिक्रिया
आलेल्या
नोस्ताल्ग
अबे
>>>माझ्या
मस्त
पर्नल,वल्ल
वा..
मस्त
अतिशय सुरेख!!
स्वातीताई,
माझ्याही आठवणी जागृत झाल्या.
फोटू ?
डब्बल
प्रमोदजी, आ
स्मिता, कर्
आंबोळी,
माझ्या
ठ्ठोssss
माझ्या
अगायायाया
आंबोळी
यवढ्या
अहाहा ..
माझ्याकडे
हसुन फुटले...
स्वारी
सु रे ख ले
आनंदयात्र
खूप सुंदर!!
समीर..
काय अप्रतिम लिहिलंय!