✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताजे व उत्तम मासे कोठे मिळतील ?

म
मि.इंडिया यांनी
Fri, 04/03/2009 - 13:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8464 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

हर्णे बंदरावर

सागर
Fri, 04/03/2009 - 14:25 नवीन
हर्णे बंदरावर खूप उत्तम प्रकारचे पापलेट , सुरमई, किंग प्रॉन्स, आणि उत्तम दर्जेदार लॉब्स्टर मिळतात सकाळी सकाळी गेलात तर स्वस्तात पापलेट ची करंडी घेऊन याल :) तिथे लिलावात मासे विकले जातात. सागर अवांतर : ताजे व उत्तम मासे कोठे मिळतील? हे शीर्षक वाचुनच "समुद्रात" हे उत्तर सुचले होते ;)
  • Log in or register to post comments

मासे

चिरोटा
Fri, 04/03/2009 - 14:53 नवीन
मासे कुठे चान्गले मिळतील हे आपल्याशिवाय कोणाला जास्त माहित असणार ,सागर? भेन्डि. क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

खरे आहे

सागर
Fri, 04/03/2009 - 15:19 नवीन
हॅ हॅ हॅ :) सत्य वचन... ;) (स्वतःच्या पोटात माशांची काळजी घेणारा) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

असेच म्हणतो

संदीप चित्रे
Fri, 04/03/2009 - 19:04 नवीन
मी हर्णै बंदरावर मासे घेतले होते एका सकाळी आणि ते ताजे म्हणजे ताजेच होते ! (अवांतर : त्याइतकी चांगली कोलंबी आधी फक्त एकदा मिळाली होती -- गणपती पुळे इथे मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून परत येताना, नुकतेच मासे पकडून आलेले कोळी, किनार्‍यावर भेटले होते :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

सांगतो ऐका..

नरेश_
Fri, 04/03/2009 - 14:26 नवीन
श्रीवर्धनला जिवना म्हणून बंदर आहे. तिथे चांगली मासळी मिळते. कोळंबी, पापलेट , सुरमई इ. खासच. मिपाकर ब्रिटिशच्या गावाला (खारपाडा, पनवेल जि. रायगड)जिताडा फेमस आहे जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments

आहाहा........

मि.इंडिया
Sat, 04/04/2009 - 10:03 नवीन
आहाहा........ जिताडा हा अतिशय चविश्ट प्रकार आहे. कोठे मिळतो याची अधीक माहिती दिल्यास बरे होइल. छडी व गळाने मासेमारीचा छंद असलेल्यांचाही आवडता मासा आहे. पण आजकाल हा दुर्मिळ झाला आहे हे खरे आहे का ? प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_

जिताडा हा

नरेश_
Sat, 04/04/2009 - 10:36 नवीन
जिताडा हा मासा आजही मिळतो.ठाणे, रायगड जिल्ह्यात खाडीकिनारी गावकीच्या वा शेतातील तलावात मत्स्यसंगोपन केले जाते. बदली किंवा बढती मिळवण्यासाठी , कामं करुन घेण्यासाठी प्रामुख्याने भेट म्हणून हा मासा दिला जातो. या जगात सासू-सुन वाद हा आद्य वाद होय. समाजवाद, प्रांतवाद, भाषावाद हे अगदी अलिकडचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि.इंडिया

ताजे व

सँडी
Fri, 04/03/2009 - 14:55 नवीन
ताजे व उत्तम मासे कोठे मिळतील? हे शीर्षक वाचुनच "समुद्रात" हे उत्तर सुचले होते हेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments

सिंहगड रोड

सालोमालो
Fri, 04/03/2009 - 14:59 नवीन
सिंहगड रोडवर एक नेट सी फुड फ्रेश म्हणून दुकान आहे. संतोष हॉलच्या समोर. तिथे छान मिळतात. सुरमइ, कोळंबी, पॉप्लेट झक्कास. सालो
  • Log in or register to post comments

नरेश व सागर

मि.इंडिया
Fri, 04/03/2009 - 15:40 नवीन
नरेश व सागर माहितीबद्दल आभार. मी जिवना बंदरालाच मासे घेतले होते. हर्णे बंदराबाबत ऐकुन आहे पण कधी गेलो नाही. हर्णेची अधिक महिती असल्यास सांगावी. (खासकरून वेळेबाबत). हर्णे बंदरावर लिलाव सायंकाळी ४ नंतर असतो असे मी समजत होतो. पण आपल्या माहितिप्रमाणे मासे सकाळी मिळतील असे दिसते. प्रदीप
  • Log in or register to post comments

सध्याचे शेड्युल माहित नाही... पण सकाळी मिळतात

सागर
Fri, 04/03/2009 - 16:18 नवीन
होय.. सकाळी पण मासे मिळतात हर्णेला... तिथली जागा चांगली सखल असल्यामुळे बोटींना चांगल्या प्रकारचे आणि भरपूर मासे मिळतात.. बोटीवर लक्ष ठेवा ;) बंदराला लागली की लगेच २०-३० मिनिटात माल किनार्‍यावर येतो आणि संपतो पण. सुरुवातीच्याच वेळी तुम्ही लिलाव केला तर स्वस्तात मस्त माल मिळून जातो. नंतर लिलावाची किंमत माल खपत जातो तशी वाढत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि.इंडिया

बोटीवर

मराठमोळा
Fri, 04/03/2009 - 19:15 नवीन
>>बोटीवर लक्ष ठेवा आणी हो बोटीत कोळीच आहेत याची खात्री करुन घ्या, चुकुन अतिरेकी असायचे आणी मास्यांऐवजी बाँब हातात द्यायचे. ;) असो.. >>असे उत्तम मासे मला पुण्यात कधीही मिळालेले नाहीत. पुण्यात तितके ताजे मासे मिळणार नाहीत, परंतु शिवाजी मार्केट आणी फातिमानगर येथे परमार काँप्लेक्स येथे एक दुकान (नाव आठवत नाही) आहे जिथे बर्‍यापैकी ताजे मासे मिळतात. आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

मासे,

हरकाम्या
Fri, 04/03/2009 - 21:43 नवीन
पुण्याच्या लकडी पुलावर गळ टाकुन बसा, पाण्याच्या प्रदूषणातून वाचलेले, आणि जिवंत असलेच तर गळाला लागतील उगीच लांब कुठे जाताय.
  • Log in or register to post comments

अरे

मि.इंडिया
Sat, 04/04/2009 - 08:00 नवीन
अरे हरकाम्या पुण्यात नदीच शिल्लक नाही. एकेकाळी मुठेतही झकास मासे पकडले आहेत. आता मात्र नदी संपून गेली आहे. नदीचे उघडे गटार झाले आहे असे खेदाने नमूद करावे लागेल. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

वेंगुर्ला/शिरोडा

नंदन
Fri, 04/03/2009 - 23:35 नवीन
सकाळी आठच्या आधी गेलात तर वेंगुर्ला किंवा शिरोड्याच्या बंदरावर झकास मासे मिळतात. शिरोड्याला लिलावात घेतलेल्या ह्या दोन सुरमया - Image removed.From India Trip

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सुरमया

मि.इंडिया
Sat, 04/04/2009 - 09:52 नवीन
सुरमया पाहून जिभल्या चाटत आहे. असो. माहितीबद्दल आभार. थेट तळकोकणातील महिती दिलीत. या बंदरांवरही लिलाव होतो का ? काही कामानिमित्त कोकणात गेल्यावर येताना असे झकास मासे आणले की प्रवास सार्थकी लागतो व थकवाही दूर होतो. शिवाय स्थानिक भावात मासे मिळाले की अंगीही जास्त लागतात......... ;) >:) प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुरमया

विसोबा खेचर
Sun, 04/05/2009 - 10:55 नवीन
सुरमया झकास! 'मिपाच्या कलादालनातून..' या सदराखाली एक दिवस मुखपृष्ठावर टाकतो.. :) आपला, (साधना कोळणीचा लाडका) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

जिथे जिथे .....

सुधीर कांदळकर
Sat, 04/04/2009 - 19:51 नवीन
किनार्‍यावर कोळीवाडा असतो तिथे तिथे कोळी लोक परत आले कीं लिलावांत ताजे मासे मिळतात. हर्णैहून आम्हीं पण आणलेले आहेत. मालवणला पण मिळतात. मुंबईत मालाड आणि भाईंदरला मिळतात. उत्तम ताजे, लिलावांत घाऊक आणि किरकोळींत पण. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा