Skip to main content

रेसिपी हवी आहे!!

लेखक किट्टु यांनी बुधवार, 11/03/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला 'वांगी काप' कसे करतात त्याची रेसिपी हवी आहे. प्लीज कोणी मदत करेल का? 8>

वाचने 11074
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by चकली

पिठात अजिबात पाणी घालू नये, हे काही झेपले नाही. मी पाणी घालून पण काप करून पाहिलेत. फक्त भज्यांपेक्षा जरा घट्ट पीठ भिजवावे लागते. आणि तुम्ही लिहिलेली धनेपूड नि अजून काय काय कशासाठी? नुसत्या डाळीच्या पिठापेक्षा हे छान होतात का?

In reply to by आपला अभिजित

पिठात पाणी घातले तर काप छान खुसखुशीत होत नाहीत असा माझा अनुभव आहे. चकलीताय योग्य ते कारण सांगतीलच. (काप का काप, पानी का पानी हो जायेगा)

In reply to by आपला अभिजित

हे बरोबर आहे. कारण वांग्याचे काप खुसखुशीत होण्यासाठी त्यातले जास्तीचं पाणी उडून जायला हवं. काप त्यांच्या अंगच्या ओलसरपणानेच पिठात घोळवले की थोडे कोरडे होणार आणि पुढे तेलावर परतले की अगदी खुसखुशीत होणार! चतुरंग

In reply to by आपला अभिजित

>>पिठात अजिबात पाणी घालू नये, हे काही झेपले नाही. वांग्याचे काप करताना पाणी घातले तर काप खुसखुशीत होत नाहीत. >>मी पाणी घालून पण काप करून पाहिलेत. फक्त भज्यांपेक्षा जरा घट्ट पीठ भिजवावे लागते. मी पण करून पाहिले. बिन पाण्याचे मला जास्त पसंत पडले. >>आणि तुम्ही लिहिलेली धनेपूड नि अजून काय काय कशासाठी? नुसत्या डाळीच्या पिठापेक्षा हे छान होतात का? हो. चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

>>>मी पण करून पाहिले. बिन पाण्याचे मला जास्त पसंत पडले. अगदी बरोबर... बिन पाण्याचेच छान लागतात...मी पण दोन्ही करुन पाहीले... पाण्याचे केले की ते एकदम वांग्याचे भजी वाटतात...

In reply to by परिकथेतील राजकुमार

काल मी 'वांगी काप' केले होते , आणि मस्त पण झाले होते.सर्वांना आवड्ले. फक्त फोटो काढायचा तेवढा राहिला. :(

१. आधी बाजारातून किंवा शक्यतो शेजार्‍याकडून वांगी आणावीत. २. ती स्वच्छ धुवून घ्यावीत. ३. एक विळी/सुरी/चाकू/करवत/हेक्सॉ/तलवार/दाढीचे ब्लेड घ्यावे. (हे सुद्धा शेजार्‍याकडून आणलेले चालेल. मात्र दाढीचे ब्लेड असल्यास, ते शक्यतो वापरलेले नसावे!) ४. वरील आयुधे (किमान एक) वापरून वांग्याचे काप करून घ्यावेत. झाले वांग्याचे काप!!!!!! (टीप : मिपा वरील अवांतर प्रतिक्रियांच्या प्रथेला पूज्य मानून, केवळ ती परंपरा जपण्यासाठी ही प्रतिक्रिया टाकली आहे. कळावे, लोभ असावा, राग नसावा.)

In reply to by आपला अभिजित

:) (टीप : मिपा वरील अवांतर प्रतिक्रियांतील विनोदाची वाहवा करण्याच्या प्रथेला पूज्य मानून, केवळ ती परंपरा जपण्यासाठी ही प्रतिक्रिया टाकली आहे. कळावे, लोभ असावा, राग नसावा.) (अजून एक टीप : वरील प्रतिक्रियेतील प्रत्येक वाक्य वेगळे डकवून खाली लोळतहसण्याची मुद्रा आहे असे मानावे. तरच अवांतर प्रतिक्रियांतील विनोदाची वाहवा करण्यार्‍या प्रतिसादाला शोभा आहे असे म्हणतात.) -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

मिपावर तिरके प्रतिसाद चांगले दिसतात म्हणुन टाकला आहे. राग आला असेल वा नसेल तरी तिरकीच प्रतिक्रिया द्या :) --अवलिया

सर्वांचे मी आभार मानते, मुख्यकरुन चकलीताई आणि आपला अभिजीत चे. >>(टीप : मिपा वरील अवांतर प्रतिक्रियांतील विनोदाची वाहवा करण्याच्या प्रथेला पूज्य मानून, केवळ ती परंपरा जपण्यासाठी ही प्रतिक्रिया टाकली आहे. कळावे, लोभ असावा, राग नसावा.) राग नाही आला. फक्त पहिली प्रतिक्रिया थोडी तिरकी वाट्ली म्हणुन अशीच प्रतिक्रिया दिली.

आमची मेली चालच तिरपी. पण एक सांगू का, पाककृतीच्या दालनात पाककृतीच शोभून दिसते, नाही का ? काही हवं नको ते आपण अवांतर म्हणून विचारु शकतोच की. >>>>राग नाही आला. फक्त पहिली प्रतिक्रिया थोडी तिरकी वाट्ली म्हणुन अशीच प्रतिक्रिया दिली. तुम्ही खिलाडूपणे घेतल्याचे पाहून आनंद वाटला :-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

In reply to by नरेश_

नरेश, पाककृतीच्या दालनात पाककृतीच शोभून दिसते, अगदी बरोबर बोललात... राग नसावा... :)