Skip to main content

महात्मा गांधींच्या वस्तू भारताचा राष्ट्रीय ठेवा आहेत?

लेखक यांनी गुरुवार, 05/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1272
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

कशासाठी ही इतकी धावाधाव? नाही मिळाल्या त्या वस्तू भारताला. काय फरक पडणारे? नाही मिळाल्या त्या वस्तु भारताला तर काही फरक पडणार नाही. त्या वस्तु भारतात येउन भुकेल्या लोकांचे पोट थोडी भरणार आहे. त्यापेक्षा त्या विकुन काही चांगले करता आले तर उत्तमच . . . सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

ह्या वस्तु त्याच्याकडे आल्या कशा ?

गांधीजींच्या वस्तूंच्या प्रस्तावातील लिलावावर तीव्र चिंता व्यक्त करतांना त्यांची नात तारा गांधी भट्टाचार्य यांनी राष्ट्रपित्याच्या वस्तूंची खरेदी-विक्री हिंसक कृत्य असल्याचे म्हटले आहे. बातमीचे दुवे एक आणि दोन..... द्वारकानाथ कलंत्रींची प्रतिक्रिया काय आहे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गांधींच्या आदर्शाचे स्मरण झाले पाहिजे. गांधींच्या अत्योंदयाचा विचार हाच खरा विचार असावा. भ्रुण हत्या, मराठी भाषेचा आग्रह, समाजातील विषमता दुर होणे गरजेचे आहे. त्यासाठी गांधींच्या नावाचा, विचाराचा पूर्ण वापर व्हावा असे मला सूचवावेसे वाटते.

In reply to by कलंत्री

भ्रुण हत्या, मराठी भाषेचा आग्रह, समाजातील विषमता दुर होणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा आग्रह नसावा? दूर व्हावा? का बरं? आश्चर्य वाटलं. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

अंदामानात जन्मठेप भोगणार्‍या देवाची धरोहर जेव्हा नष्ट करत होते तेव्हा हे लोक झोपेत होते काय? काय झाल की गांधी !!! बाकीच्यांच काय ? (कट्टर सावरकर भक्त) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

In reply to by मदनबाण

योग्य बोललात काय फरक पडणार होता कोणास टहवुक लिखाण वगिअरे असते तर ठिक होते म्हणजे त्यांचे अजुन विचार कळले असते पण हे मात्र अती होते आहे असो विनायक्(आपल्यासारखाच सावरकर भक्त) दुर नभाच्या पल्याड कोणी दाटुन येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझीमते केव्हा केवळ भणाणारा पिसाटलेला पिवुन वारा अनवाणी पायानी वनवणते कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते सा रे ग म प....................... विना

प्रत्येक राज्कर्त्याला आपण अतिशय चान्गले आहोत असा आभास निर्माण करावा लाग्तो.त्यासाठि हे सगले चालु असते.म्हणजे उद्या 'ह्या माणसाने सत्ता उपभोगली पण गान्धिन्चि आठवण झालि नाहि' असा आरोप होवु नये म्हणुन असते हे. भेन्डि बाजार्-मुम्बै ४००००२

महात्मा गांधी च्या वस्तु असोत किंवा राजेरजवाड्याच्या तलवारी आणी सिंहासने.. ह्या वस्तु आपल्याकडे नसल्याने काहीही फरक पडत नाही हेच खरे. कोणताही माणुस महात्मा किंवा अमर होतो ते त्याच्या कर्तुत्वामुळे आणी विचारांमुळेच. त्याचे विचार जोपर्यंत लोकांच्या मनात जीवंत आहेत तोपर्यंत त्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तु नसल्या तरी काही फरक पडणार नाही. परंतु हा प्रश्न उपस्थित होतो कारण बर्‍याच वेळा स्वाभिमान आडवा येतो. आता मला सांगा कोहिनूर हिरा आपल्याकडे नाही याची खंत कधी कधी आपल्याला वाटते का नाही? आपल्या लोकांच्या वस्तु कोणा दुसर्‍याकडे असणे थोडेसे स्वाभिमान दुखावणारे आहेच. आपला मराठमोळा

इतिहास विषयक स्वाभिमान बर्याच वेळा जाग्रुत केले जातात्.राजकिय फाय्द्यासाठि किन्वा जनतेचे लक्ष दुसरिकडे वळवण्यासाठी. कोहिनूर आणन्यापेक्षा हिर्यान्चा एक्स्पोर्ट कसा वाढेल आणि रोजगारि कशि वाढेल हे बघितले तर जास्त बरे वाटेल. ह्याचा अर्थ इतिहास्कालिन वस्तुन्कडे दुर्ल़क्ष करावे असा नाहि. जगातिल इतर राश्ट्रेपण इतिहास्कालिन ठेव्याबद्दल जागरुक असतात. आपलि जुनि वाचनालये,वस्तु सन्ग्रहालये,ऐतिहासिक राज्वाडे,इमारति बघितल्या की आपण नक्कि ऐतिहासिक अभिमानात कुठे लागतो हे लक्षात येइल. भेन्डि-मुम्बै ४००००२

हल्ली टीव्हीवर एक जाहिरात येते, तिच्यावर बन्दी येण्याचे आत पाहून घ्या त्यात एका तरुणीला एक मवाली त्रास देताना दाखविला आहे. तरुणी एसेमेस करुन विचारते "गान्धी की कमाण्डो??" बहुतेकान्चे उत्तर येते "कमाण्डो", मग ती तरुणी त्या मवाल्याला लाथ मारते.......... तात्पर्य वेगळे सान्गायलाच हवे का? या वस्तुन्वर अनाठाई खर्च करण्यापेक्षा तोच पैसा जर याच देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर "गळती होऊ न देता" वापरला तर बरे! अन येवढीच खुमखुमी असेल वस्तुन्ची, तर केवळ गान्धीच का? शिवाजीची भवानी तलवार का नको? या देशातून पळवुन नेलेला कोहीनूर का नको??? [च्यामारी, तेव्हा पन्चावन्न कोटीन्ना खड्ड्यात घातले, आज साठ वर्षानन्तरही तोण्डपुज्यान्नी जपलेले हे नाव देशाला अजुन किती खड्ड्यात घालणारे कोण जाणे! असो] निवडणूका आल्यात, हेच खरे :) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by limbutimbu

तरुणी एसेमेस करुन विचारते "गान्धी की कमाण्डो??" हे हे हे थोडेसे अपडेट करतो तुम्हाला, आता त्या जाहिरातीचे डबिंग बदलले असुन, आता तरुणी विचारते 'अहिंसा की कमांडो?' हा बदल अचानक कसा घडला हे सांगायला नकोच :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मात्र स्टार प्रवाह वर कालच ही जाहिरात पाहिली, त्यात अजुनही "गान्धी की कमाण्डो" असेच विचारले आहे आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

काही फरक पडणार नाही. शिवाय भारताने आपले पैसे कुठे आणि कसे खर्च करावेत हे दुसय्रा कोणि लुंग्यासुंग्याने सांगायची अजिबातच गरज नाही/संबंध नाही. पण आत्ताच चीनच्यादेखील पुराण्वस्तू बाजारात विकायला होत्या. एका चीनी पंटरने त्या लिलावात मोठी बोली लावून ताब्यात घेतल्या आणि सरळ पैसे द्यायला नकार दिला देशभक्ती म्हणून. इथे पहा असला काहीतरी झोल करायला काहीच हरकत नव्हती. ----- जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ?

नवीन अपडेट : (दारू-किंग) किंग फिशरचे मालक विजय माल्या यांनी साडेनऊ कोटींमधे ह्या वस्तू विकत घेतल्या सविस्तर बातमी इथे वाचायला मिळेल http://hindi.economictimes.indiatimes.com/articleshowpics/4231910.cms माझ्यामते गांधीजींच्या ह्या वस्तू न मिळाल्याने काहीच फरक पडत नाही... व्यक्तीमागे उरते ती त्या व्यक्तीची किर्ती... त्या व्यक्तीच्या वस्तूंचा फक्त दुरुपयोग होतो स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी... अर्थात व्यक्तिशः मी गांधींचा समर्थक अजिबात नाहिये... आपल्या देशाला अश्वत्थाम्याची भळाळून वाहणारी कपाळावरची जखम देण्याचे श्रेय यांच्याकडेच जाते. राष्ट्रपिता - पिता या जबाबदारीला न्याय नाही देऊ शकले... असो तो विषय नाही इथला... अखंड भारताचे स्वप्न पाहणारा - सागर

महात्मा गांधींच्या वस्तू भारताचा राष्ट्रीय ठेवा आहेत? नक्कीच आहेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गांधी मृत्यूसमयी ७९ वर्षांचे होते, तेवढ्या काळात त्यांनी सुमारे ५० चपला, ४-५ चष्मे आणि इतरही शेकडो वस्तू वापरल्या असतील. त्या सर्व वस्तू कोणाना कोणाकडे गेल्या असतील आणि मधून मधून त्यांचा लिलाव होत राहील. प्रत्येक वेळी आपण राष्ट्रीय ठेवा म्हणून गळा काढू लागलो आणि त्या वस्तू सरकारी पातळीवर विकत घेऊ लागलो तर कसे चालेल. थेरडा, टकलू वगैरे विशेषणांनी समाजातील काही वर्गात होणारी अवहेलना थांबली तरी पुरे. अवांतरः सरकारी पातळीवर गांधींच्या वस्तूंची अशी खरेदी झाली कि पुन्हा 'काही' लोकांच्या कुठेकुठे दुखणार! ;) अतीअवांतरः काही वर्षांनी पुन्हा याच वस्तू लिलावात येणार नाहीत कशावरून? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

सही आहे तुम्ही बोलतात ते मला तर हे काळात नाहीये या वास्तु देशा बाहेर गेल्याच कशा?

'दारु पिवु नका' म्हणुन सन्देश देणार्या महात्म्याच्या वस्तु बियर सम्राटाने खरेदि कराव्यात हा नियतिचा अजब न्याय म्हणावा लागेल. मल्ल्या ह्यान्च्या नावावर एक राष्ट्रभक्तिचे लेबल चिकट्ले त्या निमित्ताने.

In reply to by चिरोटा

सहमत खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. याच संदर्भात एक नवीन बातमी. जेम्स ओटिस यांनी या लिलावाबद्दल नाराजी व्यक्त करून सर्व वस्तू ताबडतोब परत मागितल्या आहेत. ओटिस यांच्या वकिलांनी लिलाव करणार्‍या कंपनीला नोटीस पाठवली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू करत आहोत असं म्हटलं आहे. आता भारतीय सरकार आणि विजय मल्ल्या काय करतील?

आता भारतीय सरकार आणि विजय मल्ल्या काय करतील?
१)गान्धि आमचे,वॉशिन्ग्टन तुमचे असे म्हणुन वस्तु परत करण्यास नकार देतील. २)जेम्स ओटिस ह्याना भारताची प्रगती बघवत नाही असे कदाचित कोन्ग्रेस्चे प्रवक्ते म्हणतील. ३)जेम्स ओटिस ह्याना भा.ज.पा.ची फूस आहे असे कोन्ग्रेस्चे प्रवक्ते म्हणू शकतिल. ४)मल्य्या वस्तु द्यायला तयार होतिल ,मात्र बदल्यात- किन्ग फिशर बियर अमेरिकेत विकायचा आणि जास्त विमाने उडवायचा परवाना मागतिल. ५)जेम्स ओटिस ह्याना निवडणुक होईपर्यन्त कळ काढा,नन्तर बघुन घेवू अशी विनन्ती करतिल.

आता भारतीय सरकार आणि विजय मल्ल्या काय करतील? कदाचित हा विरोधी पक्षाचा डाव आहे असे म्हणुन अंग काढुन घेतील. पण मुळातच या गोष्टींना एवढे महत्व का द्यायचे तेच कळत नाही. सागर प्रमाणे मी ही गांधी समर्थक नाही. पण गांधींचा विषय निघाला की आपल्या राजकारण्यांना या देशात आणखीही बरेच देशभक्त होवुन गेले याचाच विसर पडतो. आपले दुर्दैव किं आपण फक्त या अशा बाफ वर वांझोटी चर्चा करतो. यापेक्षा वेगळी काही प्रत्यक्ष कृती करता येणार नाही का आपल्याला? सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)