Skip to main content

सुक्या बोंबलाच्या चटणीचे सुके

लेखक जागु यांनी शुक्रवार, 27/02/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ५-६ सुके बोंबिल ४-५ सुक्या मिरच्या किंवा १ ते १/२ चमचा मिरची पावडर १ मोठा कांदा ५-६ लसुण पाकळ्या हिंग पाव चमचा हळद १/२ चमचा लिंबा एवढी चिंच कोथिंबिर चिरुन चवि पुरते मिठ २ चमचे तेल कृती : चटणी : पहिला सुक्या बोंबलाचे १/२ इंचाइतके तुकडे करुन ते तव्यावर भाजुन घ्यावेत. नंतर त्याच तव्यात सुक्या मिरच्या थोड्या गरम करुन घ्याव्यात. बोंबिल आणि मिरच्या थंड झाल्या की त्यात लसुण टाकुन ते एकत्र मिस्कर मध्ये जरा जाडसरच भरडावे. हीच जर चटणी खायची असेल तर ह्यात मिठ टाकावे. सुके : कढईत तेल टाकुन त्यावर कांदा परतवावा. कांदा शिजला की त्यात हिंग हळद घालुन त्यावर वरील बोंबलाची भरड घालायची. मग त्यात चिंच खुळुन घालायची, मिठ घालुन परतवा मग चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेउन मंद गॅसवर थोडावेल ठेवायचे. टिप : फोटो परत करेन तेव्हा टाकेन.

वाचने 10526
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुक्या बोंबलाच्या चटणीचे सुके .??? पहिला सुक्या बोंबलाचे १/२ इंचाइतके तुकडे ??? ... तात्या मला वाचवा. . . . :S सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by सुक्या

सुक्या बोंबलाचे छोटे छोटे तुकडे वाचुन मला जोनी लिवर चा तो फेमस डायलोग आठवला ! :-) बाकी सुक्या बोंबलाचे छोटे छोटे छोटे छोटे तुकडे म्हणजे तुमच्या अंगावर शहारे आले असणार !! :D बाकी जागू , रेसीपी छान आहे :-) ~ वाहीदा

सुरमई तर ३०० रुपये किलो इतका,पापलेट ३५० ते ४०० रुपये किलो महाग झाला आहे.बोंबिल पण महाग झाले आहेत. तेव्हा माशांच्या पाककृती देणे एकदोन महिने टाळा.खुप हाल होतात.आजकाल सुके प्रॉन खात असतो. तेदेखिल ६०० किलो आहेत.महागाईचा दर कमी आला हे सरकारचे म्हणणे मला तरी पटत नाही. वेताळ

चांगली दिली आहे पा.कृ. आता इथे सुके बोंबिल लगेच कुठून आणायचे?!

काळ्जी करु नका, वर पहिल्या प्रतिक्रिये मध्ये सुक्या बोंबिल आहेतच. खादाडि साठि तत्पर

शाकाहारी मंडळींनी बोंबलाऐवजी शेवग्याच्या शेंगा घेऊन ही पाककृती बनवली तर........... सही /- आगरी बोली - आगरी बाना.

शाकाहारी मंडळींनी बोंबलाऐवजी शेवग्याच्या शेंगा घेऊन ही पाककृती बनवली तर........... सुक्या बोंबलाचे १/२ इंचाइतके तुकडे करण्याच्या प्लॅनचे काय ? ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..