सूचना ः या कवितेतील (अस्मादिक सोडून) सर्व पात्रे, कल्पना, घटना, प्रसंग काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा.
वाटलं आपण पण कवी होऊ
आणि चारदोन ओळी खरडू
जमल्या तर जमतील, न जमल्या तर फसतील
हसले लोक, तर हसतील; त्यांचेच दात दिसतील
हाती घेतला कागद अन् बसलो लिहायला
तास लागला कशावर लिहावे, तेच ठरवायला
हा विषय की तो, गंभीर की विनोदी
लिहिताना विषयांची भलतीच झाली चोंदी
धाडस केलं शेवटी अन् लिहिलं स्वतःवर
मन म्हणालं, प्रतिभेला जरासं सावर
म्हटलं आजकाल कुणीही उठतं अन् होतं कवी
मलासुद्धा त्यासाठी प्रतिभा कशाला हवी?
लिहावं काहीबाही अन् टाकावं कुठेही
रिकामटेकड्यांच्या प्रतिक्रियांची काही कमी नाही!
विचार करता करताच एक कविता पाडून झाली
म्हटलं प्रसववेदनांविनाच प्रतिभा "बाळंत' झाली!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1642
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्य आहेस.
अभिजित..
प्रा. प्र. आवडले
हॅहॅहॅ