Skip to main content

तो बेत कालचा मुळीच ठरला नव्हता

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 18/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता

तो बेत कालचा  मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी पण पेला भरला नव्हता

मी घरी कशी जाण्याची  हिंमत केली?
मी  रस्ता घरचा कसा विसरला नव्हता

एवढी कुठे मी काल ढोसली होती?
हैंगओवर हा अजून  उतरला नव्हता

शेवटी घेतली कॉफी मी या करता
उतार्‍यास  घरी घोट ही उरला नव्हता

एवढा कधी मी टल्ली नव्हतो किंवा
एवढा कधी पण पाय घसरला नव्हता

दिवसात अमुचे कलत्र बिघडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

एवढ्यात काही "केश्या" लिहिले नाही
एवढ्यात कुणी कवी भादरला नव्हता

केशवसुमार

लेखनविषय:

वाचने 1925
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

=)) शेवटी घेतली कॉफी मी या करता उतार्‍यास घरी घोट ही उरला नव्हता हे एकदम झकास. :)) तात्पर्य: घरी एखादा खंबा रीजर्व राहु द्यावा. अडीअडचणीला कामास येतो. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

एवढ्यात काही "केश्या" लिहिले नाही एवढ्यात कुणी कवी भादरला नव्हता हे मस्तच् !

एवढा कधी मी टल्ली नव्हतो किंवा एवढा कधी पण पाय घसरला नव्हता =)) =)) हाण तिच्यायला झकास ___________________________________________________ (अजुन पर्यंत टल्ली न झालेला ) घाशीराम कोतवाल

गुरुवर्य, मस्तच... आंबोळी

(खुद के साथ बातां : जरा दारूत वाहून गेल्यासारखं वाटतंय का? :? ) चतुरंग