Skip to main content

मायबोली १९९४४ डॉलर्स, मिपा १३७८२ डॉलर्स..!

लेखक शेणगोळा यांनी मंगळवार, 10/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काही मनोरंजक माहिती - या संकेतस्थळानुसार मायबोली या मराठीतील दहा ते बारा वर्ष जुन्या आद्य संकेतस्थळाची आजची किंमत अंदाजे १९९४४ डॉलर्स, मिपा या अवघ्या दीड वर्ष जुन्या संकेतस्थळाची आजची किंमत १३७८२ डॉलर्स, ज्या संकेतस्थळाला जाहीर चॅलेन्ज देऊन तात्याने मिपा काढले त्या मनोगताची आजची किंमत ६९७२ डॉलर्स, उपक्रम या संकेतस्थळाची माहिती उपलब्ध नाही, सुरेशभट डॉट इन ची आजची किंमत १९०५ डॉलर्स, तर मराठी गझल डॉट कॉम ची आजची किंमत १००७ डॉलर्स आहे.. कालावधीच्या तुलनेत पाहता मिपाचे समभाग आजच खरेदी करून ठेवले पाहिजेत! येत्या ५-७ वर्षाच्या काळात जबरा भाव मिळेल! :) तात्या, माझ्याकरता आजच्या बाजारभावानुसार मिपाचे काही समभाग आजच राखून ठेवा. धनादेश पाठवून देतो. :) सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

वाचने 5929
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

मलाही मिपाचे समभाग हवेत.काय चान्स आहे का तात्या समभाग मिळण्याचा? वेताळ

In reply to by वेताळ

हजर सभासदात तात्या दिसत नाही. बहुधा कुठल्यातरी बाईच्या किंवा बाटलीच्या मागे गेला असेल! :) सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

In reply to by शेणगोळा

>>हजर सभासदात तात्या दिसत नाही. हॅ हॅ.. कारण तात्या हाच शेणगोळा आहे! :D तात्या नवा आयडी आवडेश!! ------------ च्यायला शेणगोळा आयडीतुन सरपंच आयडीत...तात्या आमच्यावर काही कारवाई तर नाही ना...?? हवं तर उडवा बुवा हा प्रतिसाद.. =))

In reply to by अघळ पघळ

हॅ हॅ.. कारण तात्या हाच शेणगोळा आहे हा शोध आमच्याकरता नवाच आहे. धन्यवाद! सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

In reply to by शेणगोळा

काय तात्या?आता देऊ का दोघांचे आयपी...?? :D --------- आणि नीलकांत तर ऑनलाईन दिसत नाही..मग सरपंच कसे काय डोकावुन गेले मध्येच?? की आणखी कुणी सरपंच आहे ?? ;-)

आणि माझ्या कुटुंबाच्या संस्थळाची किंमतः $1569.5 (मराठी गझल पेक्षा जास्त ? हे कसे झाले बॉ ?) -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

उत्तम! आपल्या स्थळचेही काही समभाग आमच्याकरता आजच राखून ठेवा. त्याचा आज ना उद्या ३२०० डॉ.च्या आसपास भाव जाईल तेव्हा आम्ही ते अन्य कुणाला विकून १०० टक्के नफा कमावू. :) सर्वांचाच लाडका, शेणगोळा.

हाहा !! माझा ब्लॉग ज्याचं डोमेन नेम मी आता www.bhagyashree.co.cc केले आहे, त्याची किंमत ९.७९ मिलिअन डॉलर्स आहे !! बोला कोण घेत आहेत समभाग?? :)))))) (या अशा रिझल्टनंतर आय रिअली डाऊट त्या आकड्यांना काही अर्थ आहे का! ) http://bhagyashreee.blogspot.com/

In reply to by भाग्यश्री

मुद्दा आहे खरा गंमतीशीर! :) भाग्यश्रीताई, आम्ही आप्ल्या ब्लॉगचे काही समभाग घेऊ इच्छितो! :) सर्वाचाच लाडका, शेणगोळा.

In reply to by भाग्यश्री

http://bhurjipaav.blogspot.com आमचा पन ब्लोग ईकायचा हाय कोन घेनार फकस्त १००० डालर ला देनार आम्ही ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.

म्हणजे मजा आहे बुवा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर, इथं इतक्या वेबसाईटची नावं आली आहेत की...ही वेबसाईट म्हणजे नक्की कुठली म्हणताय ते स्मजलच नाही. अघळ पघळ

शेणगोळ्याची लेखण शैली पाहीली असता, आमच्या आतल्या गोटातून (कंपूतून) एक आवाज आला ... आणि आम्ही इतिहास स्कॅण केला .. लेखणशैल्या चाळल्या ... शेणगोळा हा कोण्या मोठ्या व्यक्तीचा आयडी वाटला .. असो .. त्या "मोठ्या" व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! स्वत:चा लाडका, टारगोळा

हरकत नाही, साला मिपा विकून खातो आणि मोकळा होतो! :) बाय द वे, शेणगोळा आम्ही नाही! बाकी चालू द्या.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बाबारे ... तात्याने विकले की किंमत घसरेल त्याचे काय? (बिझी-बी) एकलव्य

___________________________________________________ टॅग व्यवस्थित न बंद केल्यामुळे खालील सर्व प्रतिसाद ठळक येत आहेत. मागेही एकदा असे झाले असताना आम्हाला स्वत:ला संपादन करावे लागले व टॅग बंद करावा लागला.. आताही पुन्हा टॅग बंद करायचा राहिला आहे. सबब लेखन काढून टाकत आहोत. कृपया यापुढे आपल्या स्वाक्षरीतील टॅग बंद केला आहे याची खात्री करावी.. मुख्य व्यवस्थापन अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मग तुम्हीच का नाही बंद करत हो? अहो स्ट्राँग भुर्जी असेल त्यांची म्हणून टॅग उघडा टाकला असेल! ;-) एक शंका आहे, ही किंमत कशी मोजतात? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>एक शंका आहे, ही किंमत कशी मोजतात? संकेतस्थळावर नियमीत होणा-या सदस्य / पाहूणे ह्यांच्या भेटी व नवीन लेखन येण्याचा वेळ ! ह्यांचे अवरेज काढतात व प्रत्येक १०० व्हिजिट ला एक डॉलर पण हे अवरेज कमीत कमी सहा महिने असावे लागते ह्या रेशोचा खेळ आहे.... *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

हे आम्ही त्यांना कधिच कळवले होते ! प्रेषक : परिकथेतील राजकुमार, सोम, 02/09/2009 - 13:51 तुमच्या सहीत जरा बदल करता का ? तुमच्या त्या 'बोल्ड' अक्षरे चुकीची वापरली गेलेल्या सहीमुळे इतर सर्वांचे प्रतिसाद ठळक दिसत आहेत. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

तात्या तात्याच रहा..रामलिंगम तात्या नका होउ