Skip to main content

विडंबन : एक सामाजिक समस्या

गुरुवार, 05/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 955
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

:) भारी आहात.. तुम्हाला ज्या दिशेने उत्तरे हवी त्याकडे नेणारे पर्याय... ;) जोजे वांछिल तो ते लिहो ! गुणवत्ता ज्यात :) -- लिखाळ.

मिसळपावावर विडंबने लिहिणारे सर्व लोक बिगरविडंबनात्मक लेख/कविता लिहितातच, म्हणून खरे तर क्रमांक २ गमतीदार (पण संदर्भ नसलेली) तत्त्वचर्चा आहे. क्रमांक २ मला पटलेला नाही पण गंमत म्हणून विचाराधीन आहे. मागे तात्यांनी (एका प्रसिद्ध कलाकाराचे) वाक्य उद्धृत केले होते, की स्वतः स्टेजवर बसून श्रोत्यांसमोर दहा मिनिटे गायल्याशिवाय समीक्षण करू नये. विडंबन हे एका प्रकारचे समीक्षण असते - त्या कवितेची लय आणि बांधणी आवडल्याची (किंवा नावडल्याची) दाद विडंबक देत असतो. (कवितेच्या आशयाबद्दल समीक्षण नसते, कारण विषय विडंबनात वेगळे असतात.) दर्जेदार (?) पुढील प्रश्नचिह्नाशी सहमत आहे. काही विडंबने मूळ रचनेपेक्षा दर्जेदार असतात. (अती हसल्यामुळे माऊस ठरत नाही, सारखा हलतो आहे, म्हणून कुठल्याच पर्यायावर टिचकी मारलेली नाही.)

In reply to by धनंजय

त्या कवितेची लय आणि बांधणी आवडल्याची (किंवा नावडल्याची) दाद विडंबक देत असतो. (कवितेच्या आशयाबद्दल समीक्षण नसते, कारण विषय विडंबनात वेगळे असतात. असे नेहेमीच असते असे नाही. केशवकुमारांनी केलेल्या केशवसूतांच्या "आम्ही कोण" ह्या विडंबनाची आठवण येते. येथे आशयाच्या अतिशयोक्तीने विनोदनिर्मिती केली गेली आहे. लय आणि बांधणी अर्थातच तशीच ठेवली आहे. असो, कोणताच पर्याय पसंत पडल्याने, मतदानावर बहिष्कार!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

काय केसु , च्यामारी कशाला खेचताय पामरांची ! विडंबन म्हणजे सूडात बुडवून काढलेल्या तलवारीचे अंधारात मागून कमरेखाली केलेले वार नव्हेत. आणि हे जोवर होत नाही , तोवर ज्याना ज्याची मनसोक्त थट्टा करायची आहे ती करू द्या की ! त्यामुळे माझा पर्याय : जो जे वांछील तो ते लिहो ............प्राणिजात !! =))

या कौलाच विडंबन कोणी केल्यास समस्या गंभी र समजावी. :-) पर्याय २ ला मत दिले आहे.. विडंबन प्रेमी, टुकुल

कौलारू झाल्याबद्दल कुठे निषेध व्यक्त करता येईल का त्यासाठी वेगळा कौल काढायचा? X(

In reply to by प्रियाली

कौलारू झाल्याबद्दल कुठे निषेध व्यक्त करता येईल का त्यासाठी वेगळा कौल काढायचा?
ह्यासाठी एक लाईनचा काथ्याकुट टाका .. त्याची पण फॅशण आलिये नं हल्ली

>>एक दर्जेदार (?) लेख/ कविता लिहिल्या शिवाय विडंबन लिहायला परवांगी नसावी हा हा हा ! मस्त ! मतदान केले नाही. लेखनाच्या बाबतीत कोणतेच बंधन नसावे ! अजून येऊ द्या विडंबने. :) स्वगतः केशवसुमाराला कामामुळे यापुढे विडंबनाला वेळ मिळणार नाही, त्यासाठी तर हा धागा काढला नस्सेल :?

जोजे वांछिल तो ते लिहो ! गुणवत्ता ज्यात लिखाळभावजींसारखेच बोल्तो..! केश्याने पुन्हा निवृत्ती मात्र घेऊ नये असे मात्र आवर्जून सांगतो.. तात्या.