तुला पिताना पाहिलं की.......

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जे न देखे रवी...
31 Jan 2009 - 3:11 pm

आमचा प्रेरणास्त्रोत अनंतसागर ह्यांची तुला हसताना पाहिलं की.......

तुला पिताना पाहिलं
की कोरड्या ग्लासाला पालवी फुटते
आणि दिवसभर कोरडी असणारी सुरई
दुथडी भरुन वाहू लागते

तुला पिताना पाहिलं
की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो
चखण्याची चाहूल लागण्या आधीच
चमचा काटा फुलवून नाचतो

तुला पिताना पाहिलं
की त्या बर्फालाही पाझर फुटतो
सोडा तर चोहिकडे
सप्तरंग उधळीत फिरतो

तुला पिताना पाहिलं
की टेबल हसू लागतात
सर्व खुर्च्या जणू
तुझ्यासाठीच गाणे गातात

तुला पिताना पाहिलं
की तो शेजारचा टेबलवाला तुझ्या पिण्यावर जळू लागतो
आणि तु मात्र मदिरेच्या प्रेमात
चिंब होऊन भिजून जातोस.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

31 Jan 2009 - 3:13 pm | दशानन

ह ल क ट

=))

जबरा !

जबरा !

अती जबरा !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

अनिल हटेला's picture

31 Jan 2009 - 3:21 pm | अनिल हटेला

तुला पिताना पाहिलं
की मलाही तहान लागते ,
रम-वीस्कीच्या तालावर
आसमंत डोलु लागते !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jan 2009 - 7:05 pm | परिकथेतील राजकुमार

तुला पिताना पाहिलं
की मलाही तहान लागते ,
=)) =))

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

वेताळ's picture

31 Jan 2009 - 7:28 pm | वेताळ

तुला पिताना पाहिलं
की त्या बर्फालाही पाझर फुटतो
सोडा तर चोहिकडे
सप्तरंग उधळीत फिरतो

क्या बात है.......खुपच छान
वेताळ

सुक्या's picture

1 Feb 2009 - 12:28 am | सुक्या

तुला पिताना पाहीलं की
वाटतं थोडी उतरवावी घशात
बारमालक गल्ल्यावरुनच ओरडतो
भा* पैशे हायेत का खिशात?

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विसोबा खेचर's picture

1 Feb 2009 - 11:00 am | विसोबा खेचर

अप्रतीम विडंबन..! :)

तुला पिताना पाहिलं
की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो

सोडा तर चोहिकडे
सप्तरंग उधळीत फिरतो

सर्व खुर्च्या जणू
तुझ्यासाठीच गाणे गातात

वरील ओळी तर क्या केहेने! जियो..! :)

आपला,
(जॅक डॅनियल्स प्रेमी) तात्या.

स्वानन्द's picture

1 Feb 2009 - 12:31 pm | स्वानन्द

श्री खेचर यांच्याशी सहमत :)

सुहास..सदेव हसनार्..'s picture

1 Feb 2009 - 1:14 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

आज लई पिणार.....

अनंतसागर's picture

2 Feb 2009 - 1:24 pm | अनंतसागर

विडंबन वाचून हवा तितका आनंद नाही झाला