उद्या प्रजासत्ताक दिन आहे.
बहुतेक सर्व सोसायट्या कॉलन्या आपापल्या आवारात ध्वजवंदन करतील.
ठराविक गाणी म्हणतील. ठराविक छापाची भाषणे करतील.
यातल्या बहुतेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्हीतील फरक माहित नसेल.
बहुतेकांच्या लेखी दोन्ही दिवस सारखेच. शर्टावर टाचणीने झेंडा लावून फिरण्याचा.
स्वातंत्र्यदिनी आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो. तो एक टप्पा होता.
प्रजासत्ताक दिनी 'आपण' आपला देश कशा पद्धतीने चालवणार आहोत हे ठरवले. यादिवशी 'आपण' लोकशाहीची स्थापना केली.
ही लोकशाही अजून आपल्याला समजली आहे का?
आपणच आपला देश (चांगल्या किंवा वाईट रीतीने) चालवीत आहोत अशी भावना दिसत नाही. नेहमी आपण सरकार असे करते सरकार तसे करते असे म्हणतो. सरकार म्हणजे आपल्यापेक्षा कुणीतरी वेगळे आहे परके आहे अशी समजूत असते.
लोकशाहीत निवडणुका असतात. त्यावेळी लोक आपले प्रतिनिधी निवडतात. एकदा निवडणूक झाली की आपला लोकशाहीशी संबंध संपला असे आपण (आणि आपले प्रतिनिधीही) मानतो.
आपल्या निवडणुकांमध्ये चुकीच्या/गुन्हेगार व्यक्ती निवडून येतात अशी आपल्याला खंत असते. मग आपण लोकशाहीलाच नावे ठेवतो. ठोकशाहीचे/ हुकुमशाहीचे समर्थन करू लागतो.
लोकशाहीचे मुख्य तत्त्व धोरण व कार्यक्रम हे आहे. म्हणुन पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात. निवडून आल्यावर कोणती धोरणे कार्यक्रम राबवणार हे त्यात सांगितलेले असते. तो कार्यक्रम पाहून आपण मते देतो. म्हणजे राममंदिर बांधण्याचा कार्यक्रम आपल्याला मान्य असेल तर आपण त्या पक्षाच्या उमेदवाराला मत देतो. परंतु कैक वेळा माणूस चांगला आहे म्हणून आपण आपल्याला धोरणे मान्य नसलेल्या पक्षाला मत देतो. कधी धोरण चांगले म्हणून वाईट माणूस निवडतो. कधी माणूस चांगला म्हणून वाईट पक्ष निवडतो.
जे काही करतो ते आपणच करतो. हीच तर लोकशाही.
(येथे कोणी गठ्ठ्याने मतदान करतात म्हणून शोक करण्याचे कारण नाही. ठाण्याच्या मतमोजणीत डोंबिवलीची मते मोजणीस येतात तेव्हा चित्र पालटते. गठ्ठ्याने मते सगळेच देतात.)
लोकशाहीत आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी असते. एकदा हुकुमशाही स्वीकारली (?) की ती संधी केव्हा मिळेल हे सांगता यायचे नाही.
लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो ते आपण करण्याचा प्रजासत्ताक दिनी संकल्प करू.
जय हिंद.
वाचने
8860
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेली ६०
तरी देखील...
कृपया
In reply to तरी देखील... by विकास
सहमत
कोण काय
प्रजासतक
तरी सुध्दा...
नागरीकाशी सहमत !
In reply to तरी सुध्दा... by नीलकांत
१००%
In reply to नागरीकाशी सहमत ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो ते आपण करण्याचा .....
बाप रे !
In reply to लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो ते आपण करण्याचा ..... by संजीव नाईक
अर्थ
In reply to बाप रे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषादयोग
In reply to लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो ते आपण करण्याचा ..... by संजीव नाईक
मायला ! अरे
In reply to लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो ते आपण करण्याचा ..... by संजीव नाईक
वर लिहिला आहे
In reply to मायला ! अरे by दशानन
साजरा करणे.
आजचा दिवस ६० वा प्रजासत्ताक दिन!
शाळेतला प्रजासत्ताक दिन...