✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी निवड चुकली तर नाही ना?

म
मोगॅम्बो यांनी
Sat, 01/24/2009 - 14:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3894 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

द
दशानन Sat, 01/24/2009 - 14:21 नवीन

सुरेख

सुरेख ! समजण्याचा प्रयत्न करत आहे, पुर्ण प्रतिसाद योग्य वेळी देईनच ! असल्या विषयावर मिपावर अनेक थोर व्यक्ती आहेत तेच योग्य पध्दतीने मत माडू शकतील असा आशावाद मी येथे व्यक्त करतो ! बाकी तुमचा हा उपक्रम छानच आहे... व तुम्ही खास मराठीमध्येच भाषातंर करुन येथे मिपावर दिले ह्या बद्दल तुमचे अभिनंदन, नाही तर काय होतं नेहमी आलेली ढकल पत्रे तशीच्या तशीच कॉपी - पेस्ट करण्याचा हा जमाना पण तुमचे कष्ट वाखाण्याजोगेच आहे... अभिनंदन ! फुलेशु !
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 01/24/2009 - 14:27 नवीन

वाह !

खरंच छान मुद्दा आहे. असं चक्र आहे हे वाचून गंमत वाटली. लेख आवडला. नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sat, 01/24/2009 - 14:38 नवीन

जीवनसाथी

एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found. आणि म्हणुनच - आयुष्यात एक क्षण भाळ्ण्याचा , बाकि सारे सांभाळ्ण्याचे. Mandrake - the magician. -janadu.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 14:40 नवीन

.

वा! (चक्रधर) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 01/24/2009 - 19:12 नवीन

+१

आयुष्यात एक क्षण भाळ्ण्याचा , बाकि सारे सांभाळ्ण्याचे. अगदी अगदी सहमत !! पटण्यासारखा लेख आहे !! पु ले शु.... (नाती सांभाळणारा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 01/24/2009 - 20:19 नवीन

+१

चांगला मुद्दा. (तरी चांगला सल्ला प्रचारकी म्हणून रटाळ वाटू शकतो. तसा वाटू नये म्हणून मुद्दा सांगणार्‍याला साहित्यिक प्रतिभा पणाला लावावी लागते. हे ढकलपत्रांत क्वचित दिसते. अपवादात्मक ढकलपत्र चांगले असते. अनुवादाबद्दल धन्यवाद)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 01/24/2009 - 20:25 नवीन

अनुभव तोकडा

आमचा अनुभव या बाबतीत तोकडा असावासे वाटते. लग्नाला १५ वर्षे झाली. पण अजून नकोसे होण्यासारखी परिस्थिती आलेली नाही. सुरुवातीच्या काळात एकसारखे फोन वगैरे काही नव्हतेच. आताही फोन मोजकेच असतात. भेटण्याची ओढ वगैरे अजून शाबूत आहे. कदाचीत गेली २-३ वर्षे लांब रहात असल्याने असेल. कदाचित स्वेप्ट ऑफ द फीट वगैरे काही झालेले नसल्याने नंतरची संतापजनक अवस्था आली नसावी. म्हणून म्हणतो आमचा अनुभवच तोकडा असावा. बाकी नात्यातले विश्लेषण झकास
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 01/25/2009 - 00:14 नवीन

नातेसंबंध...

पती-पत्नीच नाही, कुठलही नातं टिकवायला, तजेलदार राखायला, त्याचा बहर अनुभवायला प्रयत्न करावे लागतात. जसे कुठलेही रोपटे वाढवताना त्याला खत-पाणी, सूर्य प्रकाश आवश्यक असतो, त्या रोपट्याची योग्य अशी निगा राखावी लागते तसे, नाती टिकवायलाही सतत मेहनत घ्यावी लागते. एक दूसर्‍याला गृहीत धरण्याची सवय सोडावी लागते. सतत संवाद असावा लागतो. नैसर्गिक रित्या कमी होत जाते ती शारीरिक ओढ. (अतिपरिचयात अवज्ञा! ) नाते टिकवण्यासाठी दोघांनीही मेहनत घेतली तर वाढत्या वया बरोबर नाते जास्त दृढ होत जाते. ह्यात दोघांचीही मेहनत महत्त्वाची आहे.
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Mon, 01/26/2009 - 15:29 नवीन

वाह! क्या बात है!

सुंदर शब्दात मांडलेत. नाते जोडणे सोपे असले तरी टिकवणे महा कठीण... आज- काल घरात चार-पाच फोन... पण डायल नेहमी समोरच्या माणसाने फिरवावी ही इच्छा. मुळात संबंध का ठेवायचा... मटिरीआलिस्टिक गेन्स नसतील तर संबंधांना का टिकवायचं? जोडीदार म्हणजे गरज. तो/ती आहेच.... टेकन फॉर ग्रान्टेड मध्ये सगळंच आलं -रेझर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चित्रा Mon, 01/26/2009 - 00:40 नवीन

सामान्य

कुठच्याही नात्याबाबतीत 'सामान्य' स्थितीत हा सल्ला ठीक आहे. पण हा सल्ला प्रत्यक्षात आणणे कधीकधी कठीण जात असावे. सेमिनारमध्ये येऊन, जीवनसाथीला बाजूला बसवून असा प्रश्न विचारणे यातच नात्याची स्थिती तेवढीशी ठीक राहिलेली नाही याची जाणीव व्हावी. प्रत्यक्षात आणणे कठीण जाण्याचे एक उदाहरण द्यायचे तर प्रत्येक नात्यात असताना त्यातील व्यक्तींची शारिरीक/मानसिक वाढ होत असते. काहींची वाढ वेगळ्या गतीने होते, कधी वेगळ्या मार्गाने होते. "कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे" जोवर पतीपत्नी किंवा इतर कोणी नातलग/मित्र एकमेकांच्या साधारण बरोबरीने "वाढतात" (मनाने) तोवर अशी छोटी अंतरे पार करणे शक्य असते. जर तसे होत नसले तर मात्र असे नातेसंबंध कठीण होत असावेत, नाही का? पण मुद्दा चांगला आहे.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Mon, 01/26/2009 - 19:50 नवीन

नसते ओझे नको.

माणसाचे मन आपापल्या परीने काळाबरोबर फुलत असते. अनेक वेळेस आपले मित्र, सहचर, भाऊ-बहिण यांची मात्र कोठेतरी वाढ खुंटलेली असते. ( किंवा उलटही). त्यातही स्त्री-पुरुष या संबंधात नको तितके गुंतागुंत आहे. एक धागा समजण्याचा / उलगडण्याचा प्रयत्न केला तर दुसरा मोठा गोंधळाचा धागा निर्माण झाला असतो. माझ्यामते मनाची वाढ होत असते, ते फुलत असते हे मान्य केले तर इतरांनी सांगितलेल्याप्रमाणे संवाद हाच या सर्व दुरावा कमी करण्याचा रामबाण उपाय असतो. माझ्यामते यासाठी आपल्याला विरुद्धलिंगाची एकतरी व्यक्ति योग्य काळात जोडता आली पाहिजे आणि आपले संबंध मनाच्या पातळीवरच प्रस्थापित करता आले पाहिजे, ( नाहीतर अजून गुंतागुंत वाढणार).
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 01/26/2009 - 20:04 नवीन

त्यातही

त्यातही स्त्री-पुरुष या संबंधात नको तितके गुंतागुंत आहे. एक धागा समजण्याचा / उलगडण्याचा प्रयत्न केला तर दुसरा मोठा गोंधळाचा धागा निर्माण झाला असतो. बरोबर, ही गुंतागुत आहे कारण असे नाते प्रत्येकाच्या जीवनात एकच असते. मैत्रीचे नाते कितीही जनांशी असु शकते. आणि एका मित्र नात्याला रिप्लेसमेंट (अगदी सारखी नसली तरी जवळपास सारखीच) मिळु शकते. आजकालच्या जोडप्यांमध्ये नसलेला संवाद हेच खरे वादाचे मुळ आहे, एकमेकांबरोबर वेळ घालवण्या एवजी आंतरजालावर वेळ घालवण्याचे प्रमाण वाढते आहे. प्रेमात भांडणे होतातच, ती मिटेपर्यंत वाट पहाणे सगळ्यांना जमते असे थोडीच आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा