✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुभाषित संग्रह

स
सुवर्णा यांनी
गुरुवार, 01/22/2009 - 17:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26049 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/22/2009 - 18:09 नवीन

मी पण

अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्| अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः|| क्र.७ सारखे एक - भोजनान्ते च किं पेयं जयंतः कस्य वै सुतः| कथं इंद्रपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभं|| हंसः श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बकः|| किंवा काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयो:| वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः|| अजून आठवली की लिहिन. - भटोबा (९वी अ)
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 01/22/2009 - 18:13 नवीन

छान छान

छान छान ! उपक्रम चांगला आहे ! आवडला ! ** बाकी , पूजा आणि मी हा प्रयत्न करतॊ आहॊत... तुम्ही दिसलात येथे पण पुजा नाही दिसली... ह्.घ्या.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/22/2009 - 18:24 नवीन

या

या दुव्याला सुद्धा भेट द्यावी. http://mr.upakram.org/node/1132 -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या गुरुवार, 01/22/2009 - 18:37 नवीन

शैले शैले

शैले शैले न माणिक्यम्, मौक्तिकं न गजे गजे | साधवो न हि सर्वत्र, चंदनं न वने वने|| शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषु च पंडितः | वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा || -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
उ
उर्मिला०० गुरुवार, 01/22/2009 - 18:53 नवीन

क्षणशः

क्षणशः कणश्चैव विद्यामर्थं च साधयेत! क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम ! क्षणा़क्षणाने ज्ञान आणि कणाकणाने धन मिळवावे.क्षणाचा त्याग केल्यास विद्या कोठुन मिळणार आणि कणाचा त्याग केल्यास धन कोठुन मिळणार?
  • Log in or register to post comments
झ
झेल्या गुरुवार, 01/22/2009 - 19:02 नवीन

शृंगार वीर

शृंगार वीर करूणा, अद्भुत हास्य भयानकः| बीभत्स रूद्र शांतःच, काव्ये नव रसा: मतः|| काव्यातले नवरस. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/22/2009 - 19:10 नवीन

आमचे पण १

विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम । चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति ॥ अर्थ न समजल्यास खव मधे वाचा. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
म
मऊमाऊ गुरुवार, 01/22/2009 - 19:51 नवीन

अजून एक !

छान आठवणी जागृत झाल्या सुभाषिते वाचून.. आशा नाम मनुष्याणाम् काचित् आश्चर्यशृखंला | यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पन्गुवत् ||
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/22/2009 - 19:57 नवीन

मॅडम मी पण सांगतो एक सुभाषित

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने। विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥ (१०वी तुकडी 'ब') पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
व
वृषाली गुरुवार, 01/22/2009 - 20:48 नवीन

सुभाषिते.....

विद्या विवादाय धनं मदाय शक्ति: परेषां परिपीडनाय| खलस्य साधोर्विपरीत मेतदं, ज्ञानाय दानायच रक्षणाय|| अर्थः दुष्ट माणसाची विद्या ही वादविवादासाठी असते.संपत्ती ही उन्मत्त होण्यासाठी असते;आणि शक्ती ही इतरांना त्रास देण्यासाठी असते. परंतु सज्जनांचे ह्याच्या उलट असते.कारण त्यांची विद्या ही ज्ञान मिळविण्यासाठी असते. संपत्ती ही दान करण्यासाठी असते; आणि शक्ती ही इतरांचे रक्षण करण्यासाठी असते.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/22/2009 - 20:59 नवीन

पाठभेद

आम्ही हे जरा वेगळं शिकलो... विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ति: परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वृषाली
व
वृषाली गुरुवार, 01/22/2009 - 21:11 नवीन

सुभाषिते.....

आपण लिहिलेले हे शाळेतील अभ्यासक्रमातील आहे आणि मी लिहिलेले हे संस्कृत साहित्यातील अमर सुभाषिते यातील आहे. वाक्यरचना जरी वेगळी असली तरी अर्थाचा बोध एकच आहे.!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
म
मनीषा गुरुवार, 01/22/2009 - 20:56 नवीन

सुभाषित संग्रह

चांगला उपक्रम ... भाषांसु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाणभारती तस्मात हि काव्यं मधुरम तस्मादपि सुभाषितम |
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 01/22/2009 - 21:15 नवीन

अरे पण या

अरे पण या सुभाषितांचा अर्थपण लिहा की... माझ्या सारखे संस्कृत न येणारेपण असतील की मिपावर. (आधीच आमच्या सुदलेखनाच्या नावानं बोंबा... त्यात संस्कृत कसं कळावं?) ~X( ~X( ~X( अनामिक
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान गुरुवार, 01/22/2009 - 21:18 नवीन

सातव्यासारखे

सातव्यासारखे एक कोडे मलापण आठवले - भोजनाते च किम्‌ पथ्यम्‌, जयंता: कस्य वै सुता: कथां विष्णुपदम्‌ प्रोक्तं, तक्रं शक्रस्य दुर्लभम्‌ ताक, इंद्र आणि अशक्य असे शेवटच्या चरणातले शब्द, पहिल्या ३ प्रश्नांची उत्तरे आहेत. * बाकी सर्व सुभाषिते वाचून शाळेत रट्टा मारलेली अजुन २ आठवली - नववीला होती बहुतेक सूर्याची स्तुति कम प्रार्थना होती एक- कल्याणानां त्वमसि महसां भाजनं विश्वमूर्ते धुर्यां लक्ष्मीमथं मयि भृशं देहि देव प्रसिद यद्‌ यद्‌ पापं प्रतिजही जगन्नाथ नम्रस्य तन्मे भद्रं भद्रं वितर्‌ भगवन्‌ भूयसे मंगलाय । आणि एक शंकराची चंद्रमय शब्दांनी स्तुति होती- चंद्राननार्धदेहाय चंद्रांशुसितमूर्तये चंद्रार्कानलनेत्राय चंद्रांर्धशिरसे नम: सुभाषित म्हणले, की सज्जन, दुर्जन, चंदन, सुगंध असले शब्द आठवतात.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 01/22/2009 - 21:37 नवीन

अजून एक आवडते

चांगला उपक्रम, वर लिखाळांनी सांगितल्याप्रमाणे उपक्रमावर पण अवश्य पहा :-) एक आवडणारे, आठवणीप्रमाणे येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म:। ते मर्त्यलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति (भतृहरीचे नितिशतक) ज्या व्यक्ती विद्या, तप, दान, ज्ञान, शील, तसेच कुठच्याही सद्गुणांनी युक्त नसतात, त्या "खायला काळ आणि भुईला भार"असतात. अशा व्यक्ती ह्या मनुष्य नसून नुसत्या चरत राहणार्‍या पशूंसारख्याच असतात. अशाच अर्थाचे एक विवेकानंदांचे वाक्य आहे:
Get up, and put your shoulders to the wheel-------------how long is this life for? As you have come into this world, leave some mark behind. Otherwise, where is the difference between you and the trees and stones?They, too, come into existence, decay and die.
  • Log in or register to post comments
स
सचिन गुरुवार, 01/22/2009 - 23:09 नवीन

अजून काही

वरमेको गुणी पुत्रो नच मूर्खशतान्यपि एकश्चंद्रस्तमो हन्ति, नच तारागणोपि च - १०० मूर्ख मुले असण्यापेक्षा एकच गुणी मुलगा असणे चांगले. रात्री अनेक तारका आकाशात असल्या तरी, अंधार दूर करायला एकटा चंद्र पुरेसा असतो. आपद्गतम् हससि किम् द्रविणान्ध मूढ लक्ष्मी स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् एतान् प्रपश्यसि घटाङ्जलयंत्रचक्रे रिक्ता: भवन्ति भरिता: भरिताश्च रिक्ता: - श्रीमंतीचा गर्व असणार्‍या मूर्खा, संकटात सापडलेल्यांची अशी चेष्टा करू नको. लक्ष्मी कधीच एके ठिकाणी स्थिर नसते ! मोटेला लावलेल्या घागरी पाहा. भरलेली रिकामी होते, आणि रिकामी झालेली पुन्हा भरते...तसेच हे !! आणि एक मजेशीर.... सर्वस्य चाहं हृदिसन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च - सगळ्यांचा चहा हृदयातल्या "ष्टो" वर केला. नंतर लक्षात आले, आणि पोहे पण केले !!!! ("संस्कूत्र" दहावीतच सोडले, त्यामुळे सूदलेखणात चू. भू. द्या. घ्या.)
  • Log in or register to post comments
स
सचिन गुरुवार, 01/22/2009 - 23:12 नवीन

बहूनि मे...

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन -- खूप मे महिने असेच गेले...आणि तुझा जन्म चार जूनला झाला
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान गुरुवार, 01/22/2009 - 23:21 नवीन

हा हा

ह्याच्यावरुन आठवले तमसो मा ज्योति:गमय चा अर्थ आम्ही, "तुमची आई जोतिबाच्या देवळात गेलीय" असा सांगायचो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
म
मुक्तसुनीत गुरुवार, 01/22/2009 - 23:26 नवीन

हाहा

याच न्यायाने "जाड्याप" हा संस्कृत शब्द आहे हे अर्थातच माहित नसल्याने "नि:शेष झालेला तो जाड्या पहा" असे "या कुंदे तुषार हार धवला " या श्लोकाच्या अंती वाटायचे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान
व
विकास गुरुवार, 01/22/2009 - 23:25 नवीन

म्हणजे?

खूप मे महिने असेच गेले...आणि तुझा जन्म चार जूनला झाला कवीला नक्की काय म्हणायचे आहे? :-) अशाच संदर्भात कधीकाळी ऐकलेला एक पीजे आठवला: संस्कृतमधे कुठल्यातरी साहीत्यात (मूळ रामायण नसावे) रामाच्या तोंडात वनवासाला जात असताना अयोद्धेकडे बघत लक्ष्मणाला उद्देशून वाक्य आहे की "तेनो दिवस: गतः", अर्थात ते (अयोद्धेतील) सुखाचे/प्रेमाचे दिवस आता दूर गेले... वर्गात ह्या वाक्याचे भाषांतर करायला सांगितल्यावर एका विद्वानाने केले, "तरीही दिवस गेलेच..." मास्तरांनी त्याला उरलेला दिवस कसा घालवायला लावला असेल याची कल्पना केलेली बरी :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
अ
अवलिया गुरुवार, 01/22/2009 - 23:28 नवीन

तेनो दिवस: गतः

=)) मस्त --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मुक्तसुनीत गुरुवार, 01/22/2009 - 23:29 नवीन

हाहा

"तरीही दिवस गेलेच..." भन्नाट विनोद !! पोस्ट ग्रॅजुअशनला आमच्या वर्गात एक पूर्वी कॉन्वेंटमधे मधे गेलेली मराठी मुलगी होती. सेमिस्टर संपत यायला लागल्यावर जो तो आपापल्या घरी जायची वेळ येऊन ठेपली. कँटीन मधे आमची मैत्रीण म्हणाली : "कसे दिवस गेले काही समजलेच नाही ना !" बाकीचे का जोरजोरात हसत आहेत ते बिचारीला कळाअयला ५ मिनिटे लागली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मुक्तसुनीत गुरुवार, 01/22/2009 - 23:14 नवीन

धन्यवाद

सुभाषिते उधृत करणार्‍या सर्व लोकांचे आभार. हा धागा वाचताना वेळ अतिशय चांगला गेला. लिखाळांचेही अनेक आभार !
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Fri, 01/23/2009 - 00:31 नवीन

सुभाषिते!

वा! हा फारच छान धागा आहे. मला सुचणारी ही सुभाषिते! घृष्टं घृष्टं पुनरपि पुनः चंदनं चारुगंधं छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डं दग्धं दग्धं पुनरपि पुनः कांचनं कांतवर्णं प्राणांतेपि प्रकृति विकृतिर्जायते नोत्तमानां|| अर्थात - कितिही उगाळावे, चंदन सुगंधीच; कितिही तुकडे करा ऊस गोडच; कितिही तापवा, सुवर्णाची चकाकी तशीच; प्राणावर बेतले, तरी उत्तमांची गती बिघडत नाही. गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः राम रावणयोर्युद्धं रामरावणयोरिव|| अर्थात - आकाशाची तुलना? आकाशाशीच, सागराची सागराचीच. तद्वतच, राम रावणांच्या युद्धाची तुलना दुसर्‍या कोणाशी होऊ शकत नाही. जानामि नागेंद्र तव प्रभावो, कण्ठे स्थितो गर्जसि शंकरस्य स्थानं प्रधानं न बलं प्रधानं स्थाने स्थितो कापुरुषोपि शूरः|| अर्थात - हे नागराजा, तुझा मोठेपणा काय ते मला माहीत आहे, शंकराच्या गळ्यात राहून भय दाखवतोस; बळ नव्हे तर स्थान हेच महत्वाचे; अशा ठिकाणी राहून एकादा दुबळाही शूर भासतो. आणि हे एक तर फारच प्रसिद्धः उष्ट्राणां लग्नवेलायां गर्दभा: मंत्रपाठका: परस्परं प्रषंसन्ति अहो रूपमहोध्वनि:|| अर्थात - उंटांच्या लग्नाला मंत्रपठणाला बसले गाढव; एकमेकांची तारीफ करतात, (गाढव उंटाना) वा वा काय रूप आहे - काय जोडा जमलाय; (उंट गाढवाना) वा वा काय सूर लावलाय! संस्कृतातले श्लोक / सुभाषिते मराठीत भाषांतरित करणे हे ठीकच आहे. पण गदिमांसारख्याची थोरवी ही की त्यानी संस्कृतातील श्लोकाला तोडीस तोड असे कडवे गीतरामायणात 'बोलता बोलता' रचले. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महादधौ, समेत्यच व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः|| अर्थात - दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाहि गाठ. क्षणिक तेवि आहे बाळा मेळ माणसांचा!!! गदिमांना आणि त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/23/2009 - 00:45 नवीन

सुरेख आहे हा उपक्रम..

आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम् अधनस्य कुतो मित्रा: , अमित्रस्य कुतो सुखम्.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/23/2009 - 00:55 नवीन

अधिष्टानं

अधिष्टानं तथा कर्ता करणं च पृथा विग्वधम् विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पश्चमम्.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 01/23/2009 - 01:20 नवीन

अरे पंडितांनो...

संस्कृत सुभाषितांबरोबर त्यांचे अर्थही सांगा ही विनंती .....ज्याप्रमाणे सुवर्णाने धागा सुरू करताना सांगितले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/18/2026 - 18:38 नवीन

मस्त

मस्त

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा