भटोबा, मस्तच जमलं आहे हे! आणि जिंप वापरल्याबद्दल स्पेश्शल वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
थ्यांक्यू थ्यांक्यू. बाकी प्रोसेसिंगचं म्हणाल तर २-३ गोष्टी केल्यात. पहिलं म्हणजे पार्श्वभूमी कृष्णधवल केली आहे. त्या चित्राचा फोकस फार काही उच्च नव्हता, पार्श्वभूमी पण सगळी फोकस मधे होती, जे मला नको होतं. म्हणून पार्श्वभूमी ब्लर केली.नंतर ह्यू आणि सॅचुरेशन थोडंसं वाढवलं, त्यामुळे फुलाचा लाल रंग थोडा अधिक भडक झाला. लाईटनेस कमी केला त्यामुळे एक डार्क फील आला. आणि मग ह्यू-सॅचुरेशन बदलण्याचा फुलावरील परिणाम नैसर्गिक वाटावा म्हणून फूल पण किंचित ब्लर केलं (गाउशियन ब्लर - ५ पिक्सेल त्रिज्या). एवढं केलं.
>>म्हणजे नक्की काय केलेत हे कळेल का?
धन्यवाद तात्या. गिंप (किंवा जिंप) हे 'इमेज प्रोसेसिंग' साठी वापरले जाणारे एक सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये असल्या गोष्टी करता येतात.
चांगले आहे :)
मी इमेज प्रोसेसिंग वगैरे कधी जास्त केले नाही. फक्त स्वतःचे फोटो कधीतरी केले असतील काँट्रॅस्ट वगैरे करीता.
तुम्ही मूळ छायाचित्रही टाकलेत तर आणखी मजा वाटेल, कसे वाटते ते कळवायला ;)
भटोबा,
छान केले आहे.
फुलाचे देठ अथवा थोडा खालचा भाग फोकस मध्ये नसल्याने फुल एकदम चिकटवल्यासारखे दिसते. पण तुम्ही केलेल्या रंगसंगतीने तो दोष थोडा झाकला गेल्यासारखे वाटले. रंगसंगती मजेदार.
फुलाच्या मध्यभागातून वर आलेला जो भाग आहे त्याची सावली आपल्या बाजूला दिसते आहे. पण तो मूळ भाग सुद्धा सावलीसारखाच दिसला. काल हे फुल पाहताना मला वाटले की आपण प्रकाश झोत सुद्धा जिंप मध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे मूळ चित्रातली सावली आणि जिंपमुळे आलेली नवी सावली अश्या दोन तयार झाल्या. त्या मला विशेष आवडल्या नाहित. आज पुन्हा पाहता ते तसे नाही असे जाणवले. (कार्यालयातल्या मॉनिटरचे रंग चांगले नसल्यामुळे सुद्धा असेल.)
मागच्या भिंतीचा पांढरारंग सुद्धा जिंपमध्ये थोडा अधिक गडद केला असता अथवा तो भाग अचित्रातून काढून टाकला असता तर बरे वाटले असते. त्या भगाकडे उगिच लक्ष जात आहे.
प्रयोग आवडला.
पुढील प्रयोगास शुभेच्छा !
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
प्रतिक्रिया
झक्कास
>>आणि जिंप
झकास ...
धन्यवाद...
सही रे भटा.
थ्यांक्यू
फूल छान
>>म्हणजे
दोन्ही फोटो हवे होते
फारसे नाहि आवडले
चांगले आहे
झकास
भटोबा, छान
प्रतिसाद
धन्यवाद