सोनिया गांधी ह्यांनी आपल्या आठवणी Belonging ह्या मथळ्याखाली प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेत Alfred A. Knopf हे प्रकाशक ह्या पुस्तकाच्या १००,००० प्रति प्रकाशित करणार आहे. भारतीय पुस्तक एवढ्या मोठया संख्येने अमेरिकेत उपलब्ध होण्याची हि कदाचित पहिलीच घटना असेल. Knof हे पेंग्विन* ह्या विख्यात प्रकाशनगृहाचा भाग आहे. मजेची गोष्ट म्हणजे पेंग्विन भारतांत सुद्धा हे पुस्तक प्रकाशित करणार होते पण संशयास्पद पद्धतीने त्यांनी अचानक माघार घेतली .त्यांच्या वकिलांनी हे पुस्तक भारतांत प्रकाशित करणे धोक्याचे ठरेल असा सल्ला म्हणे त्यांना दिला. आता हार्पर कॉलिन्स हे पुस्तक भारतांत प्रकाशित करणार आहे म्हणे.
सोनिया गांधी ह्यांच्या विषयी मला विशेष प्रेम नसले तरी निःसंशय पणे आधुनिक भारतातील सर्वाधिक शक्तिशाली राजकीय नेत्यांपैकी त्या एक होत्या. त्यांनी अनेक घटना जवळून अनुभवल्या आहेत आणि त्यामुळे इतिहासासाठी त्यांची बाजू मांडण्याचा त्यांना हक्क असावा ह्यांत दुमत नाही.
भारतीय लोक दुर्दैवाने ह्या अनुभवाला मुकणार आहेत.
पेंग्विन नक्की का घाबरला हे त्यांनी स्पष्ट केले नसले आणि सोनिया गांधी आणि परिवाराने सुद्धा ह्यावर मौनव्रत घेतले असले तरी मीडिया च्या गुप्त सुत्रां च्या मते पेंग्विन भारत ने सोनिया गांधी ह्यांना तीन गोष्टी पुस्तकांतून वगळायचा सल्ला दिला होता.
पहिली गोष्ट म्हणजे एका नेत्याने प्रचाराच्या रणधुमाळीत सोनिया गांधी ह्यांना जर्सी गाय म्हणून संबोधित केले होते. त्याबद्दल आपल्याला काय वाटले ह्यावर त्यांनी जे काही लिहिले होते ते काढून टाकावे अशी नम्र विनंती पेंग्विन ने केली होती.
दुसरो गोष्ट म्हणजे संघाच्या संदर्भांत काहीतरी त्यांनी लिहिले होते ते सुद्धा काढून टाकावे अशी मागणी केली होती.
तिसरा मुद्दा हा चिनी अतिक्रमणाच्या संदर्भांत होता.
आता पुस्तकाची गळचेपी झाली असल्याने अमेरिकेत पुस्तक उपलब्ध होतांच ते वाचून चर्वित चर्वण सुरु होईल आणि जास्त माहिती येईल. सार्वजनिक आयुष्यांत शिवीगाळ होणारच त्यामुळे गांधी ह्यांना वाईट वाटणे स्वाभाविक असले तरी मला पहिल्या मुद्द्याबद्दल विशेष उत्सुकता नाही पण इतर दोन मुद्यांत गांधी ह्यांचे मत काय असेल हे जाणून घेणे आवडेल.
सरकारी दबावाखाली लोळण घेण्याची पेंग्विन ह्यांची हि तिसरी वेळ आहे. ह्याच्या आधी जनरल नरावणे ह्यांचे पुस्तक रद्द केले गेले होते त्यांत त्यांनी गलवान बद्दल लिहिले होते.
राजकीय भूमिका काहीही असली आणि मला काही लोक आवडत नसले तरी पुस्तके लिहिणे, आपली बाजू मांडणे हि एकूण लोकशाहीच्या हितासाठी चांगली बाब आहे. त्यामुळे खुद्द कोंग्रेस ने विविध वेळा व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांचा गळा निर्लज्ज पणे घोटला असला तरी सोनिया गांधी ह्यांचे पुस्तके भारतांत विना सेन्सर उपलब्द असावे असे वाटते.
इंटरनेट च्या काळांत सेन्सॉरशिप शक्य नाही पण उलट पुस्तकाची गळचेपी करण्याचे प्रयत्न आता पुस्तकाला बेस्ट सेलर बनवतील.
पुस्तक मी प्री बुक केले असल्याने मिळाले कि तात्काळ वाचून इथे समीक्षा टाकण्यात येईल त्यामुळे मिपा कराना सेन्सॉरशिप ची झळ लागणार नाही.
टीप : ह्या संपूर्ण लेखांत पेंग्विन हा शब्द पेंग्विन रँडम हाऊस ह्या प्रकाशकासाठी वापरला आहे. नाही तर महाराष्ट्रांत ह्या शब्दप्रयोगाने लोकांच्या भावना वगैरे दुखावतात म्हणे.
अवांतर:
भारतांत राजकीय नेत्यांच्या संस्मरण किंवा आत्मकथा अतिशय सुमार दर्जाच्या आहेत. अरुण शॉरी ह्यांचे Commissioner of Lost Causes छान होते पण राजकीय नेते म्हणून त्यांची भूमिका अतिशय छोटी होती. नटवर सिंग ह्यांची चिनी डायरी सुद्धा वाचनीय पुस्तक होते पण ते त्यांच्या डिप्लोमेट कार्याबद्दल होते. लालकृष्ण अडवाणी ह्यांचे My Country My Life अतिशय सुमार दर्जाचे होते. ह्याशिवाय वाचनीय असे हिंदी इंग्रजी मराठी पुस्तक मला ठाऊक नाही. कुणाला ठाऊक असल्यास सांगा.
[१] https://www.youtube.com/watch?v=Z0WySTaydA8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती.पेंग्विन नक्की का…
छान माहिती.
पेंग्विन नक्की का घाबरला>>
पेंग्विन ला सत्तेतील नंदीबैलांनी धमकी दिली असावी.
सोनिया गांधी यांच्या आठवणी…
सोनिया गांधी यांच्या आठवणी आहेत तर त्या त्यांच्या विचारांप्रमाणे आणि स्वसमर्थनार्थ असणार हे ओघाने आलेच. जर एखाद्या लेखनाने राष्ट्रहितासंबंधी गोपनीय माहिती उघड होत नसेल आणि शत्रूराष्ट्रांना त्या लेखनाचा फायदा होणार नसेल तर त्यावर प्रकाशित न करण्यासाठी दबाव आणणे चुकीचे आहे.
👍️
👍️