ही प्रतिक्रिया कुणा "अप्पा जोगळेकर" नामक आयडी ची आहे.
लिंक - https://www.misalpav.com/comment/1208609#comment-1208609
आणि प्रतिसाद
इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल किंवा एकंदरीतच युरोपियन देश यांनी काहीशे वर्षे भारतीय उपखंड, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत अमर्याद लुटालुट, रक्तपात केला , धर्मांतरे घडवली, सरकारे हायजॅक केली आणि बनाना रिपब्लिक जन्माला घातली. भारतात लुटलेल्या संपत्तीची मोजदाद आताच्या मूल्यांकनाप्रमाणे 45 ट्रिलियन डॉलर इतकी आहे असे शशी थरूर यांनी सांगितले होते.ही मोजदाद कशी केली ते माहिती नाही.
तर अशा लुटारू देशांमध्ये आज घुसखोर शरणार्थी घुसले, लुटालुट केली ,स्पॅनिश बायका भोगल्या तर एका अर्थाने हा काव्यगत न्याय झाला. आपण आता पाताळ विजयम मधल्या दानवासारखे विकट हास्य करू शकतो.
काही गंभीर प्रश्न मि.पा प्रशासक आणि मुख्यत: वाचकांसाठी-
१. हेच आयडी "पंतप्रधानांना शिव्या दिल्या" म्हणून थयथयाट करतात आणि वर लिहिलेली विधानं करतात. हे "सुसंस्कृत लोक"?
२. मि.पावर हे असलं लिहिलेलं चालतं? रिपोर्ट कुठे करायचं? आय.डी. बॅन कसा करता तुम्ही लोकं?
जास्त काही लिहिवत नाही, पण असे सडक्या मनोवृत्तीचे लोक जेव्हा "पोरांनी ताळतंत्र सोडला हो आंदोलनात" वगैरे भंपक वाक्य लिहीतात तेव्हा अगदीच उलटी येते.
अप्पा जोगळेकर, लिहीत रहा...
मिसळपाव
इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल…