Skip to main content

आषाढस्य प्रथम दिवसे ... महाकवी कालिदास दिवस

लेखक साहना यांनी शुक्रवार, 17/07/2026 13:56 या दिवशी प्रकाशित केले.

 

महाकवी कालिदास ह्यांची जयंती हल्लीच झाली ( आषाढ कृष्ण प्रतिपदा) त्या निमित्ताने काही हलके फुलके.

भारतीय समाजाने मागील काही हजार वर्षांत जे काही कमावले आहे त्यांत भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृत भाषा (आणि त्यातील साहित्य/रचना) इत्यादी द्वितीय क्रमांकावर आहेत. प्रथम क्रमांकावर वेदांत. भारताची सद्य अधोगती पाहता ह्या गोष्टी ह्याच समाजातून निर्माण झाल्या आहेत का असा निराशात्मक विचार मनात येतो पण त्याच वेळी ज्या हिरीरीने आणि वृत्तीने ह्याच समाजाने वेदांत, संस्कृत आणि शास्त्रीय संगीत जिवंत आणि काही अर्थाने वाढीस सुद्धा लावले आहे त्यातून एक सकारात्मक आशा सुद्धा वाटते.

बेंगलोर च्या नवीन विमानतळावर एक कलाकृती ठेवण्यात आली आहे ज्याचे नाव "मेघदूत" आहे. आधुनिक भारताची अधोगती आणि त्याच वेळी भूतकाळांतील विद्वत्ता ह्यातील जो विरोधाभास आहे तो अनावधानाने ह्या कलाकृतीतून दिसून येतो.

कालिदास आपल्या दुसऱ्या  श्लोकांत मेघदूत म्हणजे त्या ढंगाचे वर्णन करतात :

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं 
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श

AI स्टार्ट  : 
मराठीत शब्दशः अर्थवप्रक्रीडा (Vapra-krīḍā): हत्तीने आपल्या सुळ्यांनी (दातांनी) नदीचा काठ किंवा मातीचा ढिगारा उकरणे किंवा त्याला धडक देणे (याला हत्तीचा खेळ मानले जाते).परिणतगज (Pariṇata-gaja): पूर्ण वाढ झालेला, बलाढ्य आणि तिरप्या मुद्रेत उभा असलेला मत्त हत्ती.प्रेक्षणीयं (Prekṣaṇīyam): पाहण्यासारखा, अत्यंत देखणा किंवा प्रेक्षणीय.श्लोकाचा संपूर्ण मराठी भावार्थआपल्या प्रिय पत्नीपासून दूर राहिलेला तो विरही यक्ष रामगिरी पर्वतावर दिवस कंठत होता. विरहाच्या दुःखाने तो इतका रोडावला होता की त्याच्या हातातील सोन्याचे कडे गळून पडले होते. अशा स्थितीत, आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने पर्वतशिखराला कवेत घेणारा एक मेघ पाहिला. तो मेघ कसा दिसत होता? तो एखाद्या तटबंदीला किंवा मातीच्या कड्याला आपल्या सुळ्यांनी धडक देणाऱ्या (वप्रक्रीडा करणाऱ्या) एका भव्य, मत्त हत्तीसारखा अत्यंत प्रेक्षणीय दिसत होता.
AI end  


बेंगलोर मध्ये जी कलाकृती लावली आहे त्याचा आणि ह्या मेघदूतातील वर्णनाचा काडीचाही संबंध नाही. उलट महाकवी कालिदासानी ढंगाचे वर्णन "हत्तीची विष्ठा" ते केले असते तर मात्र ती कलाकृती चपखल वाटली असती.

इंग्रजीत "standing on the shoulders of the giants" असा वाक्प्रचार आहे. ह्याचा अर्थ भूतकाळांत ज्यांनी महान काम केले त्यात आपण खारीचा वाटा लावतो आणि खूप श्रेय घेतो. थोडक्यांत भूतकाळांत मोठे काम केलेल्या प्रति ह्या वाक्प्रचारातून आदर दाखविला जातो. पण सादर कलाकृती म्हणजे standing on the shoulders of the giants and vomiting below  हा प्रकार आहे.

--

काव्य ह्या गोष्टीची एक सुरेखता आहे. काव्य समजण्यासाठी आणि त्यातील सौंदर्य समजण्यासाठी जी पात्रता लागते ती सहज हस्तगत करता येते. काही छोट्या सोप्या कवितांतून अगदी अडाणी माणूस सुद्धा सौंदर्य शोधू शकतो. आणि एकदा चटक लागली कि हळू  हळू कुठली कविता चांगली ? कुठली निरर्थक ? कवितेचा भाव काय हे समजू लागते. मग आपल्या आयुष्यांतील सध्या सोप्या गोष्टींत आपल्याला कवी मनाप्रमाणे सौंदर्य दिसू लागते. नेहमी LA किंवा वेगास मध्ये माझे विमान उतरते तेंव्हा बाहेर असंख्य दिवे दिसू लागतात. माझ्याकडे प्रतिभा नाही पण मी नेहमीच

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !

ह्या ओळी आठवते. विमान उतरणे हि साधी गोष्ट झाली पण एक कविता पाठविल्याने अचानक त्यांत सौंदर्याची अनुभूती होते.

स्पॅनिश भाषेवर माझे विशेष प्रेम आहे. हि भाषा हल्लीच शिकली पण त्यातील काव्य हे भारतीय काव्याप्रमाणेच अलंकारीत भाषेवर अतिवास्तववाद वर भर देते. पाब्लो नेरुदा आणि लोर्काह हे ह्या भाषेंतील दोन सुप्रसिद्ध कवी. लोर्का हे स्पेन मधील आणि तेथील गृहयुद्धान्त अवघ्या ४० वर्षी मारले गेले. नेरुदा हे नोबेल प्राप्त चिले मधील कवी. नेरुदा आणि कालिदास ह्यांच्या काव्यांत कमालीचा समभाव आहे.

पाब्लो नेरुदा कम्युनिस्ट होते  (त्यांच्या कवितांच्या आणि राजकारणाचा संबंध नाही) आणि त्यामुळे त्यांना देशांतून हद्दपार केले आणि काही काळ ते इटली मधील एका छोट्या गावांत राहिले. त्यांना असंख्य पत्रे येत, त्यामुळे फक्त त्यांच्या पात्रांसाठी पोस्ट ऑफिस ला एका विशेष पोस्टमन ची नेमणूक करावी लागली. ह्या जवळ जवळ अशिक्षिक्षित पोस्टमन ला नेरुदा म्हणजे एक अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व वाटले. विशेषतः ज्या पद्धतीने नेरुडांच्या मागे स्त्रिया पडत ते पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि हळू हळू नेरूदाशी त्याची मैत्र सुद्धा झाली. नेरुडांच्या कवितांतून त्याला नेहमीच्या जीवनातील सौंदर्य तर दिसलेच पण तो स्वतः सुद्धा शब्दात व्यक्त करू शिकला.

El Postino हा इटालियन चित्रपट हि कथा अत्यंत सुरेख पणे सांगतो. कालिदास असो वा नेरुदा, एकदा आपल्याला सौंदर्य दिसले कि सत्य आणि शिवम आपोआप दिसतात कारण तिन्हीत फरक नाहीच. अश्या हृदयांत मग कटुता, द्वेष ह्या भावना आणि संकुचित मानसिकता आपोआप नष्ट होत जाते.

I want you to know
one thing.

You know how this is:
if I look
at the crystal moon, at the red branch
of the slow autumn at my window,
if I touch
near the fire
the impalpable ash
or the wrinkled body of the log,
everything carries me to you,
as if everything that exists,
aromas, light, metals,
were little boats
that sail
toward those isles of yours that wait for me.
....

But 
if each day, 
each hour, 
you feel that you are destined for me 
with implacable sweetness, 
if each day a flower 
climbs up to your lips to seek me, 
ah my love, ah my own,

[Si cada día sube 
una flor a tus labios a buscarme, 
ay amor mío, ay mía]

in me all that fire is repeated, 
in me nothing is extinguished or forgotten, 
my love feeds on your love, beloved, 
and as long as you live it will be in your arms           
without leaving mine.


--

गुलझार ह्यांचा कवितांतून synthesesia नावाचा एक भाव दिसतो. ह्यांत उजेड, वास, रंग, स्पर्श ह्यांचा उल्लेख अवास्तविक पद्धतीने केला जातो पण तरी सुद्धा जी भावना कवीला व्यक्त करायची आहे ती स्पष्ट पणे एखाद्या फुलाच्या दरवळा प्रमाणे हृदयांत जाते.

पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट
कानों में एक बार पहन के लौटाई थी
पतझड़ की वोह शाख अभी तक काँप रही है
वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो

--

संस्कृत मधील हे काव्य पहा :

आरोपितः पृथुनितम्बतटे तरुण्या
कण्ठे च बाहुलतया निविडं गृहीतः ।
उतुङ्गपीनकुचनिर्भरपीडितोयं
कुम्भः करीषदहनस्य फलानि भुङ्क्ते । ।
(Subhāṣitāvali 994)

For riding on her rounded hip,
Encircled tight by her arms,
Pressed against the maiden’s breasts
The pitcher has to enjoy the fruit
of being fired in the potter’s kiln!

--

स्तनेषु हाराः सितचन्दनार्द्रा भुजेषु सङ्गम् वलयाङ्गदानि।
प्रयान्त्य् अनङ्गातुरमानसानां नितम्बिनीनाम् जघनेषु काञ्च्यः॥ (ऋतुसंहार) ऋतूंचा संग्रह.

ज्या स्त्रियांच्या मनात कामदेवामुळे उत्कट ओढ निर्माण झाली आहे, अशा त्या सुंदरींच्या स्तनांवरील मोत्यांचे हार पांढऱ्या चंदनाच्या लेपामुळे ओले झाले आहेत; त्यांच्या हातांवरील कडी आणि बाजुबंद एकमेकांना स्पर्श करत आहेत, आणि त्यांच्या कमरेवरील कमरपट्टे (काञ्ची) सतत हालचाल करत खाली सरकत आहेत

प्रफुल्लचूताङ्कुरतीक्ष्णसायो द्विरेफमालाविलसद्धनुर्गुणः।
मनांसि वेद्धुम् सुरतप्रसङ्गिनां वसन्तयोद्धा समुपागतः प्रिये॥

हे प्रिये, बहरलेल्या आंब्याच्या मोहराचे तीक्ष्ण बाण आणि भुंग्यांच्या रांगेच्या रूपात शोभणारा ज्याचा धनुष्यबाण (प्रत्यंचा) आहे, असा हा 'वसंत' नावाचा योद्धा रसिक प्रेमींच्या मनाचा वेध घेण्यासाठी (त्यांना घायाळ करण्यासाठी) आला आहे.
---


टीप : बहुतेक भाषांत लल्लाबाई म्हणजे अंगाई गीते हि साधी सोपी आणि ऐकण्यास गोड वाटतात. स्पॅनिश अंगाई गीतांची रचना हि अतिशय गंभीर आणि थोडी रौद्र स्वरूपाची असते ह्यांत मुलांना घाबरवून झोपवले जाते. ह्या जुन्या अंगाई गीतांना नानास म्हटले जाते.

 


वाचने 49
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया