✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन

य
युयुत्सु यांनी
Mon, 02/02/2026 - 10:12  ·  लेख
लेख
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन -राजीव उपाध्ये २०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते. जर हे निष्कर्ष कायदेशीर आणि सामाजिक चौकटीत लागू केले गेले, तर सामाजिक कराराची संपूर्ण पुनर्रचना करणे आवश्यक बनते. यामुळे १८ वर्षांची जुनी प्रौढत्वाची मर्यादा बदलून न्याय, आर्थिक अवलंबित्व आणि नागरी सहभागाची एक नवी श्रेणीबद्ध व्यवस्था निर्माण करणे आवश्यक बनते. मेंदूच्या पाच कालखंडांची रचना कॅम्ब्रिज अभ्यासात ३,८०२ एमआरआय स्कॅनचा वापर करून जन्मापासून ९० वर्षांपर्यंतच्या मानवी मज्जासंस्थेच्या जोडण्यांचा नकाशा तयार करण्यात आला. संशोधकांनी मेंदूच्या रचनेत विशिष्ट टप्प्यांवर होणारे बदल शोधण्यासाठी 'ग्राफ थिअरी' आणि 'युनिफॉर्म मॅनिफोल्ड प्रोजेक्शन अँड अप्रोक्सिमेशन' (UMAP) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. मेंदूच्या परिपक्वतेचे आणि ऱ्हासाचे तुलनात्मक निकष वापरून मानवी जीवन पाच असमान कालखंडात विभागता येते. हे कालखंड सामाजिक अपेक्षांचा पाया ठरतात. वयाच्या ९ ते ३२ मधील कालखंड हा एकच निरंतर विकासाचा टप्पा असल्याचा प्रमुख निष्कर्ष हे या अभ्यासाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या काळात मेंदूची संवाद साधण्याची 'सर्वंकष कार्यक्षमता' सतत वाढत असते. याचा अर्थ असा की मानवी मेंदू वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत 'निर्माण' अवस्थेत असतो. या अभ्यासाचे निष्कर्ष अमलात आणणे हे सामाजिक कल्याणाच्या भूमिकेतून कितीही हितकर असले तरी अंमलात आणणे महाकठीण आहे. समाजातला मोठा वर्ग हितसंबंध जपणार्‍या व्यवस्थेत वैज्ञानिक सत्ये पचवू शकत नाही हे त्यातले गैरसोईचे सत्य आहे. कदाचित सर्वांचे कल्याण साधु शकेल असा "आदर्श समाज" निर्मितीमधला तो सर्वात मोठा अडथळा आहे... संदर्भ - https://www.msn.com/en-in/health/nutrition/study-identifies-five-major-stages-of-brain-growth-claims-adulthood-actually-starts-at-32/ar-AA1RagJo?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
333 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा