Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कंजूस on गुरुवार, 09/25/2025 - 14:12
गूगल फोटोजमधून मिपावर फोटो शेअर करणे. २०२५_०९_२५ google photos वर 'shared album ' कसा तयार करावा आणि का करावा.

google photos वर आपण फोटो अपलोड करतो किंवा backup करतो.
मिपावर फोटो देण्यासाठी एक वेगळा shared album तयार करून त्यास खास नाव दिले ( उदाहरणार्थ = माथेरान मिपा २०२५_०९_१२ किंवा Goa mipa 2024_11_08 ) तर आपल्याला लक्षात येते की हा अल्बम त्या ठिकाणचे त्या तारखेचे फोटो मिपावर लेखात देण्यासाठी आहे आणि तो आपल्याकडून चुकून डिलीट केला जात नाही. हे झाले नाव देण्याबाबत organiser.

shared album 'मध्ये फोटो ठेवल्याने ते वेगवेगळे share करण्याची खटपट वाचते.

तर आता पायरी पायरीने
गूगल फोटोज- वर फोटो अपलोड करणे,
तो फोटो एका शेअरिंग अल्बममध्ये टाकणे,
त्यातून फोटोची direct image link कशी काढायची ते पाहू.

Android फोन असेल तर..
Chrome ब्राउजर उघडून photos.google.com उघडा. तुमचे लॉगिन असल्याने वेगळे लॉगिन करावे लागणार नाही.
तर असं चित्र दिसू शकते. अड्रेस बारमध्ये वरील लिंक दिसेल. किंवा डावीकडे तीन रेषांचा मेनू आणि Photos असं दिसेल.
(जर का ही साईट उघडलीच गेली नाही आणि Google photos app उघडले गेले तर
Phone settings>> apps>>default apps>> open links>>open links in instant apps येथे बटण on दिसेल ते off करा.
तुमचे काम झाल्यावर पुन्हा on करून ठेवा.)तर आपल्याला हे काम साईट मधूनच करायचे आहे.

फोटो १
आता उजवीकडच्या टूल बारमध्ये दिसलेल्या + वरती क्लिक करा..


फोटो २
या ठिकाणी जो मेनू दिसेल त्यात import photos वर क्लिक करून फोनच्या स्टोरेजमधील माकडाचा फोटो अपलोड केला


फोटो ३
डावीकडे खाली माकडांचे चित्र अपलोड होऊन त्याखाली add to album दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.


फोटो ४
यात add to album menu मध्ये + new album वर क्लिक करा. किंवा अगोदरच एखादा shared album असेल तर त्यात पाठवून क्रमांक १३ पासून पुढे जाता येईल


फोटो ५
या स्क्रीनवरती नवीन अल्बमचे नाव Add a Title मध्ये लिहा.


फोटो ६
उदाहरणार्थ नाव Trial today लिहिलं. आणि परत मुख्य पानावर जा.


फोटो ७
Photos मध्ये माकडाचा फोटो आहे. आता मेनूमध्ये albums वर क्लिक करा


फोटो ८
इथे आपण बनवलेला नवीन अल्बम Trial Today दिसत आहे आणि त्यात माकडांचे चित्र आहे. पण तो अल्बम shared नाही. त्यास shared करायचे आहे. त्या अल्बमला क्लिक करा तो मुख्य पानावर येईल.


फोटो ९
अल्बम मुख्य पानावर आलेला आहे. वरती उजवीकडे उभ्या तीन डॉट्स मेनूवर क्लिक करा.


फोटो १०
या मेनूतील options वर क्लिक करा.


फोटो १ १
यात pop up menu दिसेल. Sharing
Link sharing.
Let anyone with the link see photos and people in this album यांच्यासमोर चे बटण फुली मारले आहे ते सरकवा आणि on करा.


फोटो १२
हे चित्र येईल आणि खाली ( copy link) म्हणजे पूर्ण अल्बमची sharing link असते . ती. आपल्याला नको आहे. आता मुख्य पानावर मागे जा.


फोटो १३
आता नवीन अल्बमचे नाव आणि खाली shared हा शब्द आहे म्हणजे या अल्बममध्ये असलेले सर्व फोटो शेअरिंग साठी तयार आहेत. आता त्यात माकडाचा एकच फोटो आहे त्यावर क्लिक केल्यावर तो मोठा दिसेल.


फोटो १४
फोटो मोठा झाला आहे आणि address bar मधली लिंक पाहा. ही लिंक नको आहे. ही direct image link नसते.
याच फोटोवर long press केल्यावर pop up येईल.


फोटो १५
Pop up मध्येच वरती open image in new tab यावर क्लिक करा.


फोटो १६
आता पाहा .... फोटो तोच आहे परंतू address bar मधली लिंक बदली झाली आहे. ..lh3 googleusercontent....अशी सुरू होणारी . हीच ती direct image link कॉपी. करून घ्या आणि मिपावर फोटो टाकण्यासाठी वापरा.


Writing dialog boxमध्ये ही लिंक पेस्ट करा , height चा रकाना रिकामा सोडा, width च्या रकान्यात उभ्या फोटोसाठी 80% भरा, आडव्या फोटोसाठी width 100% लिहायचे आहे. यानंतर ओके दाबून वरच्या टूलबार मधले डोळ्याचे चिन्ह दाबा. Preview येईल. फोटो उमटतो का ही तपासणी होईल. ही तपासणीची पायरी केल्यशिवाय मेसेज 'पाठवा' चे बटण दाबून नका.

आता हे काम झाले. पण पुढे कधीतरी आणखी एखादा फोटो शेअर करावा लागेल तेव्हा फोटो क्रमांक १३, पायरी १३ सुरू करून त्या shared album मध्येच नवीन फोटो अपलोड करा. हा आपोआपच shared राहील. पुढील कृती करून लिंक मिळवता येईल.

----------------------

पूर्वीच्या लेखांमध्ये दिलेल्या बऱ्याचशा फोटो शेअरिंग साईट्स आता बंद पडल्या आहेत, तर काहींचे फ्री अकाऊंटस या कामासाठी वापरता येत नाही तर काहींनी शेअरिंगवर मर्यादा घातल्या आहेत. आपला गूगल अकाऊंटच वापरून १५ जीबी स्टोरेज प्रत्येक जीमेलला मिळते ते वापरा. गूगल फोटोज् किंवा गूगल ड्राईव वापरा.

अडचणी, दुरुस्त्या आणि सूचना कळवा.

..............

(संपादन करता यावे आणि चुका दुरुस्त करता याव्यात म्हणून कलादालन विभागात लेख टाकत आहे. तंत्रज्ञान भागात लेख टाकता येत नाहीये.)

  • Log in or register to post comments
  • 4149 views

प्रतिक्रिया

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 09/25/2025 - 15:45

Permalink

धन्यवाद करून बघतो

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 09/25/2025 - 22:12

Permalink

अ ति शय महत्वाचं आणि सुलभ

अ ति शय महत्वाचं आणि सुलभ करून सांगितलेलं काम. कंजुसजी ... आपण मागच्या महिन्यात हे मला हे व्यनि सांगितले होते.... त्याचा खुप उपयोग होतो आहे. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 09/26/2025 - 07:21

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 09/26/2025 - 13:13

Permalink

google photos चे

१५ जीबी स्टोरेज कधीच संपले आहे. ५० ते ७५ जी बी फोटो आहेत त्यामुळे google ला खंडणी समान पैसे देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 09/26/2025 - 13:59

In reply to google photos चे by निनाद

Permalink

स्टोरेज कधीच संपले आहे.

स्टोरेज कधीच संपले आहे.
त्याला पळवाट आहेच. प्रत्येक जीमेल अकाऊंटला १५ जीबी स्टोरेज आहे. आणि आपण अधिक अकाऊंट उघडायला मोकळेच आहोत. माझ्याकडेच सात आहेत. त्यावर बंधन नाही. काय करायचं की दोन तीन rediffmail email account उघडा. त्यांचे पासवर्ड डिटेल कुठेतरी नोंदवून ठेवा. एकाचे Recovery mail option दुसऱ्याला करायचे. फोन नंबर मागितला तर द्यायचा आणि नंतर आणखी एक Recovery mail option देऊन तो फोन नंबरही काढून टाकायचा. नवीन जीमेल अकाऊंट उघडताना नवनवीन नावे द्यायची. Recovery mail option विचारेल तेव्हा एक रेडिफमेल अकाऊंट द्यायचा आणि तिकडे जाऊन verify करा. हल्ली फोन नंबर mandatory आहे तो नंतर द्यायचा. परंतू एका रिकवरीने ऐंशी टक्के काम झालेले असते. पैसे वाचतात पण काम वाढतं. ते म्हणजे सर्व इमेल अकाउंटस नावे, पासवर्ड कुठेतरी नोंदवून महिन्यातून एकदा तरी उघडून मेल पाठविणे करायचे . Activity हवी. अन्यथा बरेच महिने वापर न केल्यास बंद करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक सदस्य on गुरुवार, 11/20/2025 - 15:26

In reply to स्टोरेज कधीच संपले आहे. by कंजूस

Permalink

एका फोन वर किती जीमेल अकाऊंट?

एका फोन नम्बर वर किती जीमेल अकाऊंट ओपन होतात? सात आठ जीमेल अकाऊंट साठी २/३ तरी फोन नम्बर लागत असतील ना?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 11/20/2025 - 19:59

In reply to एका फोन वर किती जीमेल अकाऊंट? by अनामिक सदस्य

Permalink

प्रथम recovery ईमेल ( rediff

प्रथम recovery ईमेल ( rediff चा किंवा AOL)टाका आणि तो उघडून अकाऊंट verify करा. मग recovery फोन नंबर देण्यासाठी मागे लागतील तेव्हा अगोदरच दुसरीकडे दिलेला फोन नंबर द्या. त्यावेळेस अडवणूक होणार नाही बहुतेक. मी सहा महिन्यांपूर्वी नवीन जी मेल काढला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 09/26/2025 - 14:03

In reply to google photos चे by निनाद

Permalink

आणखी एक सिक्यूअर साईट आहे.

आणखी एक सिक्यूअर साईट आहे. त्यातून फोटो शेअर होत नाहीत परंतू १५ जीबी फ्री स्टोरेज all media आहे. mediafire.com माझ्याकडे दहा वर्षे आहे. पण गूगल नामवंत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 09/27/2025 - 16:55

Permalink

एका नोनमिपाकराने शिकवलेली

एका नोनमिपाकराने शिकवलेली टेक्निक! postimage ह्या साईटचे टेलिग्रामवर अकाउंट आहे टोथे जाऊन फोटो टाकायचा, ते डायरेक्ट लिंक जनरेट करतात, तो कॉपी करायची आणी इथे येऊन वर फोटोचे चिन्ह दिसते आहे तिथे पेस्ट करायची. सर्वात खालच्या बॉक्स मध्ये . टाकायचा नी मिपावर पोस्ट करायची!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 09/27/2025 - 17:16

In reply to एका नोनमिपाकराने शिकवलेली by अमरेंद्र बाहुबली

Permalink

लोकांना गूगलवर विश्वास आहे.

लोकांना गूगलवर विश्वास आहे. मायक्रोसॉफ्टवर विश्वास आहे. त्याचेच काही टेक्निकल द्यावे लागते. गूगल देतेय १५ जीबी स्टोरेज, सिक्युरिटी, फोनही आहेत android चे. टेलिग्राम अकाऊंट आहे माझे .. त्यावर फोटोंचे फोल्डर बनवता येतात का पाहावे लागेल. वरती ज्या पायऱ्या दिल्या आहेत त्या बऱ्याच वाटल्या तरी काम पाच मिनिटांत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 09/28/2025 - 15:14

Permalink

हयाला जमले की,मस्तच.

Image removed. धन्यावाद.
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन on Wed, 10/01/2025 - 11:34

Permalink

धन्यवाद

अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त. आता प्रयोग करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 10/22/2025 - 19:04

Permalink

अपलोड इमेजेसचं अप्लीकेशन

कंजुसकाका, ते अपलोड इमेजेस gmur url द्यायचं ते सर्व बंद झालं वाटतं. मोबाईलमधे जुनं व्हर्जन होतं पण ते चालत नै ये. काही आयडियाची युक्ती ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 10/22/2025 - 20:03

In reply to अपलोड इमेजेसचं अप्लीकेशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नाही, काही युक्ती नाही.

नाही, काही युक्ती नाही. शेअरिंग लिंक बंद केल्यात. एकूण ती साईटच भारतातून बंद झाली. postimages siteही भारतातून बंद झाली. अमेरिकेत चालू आहे. मी ज्या फोनमधून ( handset) ही वापरत होतो त्यात बुकमार्क केलेले आहेत ते मात्र व्यवस्थित उघडतात. इतर डिवाइसेसमध्ये साईट उघडतच नाही. एकूण आता शेअरिंगसाठी गूगल फोटोज् आणि ड्राईव वापरावे लागणार. मायक्रोसॉफ्टच्या वनड्राईवचे स्टोरेज कमी करून टाकले आहे ( ५ जीबी).
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com