ऑपरेशन सिंदूर: अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in राजकारण
30 Jul 2025 - 11:19 am

अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध शेरखान आणि तवाकी सारखेच आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रात पाकिस्तान नेहमीच अमेरिकेची मदत करत आला आहे. अफगाणिस्तान वर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तान ने विमानळे अमेरिकेला उधार दिले होते. सर्वप्रकारची सैन्य मदत ही केली होती. वैश्विक राजनीति मध्ये एक म्हण आहे, अमेरिकेपासून अमेरिकेच्या शत्रूला जेवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका मित्राला असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये ही हे दिसून आले.

9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे डी वेंस ने भारताच्या पंतप्रधान मोदीजींना सूचना दिली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे. याबाबत एआई वरून मिळालेली माहिती

"अमेरिकेला त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळाली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर JD Vance यांनी 9 मेच्या रात्री पंतप्रधान मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांना फोनवरून कळवले की हा हल्ला लवकरच होऊ शकतो. भारताने ही चेतावणी अत्यंत गांभीर्याने घेतली आणि 10 मेच्या सकाळी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवर जोरदार हल्ला केला. या घटनाक्रमात JD Vance यांनी भारताला संभाव्य धोक्याची आधीच कल्पना दिली असेल. Vance यांनी अमेरिकेची भूमिका सहकार्यशील आणि सतर्क ठेवली. पाकिस्तानला रणनीतीक लाभ होऊ दिला नाही."

पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ म्हणाले होते, आम्ही दहा तारखेला सकाळी साडे चार वाजता भारतावर मोठा हल्ला करणार होतो. पण रात्री अडीच वाजता आमच्या विमानतळांवर ब्रह्मोस येऊन आपटले. आम्हाला वेळच मिळाला नाही. नुकसान टाळण्यासाठी विमाने सुरक्षित करणे आम्हाला गरजेचे वाटले. त्यामुळे भारताशी बदला घेणे शक्य झाले नाही. याशिवाय जगाचे सोडा मुस्लिम देशांचाही पाकिस्तानला पाठिंबा नाही, हे ही शरीफ यांना कळून चुकले होते. त्यांचा मिसाईल आणि द्रोण हल्ला ही नाकाम झाला होता. त्यामुळे युद्धविरामाची मागणी करण्या व्यतिरिक्त कोणताही मार्ग त्यांच्या समोर नव्हता.

भारताच्या सैन्याने निश्चित केलेली आतंकी आश्रय स्थळे आधीच उध्वस्त केली होती. पाकिस्तानला जर बदला घेण्याची दुर्बुद्धी झाली नसती, द्रोण आणि मिसाईल हल्ले केले नसते तर 7 मे ला सकाळीच ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले असते. भारताला ही युद्ध सुरू ठेवण्याचे कोणतेही कारण नव्हते. भारताने पाकिस्तानची युद्ध थांबविण्याची मागणी मान्य केली.

भारताने 11/12 विमानतळांवर हल्ला केला. काही सुरक्षा विशेषज्ञांच्या मते यातल्या काही बेस वर अमेरिकी अस्त्र-शस्त्र ठेवलेले होते. हल्ल्यात ते नष्ट झाले. बहुतेक त्याचा राग तात्यांना आला असेल. तात्यांनी युद्धविरामाचे श्रेय घेऊन भारतात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भरपूर प्रयत्न केला. बाकी भारताला पूर्व माहिती देऊन अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला, हे नाकारणे शक्य नाही.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

30 Jul 2025 - 1:37 pm | प्रसाद गोडबोले

श्या

अहो पटाईत काका, आधीच तुमच्या मागल्या ऑपरेशन सिन्दुर वरील लेखाने तुम्ही "त्यांच्या" जखमा ताज्या केल्यात, आता अजून किती मीठ शिंपडाल त्यांच्या जखमांवर =))))

कंजूस's picture

30 Jul 2025 - 9:39 pm | कंजूस

बिच्चारे शेजारी.

चौथा कोनाडा's picture

31 Jul 2025 - 1:15 pm | चौथा कोनाडा

पाताळयंत्री सामार्ज्यवादी लोक..... कुणालाच सुखाने जगू देणार नाही ...पण त्यांची पाऊले आप्ल्या देशाच्या उपयोगी पडत असतील तर चाम्गलेच आहे

विजुभाऊ's picture

8 Aug 2025 - 2:40 pm | विजुभाऊ

अमेरीका आता पाकिस्तन मधे जमिनीत तेलाचे सठे शोधतेय

त्यांना पाकिस्तानात एका अतिशय गुणकारी अशा तेलाचा शोध लागलाय

सांढे का तेल

))=((