https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E
वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल.
अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!
प्रतिक्रिया
25 Jul 2025 - 11:38 am | विजुभाऊ
कोर्टाबाबत काही बोलायचे म्हणजे जरा विचार करावासा वाटतो.
कोर्टाचा अवमान कधी आनि कशाने होईल हे सांंगता येत नाही.
25 Jul 2025 - 11:47 am | युयुत्सु
तपशीलाचा उल्लेख टाळून कोर्टाबद्दल लिहीता येईल. तपशीलामुळे कुणावर रोख आहे, हे समजते.
25 Jul 2025 - 12:43 pm | रामचंद्र
ही तत्परता...
ही बाब न्यायालयालाच नाही तर कोणत्याही अधिकारपदालाही लागू होते.
न्यायालयासंदर्भात बोलायचं झालं तर न्या. अभय ओक यांनी सार्वजनिक ध्वनिप्रदूषणाची आवर्जून दखल घेतल्याचं लक्षात येतं.
आपल्याही लेखनात नियमावर बोट ठेवून मुद्दाम त्रास देणारे अधिकारपदावरचे लोक आणि उलट विवेक, उमदेपणा आणि शक्य तितकी मदत करण्याची तयारी दाखवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात.
वेगळ्या संदर्भात पाहिलं तर मिपावरीलच डॉ. सुबोध खऱ्यांच्या लेखनात तथाकथित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्याने कसा फरक पडतो याचे स्वानुभव कथन केले आहेत. म्हणजे ही बाब त्या त्या व्यक्तीची संवेदनशील वृत्ती तसेच संबंधित परिस्थितीत आपली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडण्याची प्रवृत्ती, तडफदारपणा यावर अवलंबून आहे असे दिसते.
25 Jul 2025 - 2:08 pm | मूकवाचक
लिंक्डईन सदस्यांसाठी उपयुक्त दुवा: https://www.linkedin.com/learning/getting-things-done