काल पाकिट रिकामे केले..
पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता.
कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला..
गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली.
एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते.
एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला..
आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही.
एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला.. छान दाढी केलेला.. माझाच आहे हे पटकन ओळखूच आले नाही.
एक बायकोने दिलेली कसलीशी सामानाची यादी निघाली.. कधी ते सामान आणल्याचे आठवत मात्र नव्हते.
एक काढ्याची रेसिपी.. कधी तो काढाही प्यायल्याचे आठवत नव्हते..
एका कप्प्याला घट्ट चिकटून बसलेली कागदाची चपटी पुडी सापडली. आत माझे रक्षण करत निपचित पडलेला अंगारा होता.
काही कागदी चिटोरयांची अवस्था ईतकी दयनीय होती, की न वाचताच फाडावेसे वाटले..
वाचल्यावरही काही विशेष निघाले नाही.
काही विजिटींग कार्डस देखील अशीच होती. समोरच्याचे मन राखायला स्विकारली होती. बघ हं, जपून ठेवतोय असे त्याला दाखवायला पाकिटात ठेवली होती. जी ना कधी वापरली होती, ना कधी वापरणार होतो. त्यांनाही केराची टोपली दाखवली.
सरतेशेवटी सर्वात आतल्या कप्प्यात एक कागदाचा चिटोरा सापडला..
कधीकाळी दिवाळीच्या मुहुर्तावर ईदवर सुचलेल्या आणि कागदावर उतरवलेल्या दोन ओळी सापडल्या..
पत्थर माती के है टुकडे सारे..
जो ईद ना होती,
तो कोई चाँद ना कहेलाता!
बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच!
- तुमचा अभिषेक
----------
ता.क. - नव्या पाकिटाला पंधरा कप्पे आहेत!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7832
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी उत्कृष्ट. मनातले.
आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात
In reply to अगदी उत्कृष्ट. मनातले. by गवि
हा हा हा.. अगदी अगदी..
In reply to आणि ते सडपातळ पाकिट खिश्यात by तुमचा अभिषेक
बुडावरून आठवले, ते मोठे
In reply to हा हा हा.. अगदी अगदी.. by गवि
बरेच कागद किंवा बिले सापडतात.
बादवे हे विजिटींग कार्ड चमचा
In reply to बरेच कागद किंवा बिले सापडतात. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कुठलेही कार्ड चालते?
In reply to बादवे हे विजिटींग कार्ड चमचा by गवि
माझे पाकीट मी नियमित पणे
माझ्या वडिलांची शिस्तही अशीच
In reply to माझे पाकीट मी नियमित पणे by सुबोध खरे
असंच लिहिणार होते.प्रतिसाद
In reply to माझ्या वडिलांची शिस्तही अशीच by गवि
छान लेखन !
पर्सेस..? त्यातून तर
In reply to छान लेखन ! by मारवा
यावरून आठवले. अशा पावत्या आणि
तारकट,होय,आमच्या घरी होते.
In reply to यावरून आठवले. अशा पावत्या आणि by गवि
पुर्वी पगार कमी असल्याने पाकिटाची जरूर..
पॉकेट डायरी आणि चोर पॉकेट
In reply to पुर्वी पगार कमी असल्याने पाकिटाची जरूर.. by कर्नलतपस्वी
लेख वाचून उगीच 'मेरा कुछ
मेरा कुछ सामान तुम्हारे पाकिट
खिक्क :D
In reply to मेरा कुछ सामान तुम्हारे पाकिट by विजुभाऊ
खरंय
तारकट ..
तारकट हे नाव आठवून
In reply to तारकट .. by अनिता
खरंय
छान पोस्ट! १ रुपयाची नोट
In reply to खरंय by अकिलिज
माझ्या पाकिटात एके काळी
माणसे अजुन पाकीट वापरतात?
पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट
In reply to माणसे अजुन पाकीट वापरतात? by राजेंद्र मेहेंदळे
माझ्या पाकिटात मेट्रो कार्ड,
मी स्वतः ट्राम कधीच (भारतात) पाहीली नाही.
मुली आणि बायकोने वाढदिवसाला
उमेदीच्या काळी...
RFID प्रूफ पाकीट वापरा.
हा हा
तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटतं दोन सुद्धा असाव्यात
In reply to तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला by प्रचेतस
सुधरा रे जरा....
In reply to तरुणपणी मैत्रीण वाढदिवसाला by प्रचेतस
अहो तुमचा काळ जुना झाला पण
In reply to सुधरा रे जरा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे राम...
In reply to अहो तुमचा काळ जुना झाला पण by प्रचेतस
काळ जुना झाला पण पारंपारिक प्रेम...
In reply to अहो तुमचा काळ जुना झाला पण by प्रचेतस
बाकी अश्या आठवणी जागवून
In reply to अहो तुमचा काळ जुना झाला पण by प्रचेतस
अगदी अगदी.
In reply to बाकी अश्या आठवणी जागवून by गणपा
जेवलीस का?
In reply to अहो तुमचा काळ जुना झाला पण by प्रचेतस
अजून एक
In reply to जेवलीस का? by मारवा
+१
In reply to सुधरा रे जरा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरुष कधी स्वतःच पाकीट स्वतः
लेख आवडला!