Skip to main content

गुलकंद शिरा

लेखक Bhakti यांनी रविवार, 16/03/2025 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
*गुलकंद शिरा* उन्हाळ्या सुरू झालाय.लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे आणि खरंच मन थंड गोष्टींकडे आकर्षित होत आहे.तर आज शिऱ्यावर ताव मारायची इच्छा झालीच होती. उन्हात गुलाबाची थंड शीतलता हवीशी वाटु लागली.तेव्हा गुलकंद शिरा करायचं ठरवलं. म्हटलं "इतकं काय शिरा करतांना गुलकंद टाकला की झाला गुलकंद शिरा!" पण जी काय चव झाली आहे,अहाहा!! जिभेवर अजून रेंगाळत आहे.सारा जीवच गुलकंदी गुलाबी झालंय. यासाठी मी घरीच केलेला गुलकंद वापरला आहे ‌. गुलकंद करण्यासाठी गावठी गुलाबाच्या पाकळ्या व खडीसाखर एवढेच लागते.खडीसाखर कुटून वेळोवेळी त्यात पाकळ्या टाकायच्या सारे काही अंदाजानुसार पण मुरायला खुप काळ लागतो.हा गुलकंद ८-९ महिने जुना आहे. १ गुलकंद शिरा पाककृती **साहित्य* एक वाटी तुपात भाजलेला रवा एक वाटी साखर चार वाटी गरम पाणी चार मोठे चमचे /एक छोटी वाटी गुलकंद अर्धी वाटी साय/एक कप दूध इलायची पुड,सुकामेवा पूड खायचा गुलाबी रंग(माझ्याकडे केशरी होता) **कृती* तूपात भाजलेल्या रव्यात उकळते गरम पाणी हळूहळू घालत रवा शिजवून घ्यायचा.चांगली वाफ आल्यावर त्यात खायचा रंग किंचित टाकायचा.आता यात साय टाकायची.वाफ आल्यावर त्यात गुलकंद टाकायचा.मिश्रण एकत्र केल्यावर शेवटी साखर इलायची सुकामेवा पुड टाकायची.साखर विरघळेपर्यंत शिरा परतत राहायचा. गुलकंद शिऱ्याची मूद गुलाबी पाकळ्यांनी सजवायची! -भक्ती टीप- फोटो अजिबात एडिटेड नाहीये,मीच याच फोटोच्या प्रेमात पडलेय.

वाचने 6048
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया