Skip to main content

माय(My) मराठी

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 07/10/2024 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
'माय ' (my)मराठी! कालच 'टाइम्स'मधे वाचलं की आफ्टर ऑल मराठी लॅंग्वेज ला तो 'अभिजात का काहीतरी' लॅंग्वेजचा स्टेटस मिळाला. थॅंक्स एवरीबडी .द गवर्मैट, ऍंड आल द कन्सर्नड. आय एम व्हेरी हॅपी ऍंड एक्साइटेड.धिस इज वेरी प्राउड मुमेंट फॉर अस. काही झालं तरी इट इज अवर मदर टंग यू नो! यू सी आता मराठी च प्रोग्रेस एकदम फास्ट होईल.बट फॉर दॅट, वी मराठी पिपलं शुड आल्सो कॉंट्रीब्यूट इन वन वे ऑर आदर. आता एवढं स्टेटस मिळाला आहे तर आपली पण ऍज मराठी स्पिकिंग पिपल म्हणून काही रिस्पॉन्सिबिलीटी आहेच नं! मी तर इमिजीएटली सोसायटचे प्रेसिडेंटला सांगितले की आपल्या सोसायटीत मंथली एक दिवस 'मराठी लॅंग्वेज डे 'सेलेब्रेट केला पाहिजे .त्या दिवशी एक कल्चरल इवेंट ऑरगनाइज करता येइल. एखाद्या मराठी रायटर किंवा पोएट ला बोलवायचे .त्याचे स्पिच ठेवायचे .ऍन्ड दॅट वील बी फॉलोड बाय सॉंग्ज ऍंड डान्सेस कॉम्पिटीशन. प्राइझेस ठेवायचे. म्हणजे एवरीबडी वील पार्टीसिपेट.त्यात काही मराठी सॉंग्ज पण ठेवायचे.आणि देन डिनर. सो एवरीबडी ,इनक्लुडींग नॉनमराठी पिपल कॅन एंजॉय.आणि दॅट टाइम वीइ कॅन प्राउडली टेल देम की बाबांनो, सी धीस इज स्टेटस ऑफ आवर लॅंग्वेज ऍंड यू शुड आल्सो लर्न एंड स्पिक मराठी . नॉट धीस ओन्ली पण आय एम थिंकिंग टू रिझर्व्ह वीकली वन डे फॉर मराठी इन हाउस आल्सो.ऑन दॅट डे स्ट्रिक्टली मराठी .नो आदर लॅंग्वेज वील बी युज्ड फॉर कम्युनिकेशन.इव्हन डॉगी शी पण! बट बिफोर दॅट सोसायटीच्या जवळपास मिसेस आणि मुलांसाठी 'मराठी स्पिकिंग कोचिंग क्लासेस' कुठे आहेत का सर्च करावे लागेल. कारण मराठी स्पिकिंग इज बीग प्रॉब्लेम फॉर देम. सो बिगीन फ्रॉम होम फर्स्ट. आणि टू बी व्हेरी फ्रंक मला पण रिफ्रेश करावेच लागेल.यु नो नाउ ए डेज आय एम आल्सो नॉट इन टच ऑफ मराठी नो! बट लेट अस बिगीन.ऍंड आय एम शुअर वी वील सक्सीड. सो जय मराठी. थ्री चिअर्स! -नीलकंठ वसंतराव देशमुख
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3292
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया