Skip to main content

कवितेत भेटती...

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/08/2024 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेत भेटती डोह कधी कधी कोडे सहज न सुटणारे कधी आभासी जगतामधले अस्पर्श्य, अलख, मोहविणारे कधी लाट विप्लवी, विकराळ, फेसाळ, किनारी फुटणारी, शोषून उषेचे सर्व रंग, नि:संग निळीशी उरणारी कधी व्याधविद्ध मृगशीर्षासम मिथकांशी पाऊल अडखळते कधी चंद्रधगीच्या वणव्यातून नक्षत्र वितळणारे दिसते कधी ओळींच्या मधली जागा अस्फुट ऊर्जेने लवथवते शब्दातून अवचित ओथंबत अलगद काही हाती येते
लेखनविषय:

वाचने 624
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया