Skip to main content

पट नीटस स्थळकाळाचा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 03/08/2024 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
निवडुंग वनांतरी फुलला पाहील मग कुणी कशाला धगधगली बघ शेकोटी धुरकट मग धुनी कशाला फड तुऱ्यावरी बघ आला गोफण मग जुनी कशाला मी याचक नच, तरी देसी राहीन मग ऋणी कशाला क्षण अगणित संभाव्यांचा शंका मग मनी कशाला पट नीटस स्थळकाळाचा त्यावर मग चुणी कशाला
लेखनविषय:

वाचने 955
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

स्वैर मुक्तक आवडले.