“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.”
आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत
गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो. अर्थात बाबूलाल म्हणतो तो "तगडा खंबा"
सुरवातीला हा खंबा सुरवातीला उसाचा रस अर्थात मळी असतो. तो आडीत आंबवून डिस्टिलेशन करावा लागतो. लाकडी बॅरलमध्ये रंग आणि चवीसाठी त्यात गूळ, जळलेली साखर किंवा कॅरॅमेल मिक्स करावा लागतो. तेव्हाच तो तय्यार होतो. दोन चार आठवडे आंबवलेली छान लागते. पण दीड ते दोन वर्षे खंबा नक्कीच फुल्ल तयार असतो.
ह्या वर्षी मला माझा मित्र बाबूनाथ ह्याची खूपच आठवण आली.
त्याला ओल्ड मन्कची अतिशय आवडायची.
खरंतर तो ओल्ड मन्कची व्यतिरीक्त दुसरी रम क्वचितच घ्यायचा. ओल्ड मन्कच्या त्या उंच तगड्या घाटदार बाटलीवर ज्याम खुष असायचा .. ओल्ड मन्कसाठी "तगडा खंबा" त्याचा आवडीचा आपुलकीचा शब्द. जेमतेम मॅक्डॉवेल्स रमला चांगली रम म्हणायचा. पण मॅक्डॉवेल्स वउईथ व्होडका मात्र त्याला आवडायची. तो म्हणायचा,
“मिक्स ढोसायची खायचा तर ती मॅक्डॉवेल्स वउईथ व्होडका आणि थेंब घोट घोंट आस्वाद घ्यायचा तर तो तगड्या खंब्याचा ”
गेल्या वर्षापर्यंत तो माझ्याकडे खंबा ढोसायला यायचा. त्याचं कारण गझियाबादच्या मिलिटरी कँटीन मधून मी तगड्या खंब्याचे क्रेट मागवायचो.
मिलिटरी कँटीनचे - खरं म्हणजे गझियाबाद डिस्टिलरी मधून थेट मागवलेले खंबे मस्त ढोसण्यालायक असतात. आमच्या मेरठचे खंबेसुद्धा ढोसायला मस्त लागतात.
बाबूनाथ थंडीच्या म्हणजे खंब्याच्या दिवसात आमच्या घरी आल्यावर मला म्हणायचा,
“तगड्या खंब्याचा क्रेट आणलेला दिसतो”
“तुला कसं कळलं रे?”
मी त्याची फिरकी घेत म्हणायचो.
“अरे, तगड्या खंब्याचा वास कधी लपवता येत नाही. एव्हडंच काय तर पेग मारून रिकामे ग्लास कोपऱ्यात दडवून ठेवला तरी त्याचा वास लपायचा नाही. सर्दी झाली असली तरी.”
असं मला लागलीच म्हणायचा.
मी पुढे काही बोलण्यापूर्वी,
“चल घेऊन ये ग्लास, खंबा ओपन करू. पेग भरून टेस्ट करूया. तुझा गझियाबादचा पेग खंबा मी पहिल्यांदाच ह्या वर्षी चाखणार आहे. बाहेर काय रे, खंबे विकणारे, सगळेच खंबे गझियाबादचे खंबे म्हणून सांगत असतात, ते काही खरं नसतं. तुझ्याकडचा असली मेरठचा तगडा खंबा असतो यात वाद नाही.
खंब्याचा क्रेट ठेवला होता तिकडे जायचा आणि त्यातून ऐटीत दोन तीन खंबे हातात घेऊन प्रत्येक खंबा नाकाजवळ नेऊन वास घेत म्हणायचा,
“माझी जीभ नुसती सरसरून चव घ्यायला आतूर झाली आहे. तू जरी काही म्हणालास तरी मला खंबा नको म्हणायला जमणारच नाही.”
हे सगळं बाबूनाथकडून ऐकण्यापूर्वीच मी त्याच्या चेहर्याकडे लक्ष देऊन पहात असायचो. हळूच माझ्याकडे बघायचा हळूच खाली बघायचा, खंब्यांचा पिवळा सोनेरी रंग न्याहाळायचा. मी त्याला म्हणालो होतो,
“अरे लाजू नकोस आणखी दोन तीन खंबे घेऊन जा घरी हवं तर. मी तुझं मन जाणतो. एकदा थंडी संपली पडला की खंब्यांची मजा उणावणार. तुझ्यापासून खंबा मला लपवून ठेवता येणार नाही हे मला माहित आहे.”
ते मी त्याला बोललेले शब्द शेवटचेच ठरले. सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.
आज खंब्याचा क्रेट उघडल्यावर बाबूनाथची प्रकर्षाने आठवण आली. रेडीओवर साकृष्ण श्रीमंत यानी गायलेलं, सहज आठवलेचं गाणं लागलं होतं.
“लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?
लगेचच माझ्या कवीमनाला रहावलं नाही. ह्या गाण्याचं “डोम्बलडन” सुचलं.
माझ्या मित्राला, बाबूनाथला मी ते गीत अर्पण करतो.
जणू बाबूनाथच मला सांगतोय कवितेतून,
लपविलास तू तगडा खंबा
दरवळ त्याचा छपेल का
चाखून ढोसून खपेल का?
जवळ ग्लास पण दूर ते ओपनरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
द्रव सोनेरी छपेल का?
क्षणात बघणे, क्षणात दचकणे
मनात हवे पण, दिखावा नसणे
ही पिण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?
पुरे बहाणे, आतूर होणे
मित्रा, तुझिया मनी पिणे
मित्रहि जाणे, मी पण जाणे
खंबा छपविणे सुचेल का?
वाचने
6702
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया