✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रश्नाच्या उत्तरातल्या प्रश्नाचं उत्तर..

प — प्राची अश्विनी, Sun, 03/24/2024 - 10:55
एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा.. बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा. मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो, दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं! म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ... कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार? स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार? मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ? त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ... मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं. नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग? आवडेल की नाही? फारच रात्र किंवा अगदीच पहाट आहे का आता" असं शेक्सपियरचं भूत मानेवर चढ़ून बसतं. आणि लिहिता हात धरून बसतं. अगदी याचसाठी, उत्तरात एक प्रश्न लपवून पाठवावा. त्यामुळं "नुसतंच हाय कसं म्हणावं? घनघोर आठवण आली हे कसं लपवावं? हिरव्या ठिपक्याची वेड्यासारखी वाट पाहिली ही कबुली कशी द्यावी?" अशी सगळी गुपितं जपली जातात आपोआप... "उत्तर प्रश्न प्रश्न उत्तर" अशी लोकरीची लडी उलगडत जाते.. शब्दांशी शब्द जुळत जातात.. मनांना मनं कळत जातात.. कधी कधी मग मौनाचे सुद्धा संवाद होतात. पण ते सगळं पुढचं पुढे.. आत्ता मात्र, जाता जाता उत्तरात अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा ..

प्रतिक्रिया द्या
1180 वाचन

💬 प्रतिसाद (3)

सासं

प्राची अश्विनी
Sun, 03/24/2024 - 11:10 नवीन
सासं तेवढं शीर्षक बदलून प्रश्नाच्या करता येईल का?
  • Log in or register to post comments

यंदा मोहर जोरदार आलाय का?

अहिरावण
Sun, 03/24/2024 - 15:25 नवीन
यंदा मोहर जोरदार आलाय का?
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Mon, 03/25/2024 - 08:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा