प्रत्येकाला लहानपणापासून हे असं का? तसं का नाही? एखादी गोष्ट इथे का आहे? तिथे का नाही? हे कोणी केलं? असं कसं झालं? असे प्रश्न पडत असतात. कधीकधी प्रश्न कठीण तर उत्तर अगदी सोप्पं असतं पण ते काही केल्या सापडत नाही. तर कधी प्रश्न साधाच पण उत्तर मात्र बर्याच विचाराअंती सापडतं.
अशा अडलेल्या, सुटलेल्या, कठीण, साध्या, पांचट, आचरट,पोरकट प्रश्नोत्तरांकरता हे मेनुकार्ड!
मला सतावणार्या प्रश्नाने आणि मला माझ्यापरीने शोधता आलेल्या उत्तराने मी गमभन करतो ;)
प्र. रंगांना लाल, पिवळा, काळा इ. इ. नावे असतात. पण वासांना नावे का नाहीत?
उ.
घाण, उबस, कुबट वास असतात. पण ही वासाची विशेषणे झाली. जसे फिक्क्ट रंग, मळखाऊ रंग, भडक रंग इ. इ.
गुलाबाच्या वासाला काही नाव का नाही? जसे गुलगंध :)
केरोसिनच्या वासाला काही नाव का नाही?
शेणाच्या वासाला काही नाव का नाही?
अपवाद - मृद्गंध.
साधारण समर्पक उत्तरः
एकापेक्षा जास्त वस्तू, पदार्थांना एकच रंग असतो. त्यामुळे रक्त, गुलाब, कुंकू इ. इ. सगळ्यांचा रंग म्हणजे - लाल.
परंतु एकापेक्षा जास्त वस्तूंना, पदार्थांना एकच वास असल्याची उदाहरणे कमी आहेत. त्यामुळे वासांना वेगळी नावे देण्याची गरज मनुष्याला कधी वाटली नसावी.
मग भरून जाऊ दे मेनुकार्ड!
आजची शोधाशोध - साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे
आजची शोधाशोध - साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे
याद्या
25468
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
चवींची नावे
चव आणि वास
In reply to चवींची नावे by आजानुकर्ण
गोडवा
In reply to चव आणि वास by कोलबेर
प्रश्नांकित
काव काव ? काय राव?
काव आणि कॉव कॉव :)
In reply to काव काव ? काय राव? by ॐकार
कावकाव
कावकाव
कावळ्यांचे सोडा... कुत्र्यांचे काय?
In reply to कावकाव by ईत्यादि
माझे सर्वात आवडते कॉमीक्स
In reply to कावळ्यांचे सोडा... कुत्र्यांचे काय? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
नवीन...
In reply to माझे सर्वात आवडते कॉमीक्स by सहज
+१
In reply to नवीन... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
ऍस्टेरिक्स
In reply to कावळ्यांचे सोडा... कुत्र्यांचे काय? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
फारसे बघितलेले नाहीत...
In reply to ऍस्टेरिक्स by आजानुकर्ण
अंधश्रद्धा
पक्ष्यांच
मस्त धागा अन प्रतिसादही.
शेणाच्या वासाला गोठ्यातला वास
चांगला विषय
अवांतर
चर्चाप्रस्ताव रोचक आणि
माणसाचे ओल्फॅक्टोरी सेन्सेस