रुग्णालय व्यवस्थापन: १ - समुद्र
एका दशकाहून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात काम करत असताना जो अनुभव मिळाला त्यात खूप काही शिकलो. स्वतः अनुभवाने मिळवलेली माहिती इथे सार्वजनिक केली तर ज्याला या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याला तसेच इतर संबंधितांना मदत मिळावी या हेतूने हि लेखमाला. मी काही अनुभवी लेखक नाही तसेच हे लेख माहितीपर असल्याने यात व्याकरणाच्या चुका होऊ शकतात (शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करेनच). अनुभवाला जोड म्हणून इंटरनेट वरून काही आकडेवारी मदतीसाठी वापरलेली आहे.
नमस्कार, माझे नाव महेश सिताराम कांबळे. २०१२-१३ साली अपघातानेच आरोग्य क्षेत्रात 'नोकरी' मिळाली. कायमच कम्प्युटर जीव कि प्राण असल्याने व इतरांच्या तुलनेत लेखी तसेच बोली इंग्रजी बरी असल्याने वरच्या पदांवर लौकर जाऊ शकलो. अर्थात मेहनतीची जोड होतीच. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांत काम करत असताना आरोग्य क्षेत्राच्या असीमित कक्षांविषयी माहिती मिळायला लागली. आज, इतक्या वर्षानंतर देखील या समुद्रातील केवळ ओंजळभर किंवा कमीच माझ्या कडे आहे असे स्वीकारताना कसलाही कमीपणा नाही.
२०२० च्या एका अभ्यासानुसार भारतात, नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची संख्या ४५,००० (पंचेचाळीस हजार) च्या आसपास आहे, तर सरकारी रुग्णालयांची संख्या २५,०००(पंचवीस हजार) च्या घरात. खाजगी रुग्णालये एकूण भाराच्या जवळपास ६५% भार पेलतात. देशातील काही भागात खाजगी रुग्णालयांची क्षमता सरकारी रुग्णालयांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात देखील खाजगी रुग्णालयातील खाटा, I. C. U., व्हेंटीलेटर्स च्या संख्येचा विचार करता खाजगी रुग्णालयांची क्षमता अधिकच म्हणावी लागेल. आंध्र प्रदेश, बिहार, दादरा नगर हवेली, दमण दिऊ, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या १५ राज्यांत देशातील लोकांच्या आरोग्याचा जवळ जवळ ७५% भार विभागला गेलाय. उत्तर प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र मिळून देशाच्या लोकसंख्येच्या ३१% लोक सरकारी यंत्रणेपेक्षा खाजगी रुग्णालयांवर जास्त विश्वास ठेवताना दिसतात.
देश झाला, आता राज्य समजून घेताना राज्यात सरकारी रुग्णालयांची टक्केवारी १९८६-८७ साली जिथे ४६% हुन जास्त होती तिथे २०१७-१८ साली २६% पेक्षा कमी झालेली पाहायला मिळते. देश जिथे आरोग्यावर अर्थसंकल्पात ३.८% तरतूद करतो तिथे आपले राज्य भरमसाट अशी २.९% तरतूद करते. २०२० साली झालेल्या OXFAM Survey नुसार भारताचं आरोग्य सेवेचे बजेट जगातील खालून चौथ्या क्रमांकाचे आहे. आपल्या प्राथमिकता बल्ले बल्ले!!
रुग्णालय किंवा आरोग्य क्षेत्र म्हंटल कि डॉक्टर आणि रुग्ण एवढेच घटक न राहता स्थानिक प्रशासन ते जागतिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक-राजकीय उलाढाली अशा बहुआयामी क्षेत्राबद्दल सर्वसामान्यांत कमालीचे औदासिन्य (/अडाणीपण) दिसते. पैकी खाजगी रुग्णालये व त्यातील संधी केवळ इथपर्यंतच सांगायचे जरी म्हंटले तरी बरच काही आहे, जे पुढील भागांत येत राहील.
क्रमशः
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक विषय
धन्यवाद
रोचकच.
धन्यवाद
धन्यवाद.. वेगळा विषय वाचायला
धन्यवाद
लेख मालिका....
धन्यवाद
पुभाप्र
धन्यवाद
जबरदस्त
धन्यवाद
सुरेख विषय
धन्यवाद
लेख आवडला।
विषय रोचक आहे. सुरुवात छान
छान.
उत्तम लेख. अशीच माहिती येऊ
चांगली सुरुवात!!
'समांतर जग' हे अगदी खरे.
उत्तम विषय: प्रतीक्षेत
मह्याभाऊ ..... प्रत्येक
हॉस्पिटलचं मार्केटींग ब्रोशर
प्रतिसादाकरिता सर्वांचे आभार.
प्रतिसादाकरिता सर्वांचे आभार.