श्री गणेश लेखमाला २०२३

1

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (अंतिम स्लाईड्स १५ - २९ )

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
28 May 2023 - 12:22 am
गाभा: 

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (अंतिम स्लाईड्स १५ - २९ )

शूरपंडिता रायबाघन यांनी शिवाजी महाराजांचे करारी सेनानायकाचे रूप, निर्णय घेण्याची क्षमता, सेनेची आणि प्रजेची काळजी वाहणारा मराठी मुलखातील तरूण राजा या भावनेने त्यांच्याकडे पाहिले. अशा सुराज्यात आपणही सहभागी असावे असे वाटून देखील परिस्थितीनुसार त्यांनी मोगलांच्या बरोबरच राहण्याचा सुज्ञ विचार केला.
करतलबतखानाच्या बरोबरचे मानहानीने दुखावलेले सेनानी सरदार पुण्यात परतल्यावर शाहिस्तेखानाला घडलेल्या चुकांची जळफळून, रागावून, बदनामी करून आपली फजिती झाकत होते...
गमावलेली जनावरे, शस्त्रसाठा, प्रचंड पैसा, रसद, मानहानीची हार यामुळे ‘भाच्चा औरंगजेबाला काय तोंड दाखवू’? असे वाटून दक्षिणेचा सुभेदार सध्याच्या भाषेत जीओसी इन सी लेफ्टनंट जनरल शाहिस्तेखान सचिंत होता.
महाराजांनी उरलेले सामान आणि ज्यांना त्यांनी थांबून ठेवलेले होते सर्वांना उद्देशून म्हटले - ‘माझे तुमच्याशी वैर नाही. ही जनावरे तुमच्या ओळखीची आहेत आणि त्यांची देखभाल तुम्हालाच शक्य आहे म्हणून या जनावरांच्या बरोबर तुम्हीपण हवे आहात. आमच्या सैन्यातील तरुणांना जनावरांची निगा, पैदास, शिकवणूक यात तरबेज करा. आमच्या लोकांना जनावरांची सवय झाली की मग हवे तर आपल्या गावी जा किंवा इथेच राहा’.
कोकणातील गावगाड्यात सध्या शिकलगार, तांबोळी, नदाफ, अत्तार, मोमिन, लोहार, सुतार, न्हावी, मदारी, पिंजारी, फकीर असे कितीतरी सरमिसळ झालेले मुस्लिम भाईबंद पहायला मिळतात त्यांचे पुर्वज असेच पकडले गेलेले नंतर तिथेच टिकून घरोबा राहिलेले असावेत.

महाराजांनी या लढाईतून मिळालेला शस्त्रसंभार तेथील जमलेल्या शूर सरदारांना हवा तेवढा घेऊन जायला परवानगी देऊन आपापल्या वस्ती - खेडी - गावातील तरूणांना गोळा करून त्यांना प्रशिक्षण देऊन जितक्या तरवारी-ढाली, धनुष्य-बाण, गोफणताण, वगैरे इथून नेल्या तितके पायदळाचे शिक्षित सैनिक आणले पाहिजे अशी अट घातली होती.
ज्यांनी घोडे न्यायला मागितले त्यांनी जात, वय, रंग खूण वगैरे पाहून त्यांच्या सोबत घोडा-घोडी जोड्या बरोबर एकत्र करून पैदास यासाठी, पाणी-गवत, खास अन्न तयार करणे, खरारा करणे, लगाम, खोगीर बनवणे, पाय(नाल)बंद, पागेची रखवाली व स्वच्छता राखणे, अशा दैनंदिन निगा राखण्यासाठी, मुगल प्रवीण कामगारांना आपापसात वाटून घेण्यास व त्यांना पगार देण्याचे कबूल करून न्यायला परवानगी दिली.
अशा तऱ्हेने उंबरखिंडीतील नाट्याची सांगता झाली. शिवाजी महाराजांना कोकणातील हवामानाला जुळवून घेणारेे तरुण सैन्य बळ, आयत्या मिळालेल्या शस्त्रांमुळे आणि तरबेज जनावरांमुळे निर्माण करता आले. राजापुरच्या वखारीला नष्ट करायला, दळवी आणि सुर्वे यांचे वर्चस्व संपवायला, कल्याण, भिवंडी, रामनगर ते सुरतेला जायला समुद्रीतटाशी आणि सागरातून प्रवास करायला सरावाचे सैन्य आणि त्यांचे नेतृत्व करणारे सरदार मिळाले.

मिपा २ - १९

मिपा २ - २०

मिपा २१

मिपा २२

मिपा २३

मिपा २४

मिपा २५

मिपा २६

मिपा २७

मिपा २८

मिपा २९

मिपा ३०

मिपा ३१

मिपा ३४

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

13 Aug 2023 - 10:03 pm | रंगीला रतन

व्वा! मस्त.

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Aug 2023 - 3:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

काका लिहित रहा
पैजारबुवा,

क्या बुवा, हैं किधर आजकल तुम? दिखताच नही...

चित्रगुप्त's picture

15 Aug 2023 - 6:29 pm | चित्रगुप्त

सादरीकरण उत्तम झालेले आहे. आता फाँट वगैरे सगळे वाचायला सोपे आणि मुद्देसूद झालेले आहे.

कर्नलतपस्वी's picture

15 Aug 2023 - 7:23 pm | कर्नलतपस्वी

वाचून सुद्ध एवढे व्यवस्थित कळाले नसते.
माहितीपूर्ण व जोशपूर्ण मालिका.

धन्यवाद सर.