कॅप्टन विश्वगुरू : नवीन सुपरहिरो

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
27 Jan 2023 - 2:16 am
गाभा: 

captain vishwaguru

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 Jan 2023 - 10:09 am | कंजूस

मला वाटलं धीरेन शास्त्री.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2023 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटलं... काही नवीन जुमला.
छ्या. मूडऑफ.

-दिलीप बिरुटे

छ्या. मूडऑफ.

+१
मोठ्या आशेने धागा उघडला होता.

साहना's picture

27 Jan 2023 - 11:49 am | साहना

सिन १ : एजन्ट टायगर पठाण

सॅन फ्रन्सिस्को च्या घाणेरड्या रस्त्यावरुन आपला एजेंट पळत आहे. चायना टाऊन मधील चिनी गुप्तचरांना हा माणूस भारतीय हेर असल्याचा पत्ता लागला आहे. चायना टाऊन मधल्या चिनी रेस्टोरंट मध्ये हक्का नूडल्स आहे का हा प्रश्न विचारल्यानंतरच त्याचे भांडे फुटले होते आणि चिनी गुप्तचर वाट्टेल ते हत्यार घेऊन त्याच्या मागे पळत होते. एजेंट टायगर पठाण जीव मुठींत घेऊन भारतीय दूतावासाच्या दिशेने पळत सुटला. एकदा दूतावासात पोचला तर नंतर त्याला घाबरायची गरज नव्हती. दूतावासाच्या गेट पाशी पोचतांच भारतीय सेक्युरिटी गार्ड ने हटकले. "व्हेर गोइंग? "

"मी भारतीय नागरिक आहे आणि धोक्यांत आहे मला आंत येऊद्या" एजेंट टायगर पठाण.

"ऐसा नही किसीको एन्ट्री मिलता साहेब. पासपोर्ट है ? " इति गार्ड.

"अरे में स्पाय हू. पासपोर्ट लेके थोडेही घुमेगा. अंदर मिश्रा साहिब हे उसको बोलो पठाण आया है " एजन्ट टायगर पठाण ओरडलाच.

गार्ड आंत गेला आणि त्याने इंटरकॉम फिरवला.

मिश्रा साहेबांचे टेबल.

ट्रिंग ट्रिंग .. फोन ची घंटी वाजत होती आणि मिश्रा सर कँडी क्रश खेळत होते. बाजूला वामसी ख्रिश्नन सर टिकटॉक वर चिनी मुलीचे चाळे पाहत हसत होते.

"हॅब्लू .. " मिश्रा साहेबानी फोन उचलला.

"सर, इधर कोई एजन्ट टायगर पठाण आया है. बोल राहा है एजेंट है उसको अंदर जाना मंगता है . पासपोर्ट नाही है ! "

"हमम धुम्म मंगा, फुलूफुली तुटू" इति मिश्रा.

"सर काहे बोल राहे हो ? समझ नाही आ राहा" इति गार्ड.

मिश्रा साहेब उठून पानाची पिंक बाजूला टाकतात.

"अबे, ड्रावर नंबर २ में एक नीला फार्म हे, देदो उसको। बोलो दो कॉपी बनादे, उसके साथ आधार कार्ड का अटेस्टेड कॉपी और अमरीका में कौनसे विजे पे है उसका प्रूफ लगादो और सौ डॉलर का चेक भी लगादो। इतना करके सब्मिट करेंगे तो बोलो नेक्स्ट विक आके चेक करे" मिश्रा आपले पण थुंकावे लागले म्हणून थोड्या ताग्यानेच बोलत होते.

इकडे एजन्ट टायगर पठाण पळून पाय दुखायला लागले म्हणून खिशांतून दोन advil गोळ्या खातो. ६ ०व्या वर्षी हे असे पळणे वगैरे जडच जाते. चिनी लोक कुठे आहेत हे तो वळून वळून पाहतो पण ते अजून दिसत नाहीत.

इकडे गार्ड बाहेर येऊन तो निळा फॉर्म हाती चिकटवतो आणि सर्व मेसेज सांगतो.

"एक आठवडा ? अरे माझ्या मागे चिनी लागलेत. मारतील ना मला ते ? " इति टायगर पठाण.

"सर मेरेको क्या मालूम ? सरकारी काम है, टाइम तो लगता है ना ? आप फॉर्म लेके आजावो बाद में मै देखेगा" गार्ड

आपला एजेंट मग तो निळा फॉर्म घेऊन लंगडत लंगडत घरी जातो आधार कार्ड शोधायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2023 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं असंय, चित्रपट आवडला की पाहतो इतकंच. आपलं चित्रपटाबद्दलचे पॅरामिटर्स असे काही खास नाहीत. पण, काही चित्रपटांची चर्चा झाली की पाहावे वाटतात. पूर्ण मनोरंजन होत असल्यावर किंवा टाईमपास करायचा आहे, पर्यायच नाही अशावेळी आपण थेटरात सिनेमा बघतो. हल्ली तर, मोबाइलवरच सिनेमे बघतो. कालच एका टेली. ग्रुपवर 'पठाण' सिनेमा थियटेर प्रिंटची देवाण-घेवाण पाहिली. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला विरोध करणाऱ्या 'भक्तांच्या ढुंगणावर ढेकूळ' ठेवायचाय म्हणून सुद्धा हा चित्रपट पाहणार नाही. फक्त, चित्रपट आवडणे महत्त्वाचे.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

29 Jan 2023 - 10:52 am | चौकस२१२

चित्रपट आवडणे महत्त्वाचे.

सर्वधर्मसमभावी विचारच जणू
मग मध्येच भक्त वगैरे कशाला ?
तत्व खरंच पाळायचे असले तर मग काश्मीर फाईल पण पाहावा लागेल कि त्याला पास कारण तो नावडतीचे सत्य उघडतो म्हणून

समीर वैद्य's picture

18 Mar 2023 - 11:57 pm | समीर वैद्य

सध्या ज्यांचं "ढुंगण" छिन्नविछिन्न झालेलं आहे असेच लोकं इतरांच्या "ढुंगणावर" ढेकूळ ठेवायची स्वप्न बघतात. काय म्हणता?

चित्रगुप्त's picture

28 Jan 2023 - 5:33 pm | चित्रगुप्त