फिफा विश्वचषक २०२२

Primary tabs

प्रचेतस's picture
प्रचेतस in काथ्याकूट
22 Nov 2022 - 6:18 pm
गाभा: 

मिपावर फुटबॉल विश्वचषकाचा धागा किंवा त्यावर चर्चाही कशी नाही याचे आश्चर्य वाटले त्यामुळे आपणच त्याविषयी धागा काढू असा विचार केला.
अपेक्षेप्रमाणे गट फेरीत त्या त्या गटातील बलाढ्य संघांनी विजय मिळवला पण आज अनपेक्षितरित्या मेस्सीच्या अर्जेन्टिनाला दुबळ्या सौदी अरेबियाने २-१ असा झटका दिला. मात्र त्यांच्या गटातील इतर दोन संघ मेक्सिको आणि पोलंड असल्याने त्यांना हरवण्यास अर्जेन्टिनाला फारशी अडचण येणार नाही असे वाटते.

विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळापत्रकानुसार)

गट फेरी

20 नोव्हेंबर 2022 - कतार वि इक्वाडोर, रात्री 9.30, अल बायत स्टेडियम -

21 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध इराण संध्याकाळी 6:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

21 नोव्हेंबर 2022 - सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स रात्री 9:30 अल थुमामा स्टेडियम

22 नोव्हेंबर 2022 - यूएसए वि वेल्स, पहाटे 12.30, अल रेयान स्टेडियम

22 नोव्हेंबर 2022 - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

22 नोव्हेंबर 2022 - मेक्सिको विरुद्ध पोलंड रात्री 9.30 स्टेडियम 974

23 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया दुपारी 3.30 लुसेल स्टेडियम

23 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहाटे 12.30, अल जानोब स्टेडियम

23 नोव्हेंबर 2022 - जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी 6.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

23 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका रात्री 9.30 अल थुमामा स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया दुपारी 3.30 अल बायत स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, पहाटे 12.30 अल रेयान स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून दुपारी 3:30 अल जानोब स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

24 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल वि घाना रात्री 9.30 स्टेडियन 974

25 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध सर्बिया पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम

25 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30, अल रेयान स्टेडियम

25 नोव्हेंबर 2022 - कतार विरुद्ध सेनेगल 6:30 अल थुमामा स्टेडियम

25 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध यूएसए, पहाटे 12:30, अल बायत स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.30 PM अल जानूब स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

26 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 स्टेडियन 974

27 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको पहाटे12:30 लुसेल स्टेडियम

27 नोव्हेंबर 2022 - जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 PM अल रेयान स्टेडियम

27 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को 6:30 PM अल थुमामा स्टेडियम

27 नोव्हेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध जर्मनी, पहाटे 12.30, अल बायत स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - दक्षिण कोरिया वि घाना संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

28 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6.30 स्टेडियन 974

29 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम

29 नोव्हेंबर 2022 - इक्वाडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

29 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बायत स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - इराण विरुद्ध यूएसए पहाटे 12:30 अल थुमामा स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इंग्लंड, पहाटे 12:30, अल रेयान स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क रात्री 8:30 अल जानूब स्टेडियम

30 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स 8:30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

1 डिसेंबर 2022 - पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, पहाटे12:30 , Stadion 974

1 डिसेंबर 2022 - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 लुसेल स्टेडियम

1 डिसेंबर 2022 - कॅनडा विरुद्ध मोरोक्को रात्री 8:30 अल थुमामा स्टेडियम

1 डिसेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम रात्री 8.30 वाजता अल रेयान स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - जपान विरुद्ध स्पेन पहाटे 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

2 डिसेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध ब्राझील पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम

2 डिसेंबर 2022 सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड पहाटे 12:30 स्टेडियन 974

बाद फेरी- १६ सामने (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

3 डिसेंबर 2022 A विरुद्ध 2B खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 8.30 वाजता

4 डिसेंबर 2022 - 1C विरुद्ध 2D पहाटे 12:30 अल रेयान स्टेडियम

4 डिसेंबर 2022 - 1D वि 2C रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम

5 डिसेंबर 2022 - 1B वि 2A पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम

5 डिसेंबर 2022 - 1E विरुद्ध 2F रात्री 8:30 PM अल जानौब स्टेडियम

6 डिसेंबर 2022 - 1G विरुद्ध 2H पहाटे 12:30 उशीरा, स्टेडियन 974

6 डिसेंबर 2022 - 1F विरुद्ध 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

7 डिसेंबर 2022 - 1H विरुद्ध 2G पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम

उपांत्यपूर्व फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

9 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम

10 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम

10 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, अल थुमामा स्टेडियम

11 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बायत स्टेडियम

उपांत्य फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

14 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30 , अल बेयट स्टेडियम

15 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30, लुसेल स्टेडियम

तिसरे स्थान सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

17 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

अंतिम सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

18 डिसेंबर 2022 - रात्री 8:30, लुसेल स्टेडियम

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

22 Nov 2022 - 7:04 pm | कर्नलतपस्वी

भारतात चेंडू फळीचा खेळ जास्त आवडीचा. फुटबाॅल गोवा,बंगाल व सात बहिणींच्या प्रदेशात खुपच खेळला जातो.

पावसाळ्यात चिखलात ल्या फुटबॉल ची मजाच काही वेगळी.

सैन्यात फुटबॉल या खेळाला खुपच प्राधान्य आहे. क्रिकेट च्या तुलनेत इतर मैदानी खेळांना सरकारकडून हवे तेव्हढे प्रोत्साहन मिळत नसल्याचे वाटते.

एआईएफएफ चे निदेशक रेफरी कर्नल गौतम कार (सेवानिवृत्त) माझ्याच केडरचे वरीष्ठ व पारीवारीक घनिष्ठ मित्र आहेत.

माझा पुतण्या जिम्नॅस्टिक्स व ऐरोबिक्सचा अतंरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री आहे त्याचे पण मत आहे की हवा तेवढा प्रतीसाद ऐनव्हायरमेन्ट कडून मिळत नाही.

समय सारीणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. बघू बिग बाॅस मधून वेळ किती मिळेल.

बा द वे मी बिग बाॅस अजीबात बघत नाही.

कपिलमुनी's picture

22 Nov 2022 - 7:27 pm | कपिलमुनी

आज अर्जेंटिना ला सौदी अरेबिया चया आयात टीम ने झटका दिला

प्रचेतस's picture

22 Nov 2022 - 7:48 pm | प्रचेतस

अगदी, शेवटी मेस्सीचा चेहरा पाहवत नव्हता.

कर्नलतपस्वी's picture

22 Nov 2022 - 8:55 pm | कर्नलतपस्वी

कदाचीत साऊदीला अर्जेंटीनाने हलके घेतले.

डेन्मार्क चांगला खेळला पण ट्युनिसीया चा गोलीने चांगले खेळत दोन गोल वाचवले.
डेन्मार्क टीमवर्क चांगले होते. सुरक्षात्मक खेळी.

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2022 - 7:41 pm | श्रीगुरुजी

कोणत्या वाहिनीवर हे सामने दाखवितात?

प्रचेतस's picture

22 Nov 2022 - 7:50 pm | प्रचेतस

स्पोर्ट्स 18 एचडी 1 आणि स्पोर्ट्स 18 1आणि ओटीटी वर पाहायची असल्यास जिओ सिनेमा. पण फूटबॉल मॅच कधीही ओटीटीवर पाहू नये असे मत, बँडविड्थ कितीही असली तरी लॅग जाणवतोच.

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2022 - 7:59 pm | श्रीगुरुजी

स्पोर्ट्स १८ टाटा स्कायवर आहे का शोधतो. बहुतेक नसावे.

प्रचेतस's picture

22 Nov 2022 - 8:11 pm | प्रचेतस

चॅनेल नवीन आहे पण टाटावरही आहे असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2022 - 8:24 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! लगेच घेऊन टाकतो.

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2022 - 10:22 pm | श्रीगुरुजी

टाटा स्कायवर वाहिनी क्र. ४८७ Sports 18 - HD साठी आहे. तगेच घेतली.

कंजूस's picture

22 Nov 2022 - 9:58 pm | कंजूस

मराठीत टंकली वाटतं!
---------
डिशटिवीवर आहे आणि पॅकेजमध्ये नसला तरी फ्रि दाखवत आहेत.
_____________
१)Jiocinema (android)app डाऊनलोड करा.
२) कुणा जिओनंबरवरून ओटीपी टाकून app open करा.
३) आता जिओ सिम नसले तरी एरटेल किंवा वाईफाईवर चालू राहील.
४) sports 18 -1 वर पाहा फिफा.
----------------
अर्जेंटिना ओफसाईड गोल बाद झाले ते कळले नाही. सौदीचे (ksa?) दोन्ही गोल सुरेख होते.

प्रचेतस's picture

23 Nov 2022 - 6:00 am | प्रचेतस

जियोसिनेमा app फसलेले आहे, बफरिंग होत नाही, लॅग प्रचंड येतोय. स्पोर्ट्स 18 वर पाहणे उत्तम.

कर्नलतपस्वी's picture

23 Nov 2022 - 6:30 am | कर्नलतपस्वी

इसको लगा डाला तो लाईफ झिंगालाला.

कंजूस's picture

23 Nov 2022 - 8:28 am | कंजूस

एरटेलच्या डेटावर वापरतोय.

कर्नलतपस्वी's picture

23 Nov 2022 - 6:14 am | कर्नलतपस्वी

हायलाइटस,

कतार इक्वाडोर मॅच मस्त होता. इक्वाडोर पुर्ण खेळात वरचढ होता. लाँग पास आणी हेड सुपर्ब गोल.

इंग्लंड इराण, इराण कमजोर टिम वाटली. इंग्लंडने सहा गोल करत आपले वर्चस्व कायम ठेवले.

इराणसारख्या कमजोर संघानेही इंग्लंडवर दोन गोल लादले हे इंग्लंडला नक्कीच सलत असेल. फ्रान्सने काल 4 गोल केले

मोहन's picture

23 Nov 2022 - 12:21 pm | मोहन

अर्जेंटीनाचे दोन ऑफ साईड गोल ऑफ साईड नव्हते का? मला तरी खूपच हार्श निर्णय वाटले , दोन्ही.

एका गोलमध्ये मेस्सीची ऑफसाईड होती पण त्याच्याकडे थेट पास नव्हता आणि गोल करण्यातही त्याचा सहभाग नव्हता, फिफा नियम काय आहेत ते बघावे लागेल याबाबतीत.

कर्नलतपस्वी's picture

23 Nov 2022 - 1:32 pm | कर्नलतपस्वी

Technology made it possible to monitor every action, movement in details and an effectivetool to pass correct judgment. म्हणून कधी कधी आपल्याला रेफ्री चा निर्णय चुकीचा वाटू शकतो.

ऑफसाइड नियमांबद्दलचा एक चांगला व्हीडीओ.

https://youtu.be/GePlbCsGniA

ते पेनल्टी किक निर्णय कंटाळवाणे आणि फसवेगिरी वाटते.

तुषार काळभोर's picture

23 Nov 2022 - 7:39 pm | तुषार काळभोर

सौदी विरुद्ध अर्जेंटिना लैच धक्कादायक निकाल होता.

अवांतर : बाय द वे, नव्वदीच्या दशकात ८ आणि १६ बिट्स कन्सोलमुळे जगात उरुग्वे आणि पराग्वे असे दोन देश आहेत. इतकेच नव्हे तर ते फुटबॉल मधील नावाजलेले संघ आहेत अशी माहिती झालेली. पण १९९८ (रिकी मार्टिनच्या कप ऑफ लाईफ गाण्यामुळे उगाचच माहिती झालेला) वर्ल्डकपपासून पाहून आणि वाचून माहिती घेताना हे देश कुठेच नसायचे. २०१०-२०१२ ची दोनतीन वर्षे सोडली तर उरुग्वे प्राथमिक फेरीतच बाद व्हायचा. पराग्वेचं तर नावही नसायचं. आश्चर्य वाटायचं.

श्रीगुरुजी's picture

23 Nov 2022 - 8:05 pm | श्रीगुरुजी

उरूग्वेने दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.

पराग्वेचं आधी खूप नाव असायचं पण हल्ली फक्त कोपा अमेरिका स्पर्धेतच खेळताना दिसतात.

श्रीगुरुजी's picture

23 Nov 2022 - 8:07 pm | श्रीगुरुजी

जर्मनी-जपान

आतापर्यंत १-१

श्रीगुरुजी's picture

23 Nov 2022 - 8:20 pm | श्रीगुरुजी

जपान २-१ पुढे. फक्त २ मिनिटे आहेत.

जर्मनीची मॅच बघायची होती खरं पण ऑफिसातून घरी यायला उशीर झाल्याने मिसलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावा, कोंच्या च्यानलवर चालू आहेत या मॅचेस ? लिंक प्लीज.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Nov 2022 - 5:09 pm | प्रचेतस

स्पोर्ट्स 18 एचडी

कर्नलतपस्वी's picture

24 Nov 2022 - 5:10 pm | कर्नलतपस्वी

बिरूटे सर चॅनेल नबंर 487,488- 18 स्पोर्ट्स .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिओ सिनेमावर मोबाईलवर बघण्यासाठी आणि स्पोर्ट्स १८ वर आहेच. उरुग्वे आणि कोरियाचा सामना बघतोय. धन्यवाद

-दिलीप बिरुटे

सामना लैच रटाळ चाललाय, काहीच मजा नै येऊन राह्यली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

द.कोरियाकडून भारी आहे, पासेस. वगैरे . पण फोकलीच्याकडून गोल काही होईना...दोघांनाही चांगल्या संधी होत्या. शेवटचे दहा मिनिट.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोर्तुगाल वि घाना हा सामना रंगतदार होऊन अप्रतिम गोल बघायला मिळावेत.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 11:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोघाही संघाचा धुसमूसळेपणाचा खेळ सुरु आहे. खरं खोटं यात रोनाल्डोला अडवल्यामुळे ६४ व्या मिनिटाला पेनल्टी किक वर गोल केला तर प्रतिसाद लिहीपर्यन्त ७३ व्या मिनिटाला घानाने गोल केला.
१-१ मजा येतेय.

दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 11:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

७७ व्या आणि ८० व्या मिनिटाला पोर्तुगल चे दोन अप्रतिम गोल.
०३- ०१ जबरा सामना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 11:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोर्तुगल ०३ घाना ०२.
शेवटचे काही क्षण बाकी असतांना पोर्तुगलच्या गोल कीपरकडून बॉल हिस्कावून गोलपोष्ट मधे घालण्याची संधी घानाने घालवली.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

25 Nov 2022 - 3:14 am | कपिलमुनी

कीपर च्या मागे उभे राहून बॉल घ्यायची चाल अफलातून होती..
घसरल्याने यशस्वी झाली नाही.

घाना मस्त खेळले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2022 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राझील वि. सार्बियाचाही सामना भन्नाट झाला. ब्राझीलने अजिबात कुठेच संधी दिली नाही. ०२-० ने सार्बिया हरले. पण आवडलेला गोल.
Screenshot (14)

-दिलीप बिरुटे

मोहन's picture

25 Nov 2022 - 12:08 pm | मोहन

अफलातून गोल होता. माझ्या मते आत्ता पर्यंतचा टुर्नामेंट मधला मी पहिलेला सर्वोत्तम गोल आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2022 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालचे सामने रटाळ झाले. आज वेळ मिळाला की फॉलो करेनच. साला लै वेळ जातो.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

26 Nov 2022 - 11:17 am | कंजूस

ही एक पळवाट नियम बरोबर वाटत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2022 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. काल गोल झालेले दिलेले नाही.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

26 Nov 2022 - 11:39 am | प्रचेतस

नियम योग्य आहे नाहीतर दुसऱ्यांच्या गोलक्षेत्रात प्रतिस्पर्धी खेळाडू मागेच उभे राहून सहज गोल करत बसतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2022 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घानाचा खेळाडु अगदी गोलकिपरच्या मागे लपून बसला होता. ब्राझीलच्या गोलकिपरने जमीनीवर बॉल ठेवला (यल्लो जर्सी) आणि घानाचा पठ्ठ्या ( पांढरी जर्सी) मागून पळत येत होता आणि नेमका बॉल हिसकावून घ्यायच्या वेळी घसरुन पडला. नाय तर गोल शंभर टक्के होता.
Screenshot (7)
-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

26 Nov 2022 - 12:41 pm | प्रचेतस
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2022 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल आभार्स. पण, पास देण्यापूर्वी खेळाडु तिकडे असेल तर ऑफसाईड. पण, पास देऊन तिकडेच खेळ सुरु असेल तर
वरील छायाचित्रात पास देऊन बॉल तिकडे आलेला . बॉल क्लियर केला म्हणून वाचला नाय तर गोल दिला असता. ( असे वाटते)

-दिलीप बिरुटे
(गोलकिपर )

पास देऊन तिकडेच खेळ सुरु असेल तर
वरील छायाचित्रात पास देऊन बॉल तिकडे आलेला . बॉल क्लियर केला म्हणून वाचला नाय तर गोल दिला असता.

हं.. तो सामना पाहिला नसल्याने नेमकं काय झालंय ते सांगू शकत नै. गोल क्लिप असेल तर टाका भो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2022 - 12:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या धाग्यात माझ्या आयुष्यातला फार मौल्यवान वेळ वाया चालला.

हं हा घ्या दुवा. आणि २ मिनिट आणि १२ व्या सेकंदाचा प्रसंग बघा आणि सांगा.
आणि आपलं जे मत असेल ते मान्य. विषय संपला.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

26 Nov 2022 - 2:22 pm | प्रचेतस

ही ऑफसाईड वाटत नाही कारण चेंडूचा ताबा गोलरक्षकाकडे होता, पण तो किक मारत असताना त्याच्या मागे प्रतिस्पर्धी खेळाडू उभा राहणे लीगल आहे का ह्या बाबत कल्पना नाही, तुम्हाला माहिती मिळाल्यास येथे अवश्य द्या.

मी स्वतः फुटबॉल खेळलेलो असल्यामुळे हे सांगू शकतो
नियमाप्रमाणे ही ऑफ साईड होऊ शकत नाही
ही गोल किपर ची जबाबदारी असते की बॉल चा ताबा सोडताना प्रतिस्पर्धी खेळाडू जवळ आहे की नाही हे पाहणे.
गोल झाला असता तर नियमा नुसार गोल दिला गेला असता.
पाय घसरला आणि पोर्तुगाल वाचले अन्यथा बरोबरीत सामना सुटल्याचे दु:ख भोगावे लागले असते

श्रीगुरुजी's picture

26 Nov 2022 - 8:40 pm | श्रीगुरुजी

पोलंडने सौदी अरेबियाला २-० हरविले. आता त्या गटात पोलंड ४, सौदी अरेबिया ३, मेक्सिको १ व अर्जेंटिना ० अशी गुणसंख्या आहे. अर्जेंटिनाला बाद फेरीत जाण्यासाठी पोलंड व मेक्सिको विरूध्दचे सामने जिंकावेच लागतील.

श्रीगुरुजी's picture

27 Nov 2022 - 8:49 am | श्रीगुरुजी

अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-० असा पराभव केल्याने आपले आव्हान टिकविले आहे. आता पोलंड-अर्जेंटिना व सौदी अरेबिया - मेक्सिको हे या गटातील सामने शिल्लक आहेत. तांत्रिकदृष्ट्या चारही संघांना संधी आहे.