Skip to main content

आसाराम बापु

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
बापुच्या प्रवचनाला गर्दी झाली फार ट्रक, बस, सुमो तर कोणी आणली कार मोकळ्या जागेत जणू वसलं होत गाव प्रत्येक वस्तूला तेथील आला होता भाव छोट्-छोट्या वस्तूंची अनेक मांडली दुकानं ग्राहक होते भरपुर खरेदी करत होते आवडीनं दोन-तीन लाख लोकांचा समुद्र तीथे लोटला बापुच्या भक्तीचा महिमा आज मलाही पटला माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं बापुच्या नावाने आज हजारोंच पोट भरत होतं
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद. abhipray23@gmail.com rahulkransubhe@gmail.com
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3968
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कविता कळत नाही , म्हणून नो कमेंट. पण हा गांधींनंतर अजून एक डोक्यात जाणारा बापू आहे. - टारझन

In reply to by टारझन

अनिरुद्ध बापू यांच्याबद्दल आपले काय मत आहे? या बापू लोकांबद्दल काहीही माहिती नाही म्हणून विचारले हो! इतकेच.

सहमत+ हा डोक्यात जाणारा बापू अध्यात्माच्या नावावर बाजार , गून्हेगारी, फसवेगिरी ....

पुढील कवितांसाठी शुभेच्छा. (पहिल्या अडीच कडव्यांत लय/ठेका/वृत्त सांभाळले होते - पण मग नंतर का सोडून दिले?)

चांगली कविता , बाकी मत धनंजयाप्रमाणे प्रकाश घाटपांडे

लोकसंख्येवर ह्या बापु कडे लै भारी उपाय आहेत. तो म्हणतो फक्त एकदाच करा. एकात नाय झाले तर काञ/ ह्या प्रश्नाचे उत्तर देत नाही.

पण शेवट असा हवा होता. माणसाच्या श्रध्देचं हे नविन रूप मी पाहीलं होतं हजारोंच्या नावाने आज बापु पोट भरत होतं वेताळ

In reply to by वेताळ

हजारोंच्या नावाने आज बापु पोट भरत होतं
का बरें? ------------- दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.