घोरण्या वर काही उपाय सुचवा
मला झोपताना खूप शांतता लागते. कधी कधी गाड्यांचे आवाज वगैरे चालून जातात पण काही कारणाने शेजारची व्यक्ती घोरायला लागली की माझी झोप उडाली च. (मानसिक आजार असेल)
प्रश्न असे आहे की
१. घोरण्याची सवय कशी कमी करता येईल. कमीत कमी हळू तरी कसे घोरता येईल. काही नाकाला लाऊन झोपायची उत्पादने आहेत त्याचा फायदा होतो का?
२. जरी शेजारच्या व्यक्ती ला बदलू शकत नसेल तर अश्या माणसा शेजारी सुखाने कसे झोपायचे (माणूस आणि जागा दोन्ही बदलू शकत नाही). हेडफोन लाऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण फसला. कापसाच्या बोळ्याने पण काही फरक पडेल असे वाटत नाही.
३. पोर्टेबल साऊंड reduction device असते का आणि किती खर्चिक असते
काही लोकांना हा बावळट पणा वाटेल पण मी गेले काही महिने अक्षरशः भोगतो आहे. :)
अश्या प्रकारचा धागा आधी आला असेल तर सॉरी.
वर्गीकरण
वाचने
7648
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
उपाय नक्की कुणावर करायचे आहेत?
उपाय नाही!
- एका बाजूला झोपणे
- पुरेशी झोप घेणे
- पलंगाची उंची एका बाजूने वाढवणे - यामुळे तिरपे झोपल्यावर झोप लागत नाही हा निराळाच त्रास!
- अल्कोहोल न घेणे - दारू सोडवा!
- धूम्रपान थांबवा
- वजन कमी केल्याने फरक पडतो - हा उपाय खरच उपयोगी पडतो
- एअर मास्क वापरा - महाग असतो पण याने फरक पडतो म्हणतात!
- दातावर डेंटल कव्हर घाला - यामुले जबड्याचा पर्यायाने वायुमार्गाचा आकार वाढतो - ज्यामुळे घोरणे कमी होते.
- पॅलेटल इम्प्लांट्स - खर्चिक आणि खात्री नसलेला - उपाय
- अवुलोपॅलेटोफारिंगोप्लास्टी नावाचे श्वसनमार्ग रुंद करण्याची ऑपरेशन करता येईल
या सगळ्यात स्लीप एपनिया झालेला असतो - हा फार भयंकर प्रकार आहे. यामध्ये हमखास लक्षणे- रात्री वारंवार लघवी होणे
- हायपरसोम्निया
- दिवसा जास्त झोप येणे
- सकाळी जागे होतांना कोरडे तोंड पडणे
- जागे होतांना घसा खवखवणे
- डोकेदुखीसह जाग येणे
- कधी कधी झोपताना श्वास थांबतो
स्लीप एपनिया मध्ये तुम्ही झोपत असताना तुमच्या श्वासोच्छवासात वारंवार व्यत्यय येतो. उपचार न केल्यास, स्लीप एपनिया टाइप २ मधुमेह आणि हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतो आणि स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढवू शकतो. एकुण परिस्थिती पाहता तुमची आणि तुमच्या जोडीदाराची समस्या ही फार मोठी आहे. त्यामुले वेळीच काळजी घ्या असे सूचवतो!In reply to उपाय नाही! by निनाद
प्रतिसादा बद्दल धन्यवाद ....
एक उपाय
काही उपाय
+१
आजुबाजुचे आवाज कमी करण्यासाठी
https://www.resmed.com/us/en
घोरणार्या माणसावर मनापासून
स्लीप एपनिया
दुर्दैवाने-सुदैवाने
घोरणे
In reply to घोरणे by ज्ञानोबाचे पैजार
हे लई रोचक आहे !!!
In reply to घोरणे by ज्ञानोबाचे पैजार
हा उपाय भारी आहे
In reply to घोरणे by ज्ञानोबाचे पैजार
बरोबर
घोरण्यावर हमखास पण दीर्घकालीन उपाय
In reply to घोरण्यावर हमखास पण दीर्घकालीन उपाय by निनाद
+१
माझा एक रूम मेट प्रचंड