✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 01/14/2022 - 10:03  ·  लेख
लेख
नमस्कार, कसे आहात? सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदू सणांचे, हे एक वैशिष्ट्य आहे की, वर्षभर कितीही भांडलो, वादविवाद झाले, प्रसंगी एकमेकांना टोमणे मारून झाले तरी, दसरा, होळी आणि संक्रांतीच्या दिवशी, एकमेकांना शुभेच्छा देतोच आणि सहज शक्य झाले तर, गाठीभेटी पण घेतोच. मिपामुळे, आपण सगळेच एकत्र आहोत.वाद तर होतच राहणार, त्याला पर्याय नाही. मत भिन्नता असणे, हे नैसर्गिक आहे, पण ते मत, सुयोग्य भाषेत, सार्वजनिक रित्या मांडण्याची मुभा देणे, ही लोकशाही आहे. अशा, खरोखरी लोकशाही तत्वावर, एकमेकांना साथ देत चालणार्या, सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
5799 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

धन्यवाद !

हेमंतकुमार
Fri, 01/14/2022 - 10:11 नवीन
सर्वांना माझ्यातर्फेही हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

गोड बोला

कर्नलतपस्वी
Fri, 01/14/2022 - 11:38 नवीन
तीळ भाजले भाजले गुळामंदी राधंले मन बांधले बाधंले तेच्यामंदी तिळगूळ घ्या रे अन गोड गोड बोला मागलं सगळे सोडा पाण्यामंदी
  • Log in or register to post comments

त्ये राहिले की

कपिलमुनी
Fri, 01/14/2022 - 11:46 नवीन
त्ये माजी नौसैनिक मारहाण टाकायच राहिले की हो !
  • Log in or register to post comments

ती काही मिपाकरांनी केली नाही ...

मुक्त विहारि
Fri, 01/14/2022 - 11:53 नवीन
मिपाकर, वादविवाद करतील, प्रसंगी शाब्दिक टोमणे मारतील, पण हात उचलणे, हा मिपाकरांचा स्वभाव नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

यादी बरीच मोठी आहे

सर टोबी
Fri, 01/14/2022 - 12:07 नवीन
शासकीय अधिकाऱ्यास घरी बोलावून मारहाण करणे, आझाद मैदानावरील दंगल वगैरे. आणि नंतर ठळक अक्षरात भाजपाबद्दल उतू जाणाऱ्या प्रेमाचा अविष्कार. तरी बरे कि नुसता उद्देश चांगला असून उपयोगाचे नाही तर अनुसरलेला मार्गही योग्य असावा हि हिंदू धर्माचीच शिकवण आहे. तरी यांच्या निष्ठाच सद्सदविवेकावर स्वार होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

काय करणार?

मुक्त विहारि
Fri, 01/14/2022 - 13:35 नवीन
जोपर्यंत भाजप, हिंदू हितवादी आहे, तोपर्य॔त भाजप माझा उद्या शिवसेनेनेच कशाला? एखाद्या साम्यवादी पक्षाने जरी, हिंदू हितवादी भुमिका घेतली तरी तो पक्ष माझा .... आमच्या निष्ठा, हिंदू हितवादी पक्षालाच होत्या, आहेत आणि राहतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

हिंदू हितवादी भुमिका

Trump
Fri, 01/14/2022 - 14:01 नवीन
उद्या शिवसेनेनेच कशाला? एखाद्या साम्यवादी पक्षाने जरी, हिंदू हितवादी भुमिका घेतली तरी तो पक्ष माझा ....
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरे देवा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/14/2022 - 19:35 नवीन
=)) हहपुवा झाली. त्यांच्या एकोळी दळणासाठी स्वतंत्र विभाग झालाच पाहिजे. होत कसा नै झालाच पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नमस्कार मुवी काका

प्रसाद गोडबोले
Fri, 01/14/2022 - 12:44 नवीन
नमस्कार मुवी काका तिळगुळ घ्या गोडगोड बोला ! सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय मुवि साहेब !

चौथा कोनाडा
Fri, 01/14/2022 - 13:08 नवीन
छान लिहिलंय मुवि साहेब ! तिळगुळ घ्या गोडगोड बोला ! सर्व सक्रीय मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

तिळगुळ घ्या गोडगोड बोला. :)

Trump
Fri, 01/14/2022 - 14:05 नवीन
तिळगुळ घ्या गोडगोड बोला. मतभेद फक्त शाब्दिक ठेवा. हिंदुना आणि भारताला नुकसान होईल असे कोणतीही गोष्ट करु नका. हिंदुत्व हेच भारतीयत्व
  • Log in or register to post comments

मकर संक्रांतीच्या सर्व

श्रीगणेशा
Fri, 01/14/2022 - 18:29 नवीन
मकर संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा! तिळगूळ घ्या, गोडगोड बोला, खूप काही वाचा, अन् मिपावर लिहा :-)
  • Log in or register to post comments

मजा आली

कर्नलतपस्वी
Fri, 01/14/2022 - 18:48 नवीन
मकर संक्रांती, उत्सव, लोक भेटणार म्हणजे लोकशाही, म्हणजेच पक्ष, राजकारण, खळफट्याक, हिंदुत्व तिळगूळ घ्या आणि गोड बोला. हे सगळं शोले मधल्या बसंतीच्या टांग्या सारखच वाटतय चार चक्कर मारके फिर रामगढ जाण्यासारखच वाटलं।
  • Log in or register to post comments

मिपा, असेच आहे

मुक्त विहारि
Fri, 01/14/2022 - 20:55 नवीन
धाग्याचे काश्मीर आणि परत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

तीलगुळासह फुले घ्या... आणि

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/14/2022 - 23:18 नवीन
तीलगुळासह फुले घ्या... आणि गोड हसरे आंनदी मानवतावादी रहा! Image removed.
  • Log in or register to post comments

संक्रांतीनिमित्त शुभेच्छा.

Nitin Palkar
Sat, 01/15/2022 - 19:24 नवीन
सर्व मिपाकरांना शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा